पिचडांनी उमेदवारी करावी ही लहामटेंची ईच्छा.! एकास एकचा प्रयत्न सुरू.! सुदाम्या अन वाकड्या दगड लोटणार.! थोरात साहेब लक्ष द्या.!

सार्वभौम (अकोले)-

अकोले विधानसभा यंदा फारच रंगात आली आहे. मात्र, २०१९ साली सामान्य मानसांनी पै-पै जमा करुन निवडून दिलेला उमेदवार आता कोट्यावधी रुपयांची उधळण करताना दिसत आहे. तसेच मी विकास केलाय या नावाखाली त्यांच्यात प्रचंड अहंमभाव निर्माण झाला आहे. २०१९ मध्ये ज्यांनी-ज्यांनी त्यांच्यासाठी जीवाचे रान केले. त्यांना धसकट समजून बाजुले केले. तर बाजीराव दराडे यांच्यासारख्या व्यक्तीने लोकांकडून पै-पै जमा केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी किती आटापिटा केला. हे दराडे यांनीच सांगितले आहे. तर मारुती मेंगाळ, मधुकर तळपाडे, सतीश भांगरे आणि महत्वाचे म्हणजे स्व.अशोकराव भांगरे, सुनिताताई भांगरे आणि डॉ. अजित नवले यांच्यातील एक सुद्धा व्यक्ती त्यांना जवळ ठेवता आला नाही. उलट डॉ. लहामटे यांनी स्वत:ला श्रीकृष्णाची उपमा देत त्यांना साथ देणार्‍या सर्वांना वाकड्या आणि सुदाम्या म्हणत अवहेलना केली. मी एकटा विधानसभा जिंकू शकलो असतो असे म्हणत प्रत्येकाच्या संघर्षावर आणि निष्ठेवर पाणी फेरले. तोच व्हिडिओ डॉ.अजित नवले यांनी फेसबुकला पोष्ट केला आहे. त्यामुळे, आता हे सुदाम्या आणि वाकड्या पुन्हा एकत्र येणार का? आणि पिचडांना दगड म्हणून पाहणार्‍यांना डॉ. लहामटे यांना २०२४ ला लोटून देणार का? असा प्रश्‍न सुज्ञ मतदारांनी उपस्थित केला आहे.

सन १९७७ सालचा अपवाद वगळता सन २०१४ पर्यंत अपराजित असणार्‍या आदरणीय मधुकर पिचड साहेब यांना विधानसभेत पराभूत करण्याचे सामर्थ्य कोणात झाले नाही. मात्र, जेव्हा जेव्हा एकास एक निवडणुका झाल्यात, तेव्हा तेव्हा पिचड घराण्याचा पराभव शक्य आहे असे दिसून आले आहे. त्यात २०१९ ची विधानसभा असेल किंवा २०२२ ची कारखान्याची निवडणुक असेल. त्यामुळे, सत्ताधीकारी कोणीही असो, त्याच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला तर ती निवडणुक अवघड जाते हेच लक्षात येते. गेल्या वेळी देखील मा. आ. वैभव पिचड यांना पराभूत करण्यासाठी अकोल्यात शरद पवार यांनी श्रीगोंदा पॅटर्ण वापरला होता. अर्थात डॉ. लहामटे त्यात निवडून आले याचे आनंद असला. तरी, त्यांना निवडून आणण्यात जे-जे लोक मैलाचा दगड बनले. त्यांना यांनी दगडगोटे ठरविले. मला आजही आठवते, अगस्ति कारखान्याच्या वर्षीक सर्वसाधारण सभेत बी.जे देशमुख अजित दादांना उद्देशून म्हणाले होते ९४ कोटी दिले म्हणजे काय उपकार नाही केला. त्यावर स्वत: लहामटे हे उत्तर देताना म्हणाले होते. की, निच्छित उपकार नाही. पण, सहकार्य केल्याची भावना अशी अपकारात फेडू नये. मित्राने उसने पैसे दिले तरी आपण त्याची जाण ठेवतो. मग २०१९ ला ज्यांनी सहकार्य, छे.! उपकार केले. त्यांची यांनी काय जाण ठेवली? त्यामुळे, आता वाकड्या आणि सुदाम्या यांनी एकत्र येणे काळाची गरज बनली आहे.

खरंतर, राजकारणात प्लस मायनस चालुच रहाते. त्यामुळे, काल  वैभव पिचड यांना पराभूत करण्याताठी सर्वांनी एकास एक उमेदवार देत डॉ. लहामटे यांना निवडून दिले. आता डॉ. लहामटे यांच्यातील अवगूण लक्षात घेता सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज झाली आहे. पुरोगामी आणि लोकशाही तालुका हुकूमशाहीच्या मार्गाने चालु आहे. भिक नको पण कुत्र आवर अशा प्रकारची लोकांकडून प्रतिक्रिया येऊ लागली आहे. त्यामुळे, डॉ. लहामटे यांनी केलेल्या विकास कामांना विरोध नाही आणि ते नाकारुन देखील चालणार नाही. पण, त्यांच्या कार्यपद्धतीने तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती विकोपाला जाऊ लागली आहे. पुरोगामी तालुक्यात जात, धर्म आणि रंगांचे वातावरण होऊ लागले आहे. त्यामुळे, ज्या पिचड घराण्याने ५० वर्षे या तालुक्याचे पालकत्व केले. त्यांनी आता पुन्हा प्रतिनिधित्व केले पाहिजे. एकतर विजयाची प्रचंड खात्री असेल तर भांगरे कुटुंबाला थांबविले पाहिजे. किंवा भांगरे कुटुंब विजयाच्या उंबरठ्यावर असेल तर त्यांना साथ दिली पाहिजे. इतकेच काय.! मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ आणि सतिश भांगरे यांनी देखील हाच विचार केला पाहिजे. ज्यांच्यासाठी एकास एकचा नारा दिला. त्यांनी पाच वर्षात किती सहकार्य केले आणि किती मान सन्मान दिला. उपकाराची कशी परतफेड केली याचे अवलोकन केले पाहिजे आणि तुमच्यातून कोणीतरी एकाने उमेदवारी करुन पुन्हा एकास एकचा नारा दिला पाहिजे अशी सुज्ञ अकोलेकरांमध्ये चर्चा सुरू आहे.

डॉ. लहामटेंची गुप्तचर यंत्रणा..!

खरंतर मतांच्या विभाजनाचा फायदा हा डॉ. किरण लहामटे यांना होणार आहे. त्यामुळे, डॉ. लहामटे हे वाटतात तितके सोपे नाहीत. त्यांनी अशी एक यंत्रणा कामाला लावली आहे. जी पिचड परिवाराला उमेदवारी करण्यास वातावरण पुरक असल्याचे दाखवून देईल. नकळत वातावरण भावनिक आणि उमेदवारीस पुरक करून एकदा का उमेदवारी फानयल झाली, त्यानंतर मतांचे विभाजन करुन आपला विजय सोपा करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे, सोशल मीडिया आणि काही व्यक्तींच्या बाबत राजकीय दृष्ट्या बारकाईने विचार केला. तर, लक्षात येते. की, काही व्यक्तींना अचानक भाऊंची पुळका कधीपासून यायला लागला? त्यामुळे, पिचड साहेबांनी देखील विचार केला पाहिजे. त्यांची उमेदवारी ही आपल्या कट्टर विरोधकाच्या विजयाचे कारण व्हायला नको. याचे चिंतन केले पाहिजे. किंवा पिचड कुटुंबाला राष्ट्रवादीच्या किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांनी विधानपरिषदाचा शब्द दिला पाहिजे. कारण, खरोखर त्यांचे योगदान २०२४ मध्ये स्व. अशोकराव भांगरे आणि अन्य नेत्यांप्रमाणे राहू शकते. खरंतर कार्यकर्त्यांच्या भावना फार नितळ, निर्मळ आणि सोजवळ असतात. त्यांना वाटते आपणच निवडून येणार, आपण फार फिरतो आहे, आपल्या बाजुने चिम्या आहे, गोम्या आहे. पण, अंतर्गत आणि बाह्य वातावरण वेगळे असते, सुप्त लाट वेगळी असते. त्यामुळे,  कार्यकर्त्यांपेक्षा नेत्याने ठरवायचे असते. काय योग्य आणि काय अयोग्य..!!

सर्वांना सोबत घ्यावे लागेल.!

डॉ. अजित नवले यांनी बाजारतळावर झालेल्या भाषणात सांगितले. की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वचन नाम्याप्रमाणे सर्वांस पोटास लावणे आहे. ही भुमिका आपल्याला २०१९ प्रमाणे २०२४ मध्ये देखील बजवावी लागणार आहे. येथील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, आंबेडकरी जनता, आरपीआय, गवई गट, आदिवासी संघटना, विद्रोही संघटना, शिक्षक संघटना, विकलांग संघटना अशा अनेकांना सोबत घेऊन पुन्हा निकराची लढाई लढावी लागणार आहे. येथे फक्त विकास कामे नव्हे. तर येथील पुरोगामी विचारधारा, तालुक्यातील एकोप्याची संस्कृती, तालुक्यातील विविध चळवळी, विरोधक असला तरी त्यांचा मान सन्मान अशा अनेक गोष्टींचा वारसा देखील जपला पाहिजे. त्यावर पाणी फेरण्याचे काम डॉ. लहामटे यांनी केले आहे. म्हणून एकजुटीने डॉ. लहामटे यांच्या विरोधात नव्हे.! तर त्यांच्या दहशतीच्या विरोधात, एकाधिकार शाहीच्या विरोधात, ठेकेदारीच्या विरोधात, हुकूमशाहीच्या विरोधात, एकला चलो रे म्हणजेच हम करे सो कायदा अशा अनेक प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. हे संघटन बांधण्याची जबाबदारी खा. भाऊसाहेब वाकचौरे, ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले, डॉ. अजित नवले, कॉ. कारभारी उगले, विजयराव वाकचौरे, महेशराव नवले, मच्छिंद्र धुमाळ यांच्यासह अनेक नेत्यांनी घेणे आवश्यक आहे.

थोरात साहेबांनी लक्ष घालावे.!

खरंतर, माघारीसाठी अवघा एक दिवस उरला आहे. त्यामुळे, अकोले तालुक्याला लहाण भाऊ म्हणणार्‍या बाळासाहेब थोरात यांनी येथील राजकारणात लक्ष दिले पाहिजे. जर, वैभव पिचड यांना विधानपरिषदेवर घेतले तर महाविकास आघाडीला अकोल्यात फारसा संघर्ष करावा लागणार नाही. येणार्‍या काळात बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ पाहत आहेत. त्यामुळे, एक एक आमदार जमा करण्यासाठी त्यांनी किमान शेजारी तरी लक्ष देणे गरजेचे आहे. अमित भांगरे हे नवोदीत तरुण उमेदवार आहे. त्यामुळे, त्यांना शरद पवार यांच्यापुढे जाऊन हे मांडणे कदाचित शक्य होणार नाही. त्यांची शक्यतो धाडस होणार नाही. पण, महाविकास आघाडीतील दुवा म्हणून थोरात साहेबांनी या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. तथा खा. भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. अजित नवले, मधुभाऊ नवले, सुनिता ताई भांगरे अशा काही व्यक्तींनी थोरात साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजे असे सुज्ञ मतदारांना वाटते आहे.