तुझ्यायला तुझे म्हणत आमदारांची वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल.! साहेब.! इतकं ताठर वागून चालत नाही.! सहन होत नसेल तर थांबून घ्या.!

 

सार्वभौम (अकोले)-

 त्याचे झाले असे. की, गेल्या काही दिवसांपुर्वी आ. डॉ. किरण लहामटे हे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले येथे गेले होते. तेथील एका शेतकर्‍यांने त्यांनी उसाच्या संदर्भात प्रश्‍न केला होता. त्यावर दोघांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, शब्दाकी चकमकीत महागाई आणि शेतमालास बाजारभाव नसल्याने शेतकरी तोंडास तोंड देत राहिला. त्यामुळे, त्या शेतकर्‍याची भुनभून आमदारांना सहन झाली नाही. त्यांनी सामान्य मानसांप्रमाणे तोंडसुख घ्यायला सुरूवात केली आणि वाद वाढत गेला. नशिब.! तेथे सचिन मंडलिक, अक्षय आभळे, अंकुश वैद्य यांच्यासारखे शहाणे सुरते तरुण होते. अन्यथा त्या शेतकर्‍याच्या देखील छाताडात लात बदली असती. आरे हो.! लाथ म्हटल्यावर पुन्हा खडकी येथे एका शेतकर्‍याला मारहाण झाली आणि आमदारांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. असे अनेक कारणामे कार्यसम्राट महोदयांचे आहेत. मात्र, आपण लोकप्रतिनिधी आहात. लोकशाहीतील नेतृत्व करायचे असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर लोक दिर्घकाळ तुम्हाला संधी देतात. त्याचे उत्तम उदा. म्हणजे माजी मंत्री मधुकर पिचड साहेब, स्व. अशोकराव भांगरे साहेब, सहकार महर्षी सिताराम पा. गायकर, शिक्षण महर्षी मधुभाऊ नवले अशी काही नावे सांगता येतील. त्यामुळे, माझी समाजाला गरज आहे. हा अविर्भाव बाजुला ठेवून हा समाज माझा आहे, हा कार्यकर्ता चुकला तरी माझा आहे, प्रत्येक जाती धर्माचे नेतृत्व करणारे पुढारी माझे असून मी त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा पालक आहे अशा भावना अंगिकाराव्या लागतात. साहेब.! गडी एकटा निघुन चालत नाही, तो अखेर एकटा पडतो. हे सांगून अनेक कार्यकर्ते दमले आणि तुम्हाला सोडून गेले. त्यामुळे, ज्येष्ठ नेते कायम म्हणतात आमदारांना सामाजिक शहाणपण आलंच नाही..!!



खरंतर हा व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे. हे फार महत्वाचे नाही. पण, रंजल्या गांजलेल्या पिचलेल्या शेतकर्‍यांच्या व्यथा देखील आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याचे प्रश्‍न होते ते त्याने मांडले किंवा तो मांडत होता. त्यात त्याच्या संयमाचा बांध फुटला असेल. पण, अकोले तालुक्याचे प्रथम पालक म्हणून तुमचा बांध फुटायला नको होता. त्याच्याशी संयमाने बोलायला हवे होते. त्याचा प्रश्‍न समजून घ्यायला हवा होता, त्यावर मार्ग काढायला हवा होता, अर्थात त्या व्हिडिओमध्ये शेतकरी शिव्या देताना दिसत नाही. उलट आमदार महोदय अश्‍लिल बोलताना दिसत आहे. त्यामुळे, घटनेचा वास्तव काय असेल नसेल तो भाग वेगळा आहे. मात्र, एक शेतकरी म्हणून तरी अशी भाषा वापरणे याचे समर्थन कधीच केले जाऊ शकत नाही.

बरं, आमदार डॉ. लहामटे यांची ही एकच घटना नाही. त्यांनी गुरूवार दि. १७  डिसेंबर २०२० मध्ये आमदार झाल्यानंतर काही दिवसातच दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी गुरे घेऊन चालला होता आणि आमदार लव्हाळीला गावाकडे चालले होते. तेथे रस्त्यातील गुरांमुळे दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आमदार साहेब गाडीतून आणि थेट त्या शेतकर्‍याच्या छाताडात लाथ घातली. त्या व्यक्तीने डॉ. किरण लहामटे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी केला होता. आता एक साधा प्रश्‍न आहे, आमदारांनी जनावरे वळणार्‍या मानसांच्या नादी लागावे का? लागले तरी मारहाण करावी का? थेट छाताडात लाथ मारण्याइतका घोर अपराध त्याने केला होता का? ही लाथ मारण्यासाठी डॉक्टरांना निवडून दिले होते का? शेवटी शेतकरी माणूस आहे, त्यात आदिवासी माणूस आहे. असे म्हणतात की, स्व. यशवंतराव भांगरे आमदार होते. तेव्हा ते रस्त्याने चालणार्‍या गाई म्हशींच्या पाया पडत होते, गुरं वळणार्‍यांशी तोंभरून बोलत होते. त्याच्या पेंडक्यातली भाकर ते खात्र असे आणि त्यांचा डब्बा गुरं चारणार्‍यांना देत होते. किती सरळ आणि साधेपणा आहे हा. तो डॉ. किरण लहामटे यांना का जमला नाही. गेली पाच वर्षे त्यांनी एकला चलो रे.! असा नारा दिला आणि पळत राहिले. पण, कदाचित पळण्यापेक्षा माणसे संभाळण्यात आणि जबाबदार्‍यांचे विभाजन करुन काम करून घेतले असते. तर, आज इतकी पैशांची उधळपट्टी करण्याची वेळ आली नसती.

बरं हा प्रश्‍न इथेच मिटला नाही. तर, आमदार साहेब एकदा पठार भागावर गेले. तेथे एका कार्यकर्त्याने २०१९ मध्ये त्यांचे प्रामाणिक काम केले होते. इतकेच काय.! स्वत: पदर पैसे घालुन वडे काढून ते बुथवर वाटले होते. बुथ नियोजक आणि भुक लागलेल्या प्रत्येकाला दिले होते. मात्र, ज्या दिवशी साहेब त्या गावात गेले. तेव्हा या मतदाराने त्यांच्याशी चर्चा केली. थोडाफार इकडे तिकडे बोलला असेल. अर्थात शिविगाळ सोडून त्याने आमदारांच्या विजयावर हक्क का गाजवू नये? कारण, त्याने इमान इतबारे काम केले होते. मात्र, तेथे आमदार आणि मतदार यांच्यात बाचाबाची झाली. जेव्हा आमदार तेथून निघुन आले. त्यानंतर तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यावर आमदारांनी दबाव टाकला आणि त्याला पहाटे ३ वाजता उचलुन आणले. त्यानंतर हकनाक त्या मतदाराला जेलची हवा खावी लागली. तेव्हा देखील सार्वभौमने बातमी केली होती.

अर्थात हे प्रश्‍न बसून, मान सन्मान देऊन मिटण्यासारखे आहेत. मात्र, साहेबांचा स्वाभाव म्हणजे पुष्पा सारखा आहे. झुकेगा नाही साला.!! त्यामुळे, अनेक प्रश्‍न उद्भवले आहेत. त्यांचा स्वभाव म्हणजे ऐकावे जनाचे करावे मनाचे. शक्यतो ते जनाचे देखील ऐकूण घेत नाहीत. त्यामुळे, अनेक निर्णय हे ऐकेरी होत असतात. अनेक निर्णय चुकीचे होत असतात, अनेक गोष्टींमध्ये तृटी निघत असतात. पण, कार्यकर्त्यांना आता माहित झाले आहे. भेटलं तर गाडीत बसायचे, बोलविले तर जायचे, सांगितले तर करायचे, मिळाले तर खायचे नाहीतर घरी निघायचे.   अशी ही पद्धत आहे. त्यामुळे, आमदार साहेबांकडे ना कधी पीए टिकला ना कधी ड्रायव्हर टिकला ना कधी कार्यकर्ता टिकला ना दिर्घकाळ ऑफीसबॉय टिकला. इतकं सगळं होऊन देखील त्यांनी स्वत:मध्ये बदल करुन घेतला नाही. त्यामुळे, आता २०२४ मध्ये घरी बसण्याची वेळ आली आहे. साहेबांमध्ये पाच वर्षात इतका मी पणा, अहंमभाव, एकटेपणा आणि चिडचिड वाढली आहे. की, त्यामुळे त्यांचा फार तोटा होणार आहे. पण, ही उंदरांमध्ये चाललेली चर्चा आहे. की, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अर्थात मांजर समजून घ्यायला तयार नाही, त्यामुळे उंदीर मामांकडे पळण्यापलिकडे कोणताही पर्याय नाही. कारण, आमदार नावाची पुंगी जोवर वाजते आहे. तोवर हा खेळ सुरूच राहणार आहे. पण, कदाचित २०२४ मध्ये हा उंदीर आणि मांजराचा खेळ मोडले असे चिन्ह दिसत आहे.