12 वीच्या विद्यार्थ्याच्या बोकांडी गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न, तीन जणांवर गुन्हा दाखल, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                     संगमनेर शहरात जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी बारावी सायन्स मध्ये शिकणाऱ्या मुलाच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घालुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि.12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास विद्यानगर परिसरात घडली. यामध्ये 17 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. या तरुणाने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी ओंकार सुभाष लांडगे, कृष्णा सुभाष लांडगे, तेजस संजय पवार (रा. वडगाव लांडगा,ता. संगमनेर) या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली असुन आज कोर्टात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एक अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृह अहिल्यानगर येथे हजर केले आहे. या घटनेचा पुढील तपास पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ करत आहे.



           याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील खंडेरायवाडी येथील 17 वर्षीय तरुण हा संगमनेर शहरातील कॉलेज मध्ये बारावी सायन्सचे शिक्षण घेतो. तो नेहमी कॉलेजला जाण्या-येण्यासाठी बसने प्रवास करत होता. याच परिसरातील पिंपळगाव देपा येथील तरुण देखील बसने प्रवास करत असल्याने दोघांची ओळख झाली. खंडेरायवाडी येथे सप्ताह सुरू होता. दि.9 डिसेंबर रोजी पिंपळगाव देपा येथील तरुण खंडेरायवाडी येथे सप्ताहत गेला. सर्व मुले एकत्र होऊन खंडेरायवाडी येथील फाट्यावर जाऊन बसले. त्यावेळी खंडेरायवाडी येथील पिडीत 17 वर्षीय तरुण व पिंपळगाव देपा येथील तरुणामध्ये किरकोळ वाद झाले. तेथील स्थानिक नागरिकांनी हे वाद पाहिले असता ते तेथेच मिटवले. त्यानंतर पिंपळगाव देपा येथील तरुणाचे वडील खंडेराय वाडी येथे 17 वर्षीय तरुणाच्या घरी जाऊन वाद मिटवले.

              दरम्यान, दोघांचा वाद घरच्यांनी मिटवला. परंतु, वादाचा रोष हा मनात राहिला. 17 वर्षीय पिडीत तरुणाने इंन्स्टाग्रामवर सॉरी मेसेज केला. मात्र, पिंपळगाव देपा येथील तरुणाच्या मनामध्ये राग शांत झाला नाही. त्याने इन्स्टाग्रामवर रिप्लाय दिला. की, तुला सोडणार नाही. त्यामुळे, 17 वर्षीय पिडीत तरुणाला कॉलेजला घरचे जाऊ देत नव्हते. मात्र, दि.12 डिसेंबर 2024 रोजी पिडीत तरुण हा कॉलेजला बसने येत होता. तो स्टँडवर उतरला. तिथे पिडीत तरुण व त्याचा मित्र चहा पिण्यासाठी एका हॉटेलवर गेले. तेथे पिंपळगाव येथील तरुण व चार मित्र घेऊन हॉटेलवर 17 वर्षीय पिडीत तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. परंतु, तेथील आसपासच्या लोकांनी हे भांडणे सोडवली. त्यानंतर 17 वर्षीय पिडीत तरुण हा घाबरून गेला. तो तेथुन कॉलेजला जात असताना विद्या नगर परिसरात रस्त्याने जात नाही तेच पाठीमागून एम. एच.12 डी.एम.5864 ही स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने आली. व पिडीत तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान,  पिडीत 17 वर्षीय तरुणाला स्कॉर्पिओ गाडीचा धक्का बसला तो खाली पडला. त्यावेळी तो जखमी झाला. पुन्हा गाडी मागे घेऊन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, पिडीत तरुण हा सावध झाल्याने तो बाजुला झाला. त्यानंतर त्यांचा पुन्हा पाठलाग करून शहरातील मेन रोडवर पिडीत 17 वर्षीय तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सावध असल्याने ते बाजुला झाले. मात्र, तेथील एका छोट्याश्या बाळाला धक्का लागला व तेथील चहाच्या दुकानाचे नुकसान केले. तेथुन पिडीत तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठले व घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी आरोपी ओंकार सुभाष लांडगे, कृष्णा सुभाष लांडगे, तेजस संजय पवार (रा. वडगाव लांडगा,ता. संगमनेर) या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली असुन कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एक अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृह अहिल्यानगर येथे हजर केले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ करत आहे.