टायगर.! छे, तुम्ही बिबट्या सुद्धा नाही, शेपुट घालुन पळाले, तुम्ही स्वत:ला टायगर म्हणता.! थोरातांची डरकाळी.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात माजी खासदार सुजय विखें यांच्या सभा झाल्या तेथेच आ. बाळासाहेब थोरात यांनी सभा घेऊन डॉ. सुजय विखें यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. काही जण बाहेरून येतात बोलतात चाळीस वर्षात काय केलं? ते येणाऱ्याला विचारायला हवे. तुमचे वडील खासदार होते तुम्ही काय केलं. साधी बस स्टॉपला रोडच्या कडेला पाच हजार रुपयांचा बस स्टॉप करता आला नाही. तुम्ही खासदार असताना निधी गेला कुठं असं पिता-पुत्राला विचारायला हवे. त्यामुळे, संगमनेरात येऊन तुम्हाला विचारायाचा अधिकार नाही. ते जेव्हा संगमनेरात येतात तेव्हा लोणीचे माणसे घेऊन येतात. त्यांच्या समोरच भाषणं करतात. जेवणाचे पातीले देखील घेऊन येतात. त्यांना ऐकण्यासाठी कोणी इच्छुक नाही. आणि बोलताय काय, टायगर.! अरे तुम्ही बिबट्या सुद्धा नाही. तुम्ही शेपुट घालून पळाले तरी तुम्ही स्वतःला टायगर म्हणतात. त्या बिबट्या जातीचा लोकांना त्रास होतोय पण त्याची देखील अवहेलना करू नका अशी जहरी टिका डॉ. सुजय विखें यांचे नाव न घेता आ. थोरात यांनी हिवरगाव येथील जाहीर सभेत केली.
ते पुढे बोले की, धांदरफळ येथे एक वाचाळविर बोलला. त्याला प्रोत्साहन दिल्या शिवाय बोलला का? यांनी त्याला कदाचित थोडीफार पाजली असावी असं वाटतय. अरे त्याच्या कानशिलात का हाणली नाही तेथेच. कारण, यांनीच प्रोत्साहन दिले होते अशी टीका आ. थोरात यांनी डॉ. सुजय विखें यांचे नाव न घेता केली. संगमनेर तालुका कसा आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण धांदरफळ घटनेनंतर पहायला मिळाले. पहिल्या पंधरा मिनिटामध्ये महिला मंडळ स्टेजवर गेले. गचंड्या धरल्या त्यांच्या गुंड्या तुटल्या. अर्धातासात सर्वजण सर्व मतभेद विसरून त्या घटनेच्या विरोधात रस्त्यावर आले. काहीही सहन करू घेईल असा संगमनेर तालुका नाही. आता पुढच्या पन्नास वर्षे कोणी वाकड तिकडं बोलणार नाही. आता पन्नास वर्षे कोणी बोलणार नाही. अशी व्यवस्था तुम्ही सर्वांनी केली आहे.
खरंतर, धांदरफळ येथील घटना अतिशय निंदनिय अशी होती. त्यामुळे लोक रस्त्यावर आले. जे लोक रस्त्यावर आले त्यांच्यावर ३०७ सारखा कलम म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असा कलम टाकला. एकतरी माणुस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता का? एकही ऍडमिट नाही तरी ३०७ सारखा गंभीर कलम लावला. १४६ लोकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. सर्वांचा अंतरीम जामीन झाला. मात्र, त्या घटनेत लोक ३५ कि.मी. पायी गेले. कारण, त्यांचेच कर्मचारी होते. बिचारे एक-दोन फटके खाल्ले असतील नाकरत नाही. पण तिकडचेच गाडी भरून इकडे येतात हे लक्षात ठेवा. त्या घटनेनंतर जयाताईला दिल्लीतून मी फोन केला. आणि एकच वाक्य सांगितले तु स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांची नात आहे. हेच फक्त लक्षात ठेव. त्यानंतर जयाताई तालुका पोलीस ठाण्यात बसुन राहिल्या तरी पोलीस ठाण्यात फिर्याद घेत नव्हते. आणि बेकायदेशीर जमाव गोळा केला म्हणुन जयाताईवर पहिला गुन्हा दाखल होतो. ते पण पाच मिनिटात फिर्याद होते. हे या सरकारचे काम आहे. त्यामुळे, पालक मंत्री म्हणजे मालक नसतो. त्यांच्या पेक्षा जास्त काळ मी पालकमंत्री राहिलो. लोक आनंदाने बोलवतात. हे पालकमंत्री झाले तर त्रास देताय अशी टिका आ.बाळासाहेब थोरात यांनी आ. विखें पाटील यांचे नाव न घेता केली.
दरम्यान, राजकारणात विरोधक असतोच. पण, संगमनेर तालुक्याचा विषय येतो. आपल्या अस्मितेचा विषय येतो. त्यावेळी तुम्ही त्यांना इकडे बोलवता, त्यांची मदत घेता, येथे त्यांची भाषणे घेतात, तुमच्या इतकं चुकीचं कोणी वागत नाही. आजपर्यंत विरोधकांना मदत केली. आता काही विरोधक आहे जे चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देताय त्यांना संगमनेर तालुक्याचा द्वेष आहे. तिकडं जी दहशत आहे ती इकडे संगमनेर तालुक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिथे दहशतीचे झाकण आपण उडुन टाकलंय. आता जे टरमाळे राहिले ते देखील उडुन टाकणार. आता तिकडे माझ्यावर बंदी घालत आहे. भाषणावर बंदी घालत आहे. पण, पहिले जे भाषण लोकांच्या अंतःकरणात आहे. ते कसे काढणार. एक लक्षात ठेवा इकडे येऊन ते विष कालवताय तिकडे जाऊन आपण आनंद निर्माण करतोय. जो गणेश कारखाना आठ दहा वर्षे नीट चालवता आला नाही तो आपण दणकेबाज चालवलाय. इकडून ऊस घातला तिकडून साखर दोन लाख गळीत तीन हजार रुपये भाव देऊन बोनस साखर वाटली हा आनंद आपण निर्माण केला. लोकसभेला आपण पाडले आता देखील कार्यक्रम करणार आहोत. आपण कोणाच्या वाटेला जात नाही कोणी आपल्याला त्रास देत असेल सहन करणार नाही. चिडलो तर मंग कार्यक्रमच करतोय. तो आता शिर्डी मतदारसंघात करायचा आहे. असे हिवरगाव येथील भाषणात आ. थोरात यांनी विखें पिता पुत्राचे नाव न घेता तोंडसुख घेतले आहे.