विखे पाटलांच्या सात जणांना जिवंत जाळ्याचा प्रयत्न.! थोरात साहेबांच्या ७५ जणांवर हाफ मर्डरचा गुन्हा.! राजकीय वाद विकोपाला.!
सार्वभौम (संगमनेर)-
राजकीय वैमनस्यातून माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या कार्यकर्त्यांवर शसस्त्र जिवघेणा हल्ला केला. ही धक्कादायक घटना शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील चिखली परिसरात घडली. थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोलचे डब्बे, काठ्या आणि कुर्हाडी यांच्या माध्यामातून पाच ते सहा जणांवर जिवघेणा हल्ला केला. तर, विखेंच्या कार्यकर्त्यांची गाडी पेटवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी आज रात्री इंद्रजीत थोरात (कारखान्याचे संचालक व काँग्रेस पक्षाचे पुढारी) भास्कर खेमनर- (बाळासाहेब थोरात यांचे पी.ए) सुरेश थोरात- (रा. जोर्वे काँग्रेस नेते), सुभाष लक्ष्मण सांगळे- (रा. देवकौठे,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष), शाबीर (मुन्ना) शफीक तांबोळी,(रा.निमोण) सिध्दार्थ थोरात- (रा.जोर्वे), गोरक्ष रामदास घुगे (रा.निमोण,युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष) वैष्णव मुर्तडक (रा. संगमनेरशहर,शहर युवक काँग्रेस कार्याध्यक्ष) निखिल पापडेजा (रा.संगमनेर,युवक काँग्रेस शहराध्यक्ष) शेखर सोसे (रा. मालुंजे,एन, एस, यु, आय) शरद पावबाके (रा.पावबाकी, युवक काँग्रेस सरचिटणीस) सौरभ कडलग- (रा.संगमनेर,युवक काँग्रेस सरचिटणीस) हर्षल रहाणे (रा.चंदनापूर,तालुका युवक काँग्रेस कार्याध्यक्ष) सचिन रामदास दिघे (रा.तळेगांव) अनिल कांदळकर (रा.तळेगांव)), विजय पवार (रा. घुलेवाडी) निखिल रामाहरी कातोरे (रा. संगमनेर), गौरव डोंगरे- रा. संगमनेर,विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष) अजय फटांगरे (रा. घुलेवाडी,मा.काँग्रेस गट नेते जिल्हा परिषद), शुभम पेंडभाजे (रा. गोल्डन सिटी) तसेच भगवान लहामगे (रा.मालदाड रोड), त्याचप्रमाणे निखिल वेदप्रकाश पापडेजा (रा. घासबाजार संगमनेर,अध्यक्ष, संगमनेर शहर युवक काँग्रेस) रावसाहेब थोरात (रा.कवठेकमळेश्वर), भरत कळसकर (रा.रंगारगल्ली,ता. संगमनेर) यांच्यासह 20 ते 25 जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अशोक बाबुराव वालझाडे (रा. निमोण, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, शुक्रवार दि. २५ रोजी सायंकाळी ६.०० चे सुमारास आमचे गावचे सरपंच संदिप देशमुख हे त्यांची स्कॉर्पिओ गाडी क्र. एम.एच.१७ बी. व्ही ४७३७ घेवून माझ्याकडे आले होते. ते म्हणाले. की, धांदरफळ बु येथे खा. सुजयदादा विखे पा. यांची सभा आहे. मी मित्रांसह चाललो आहे, तुला यायचे का.? तेव्हा मी होकार देवून गाडीत बसलो. गाडी संकेत लक्ष्मण घुगे (रा. निमोण, ता. संगमनेर) हा गाडी चालवित होता, संदिप देशमुख, मी अशोक वालझाडे, गिरीष सखाराम घुगे, विकास रामभाऊ आंधळे, रितेश रामदास आंधळे, आदेश विजय शेळके असे मागे बसलो होतो. सायं. ७.३० वाजता संगमनेर मार्गे आम्ही धांदरफळ बु येथे पोहोचलो. व अमृत पाण्याच्या कारखान्याजवळील पार्कीगमध्ये आम्ही गाडी लावली होती. त्यानंतर सर्वजण सभेस गेलो. सभा रात्री ९.३० वाजेपर्यंत चालली, त्यानंतर सभेचे ठिकाणी जेवण ठेवले होते. तेथे गर्दी कमी झाल्यावर आम्ही देखील जेवणासाठी गेलो आणि जेवण करुन पुन्हा आमचे गाडीजवळ आलो.
दरम्यान, धांदरफळ बु गावातुन बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर बऱ्याच गाड्या होत्या त्यामुळे आम्हाला अकोले- संगमनेर रोडला येण्यास वेळ लागला. संगमनेरकडे वळुन निघालो त्यावेळेस गाडीत बसताना संदिप देशमुख आमचे बरोबर नव्हते, मात्र सुरज सुदाम गायकवाड हा धांदरफळ येथुन गाडीत बसला होता. गाडी संकेत लक्ष्मण घुगे हा चालवत होता, त्याचे शेजारी गिरीष सखाराम घुगे बसला होता. तर मागील जागेवर डाव्या बाजुस आदेश शेळके, मध्यभागी मी स्वत: बसलो होतो तसेच ड्रायव्हरच्या मागे विकास रामभाऊ आंधळे बसला होता. सर्वात मागच्या शिटवर सुरज गायकवाड व रितेश आंधळे हे बसले होते. डेरेवाडी फाटा ओलांडून आम्ही चिखली गावात शिरलो. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ओलांडून पुढे डावीकडे वळणावर गतीरोधक आहे. तेथे रस्त्यावर मोटार सायकली आडव्या लावलेल्या दिसल्या. तसेच काही चार चाकी गाड्या देखील होत्या.
यात एम. एच. १७ सी. एक्स. ९९२५ बोलेरो, कैंपर गाडी नं. एम. एच. १७ डी. वाय ४७०७ ही उभी होती. गतीरोधकाने गाडीचा वेग कमी झाल्यावर आम्ही आडव्या लावलेल्या गाड्यांजवळून पोहचलो. तेथे सुमारे 60- 70जणांचा जमाव आमच्या गाडीच्या पुढे आडवा झाला. त्यात इंद्रजीत थोरात (कारखान्याचे संचालक) व काँग्रेस पक्षाचे पुढारी, भास्कर खेमनर, बाळासाहेब थोरात यांचे पी.ए. सुरेश थोरात (रा. जोर्वे) सुभाष लक्ष्मण सांगळे (रा. देवकौठे गुरव), शाबीर (मुन्ना) शफीक तांबोळी (रा. निमोण), सिध्दार्थ थोरात (रा. जोर्वे), गोरक्ष रामदास घुगे (रा. निमोण), वैष्णव मुर्तडक (रा. संगमनेर), निखिल पापडेजा (रा. संगमनेर), शेखर सोसे (रा. मालुंजे) शरद पावबाके (रा. पावबाकी), सौरभ कडलग (रा. संगमनेर), हर्षल रहाणे- (रा. चंदनापूर), सचिन रामदास दिघे, (रा. तळेगांव), अनिल कांदळकर (रा. तळेगांव), विजय पवार (रा. घुलेवाडी), निखिल रामाहरी कातोरे (रा. संगमनेर), गौरव डोंगरे (रा. संगमनेर), अजय फटांगरे (रा. घुलेवाडी), पेंडभाजे (रा. गोल्डन सिटी) तसेच भगवान लहामगे (रा. मालदाड रोड), त्याचप्रमाणे (निखिल वेदप्रकाश पापडेजा (रा. घासबाजार संगमनेर), रावसाहेब थोरात (रा. कवठेकमळेश्वर), भरत कळसकर (रा. रंगार गल्ली, संगमनेर) असे होते. यांच्यासह अन्य 20 ते 25 लोकांचा जमाव होता.
दरम्यान, पुढे फिर्यादीत म्हटले आहे. की, त्यातील शुभम पेंडभाजे व हर्षल रहाणे यांचे हातात बिसलरीची बाटली, विजय पवार व भगवान लहामगे यांचे हातात कुऱ्हाड होती. निखील पापडेजा सर्वात पुढे आला व त्याचे सोबत आलेल्या बाकीच्यांनी गाडीला गराडा घातला. तो म्हणाला. की, ही कॉंगेसच्या विरोधात निवडणुक लढणाऱ्या संदिप देशमुखची गाडी आहे, ती सोडु नका". असे पापडेजा ओरडुन म्हणताच त्याने ड्रायव्हरचे काचेवर हात आपटुन ड्रायव्हरला काच खाली घेण्यास सांगितले. सदर गाडीची काच खाली केल्यावर निखील पापडेजा याने आमच्या गाडीची चावी काढून घेतली. तेव्हा त्याने त्याचे हातातील दांडक्याने आणि हाताने ड्रायव्हर संकेत मारु लागला. त्याचवेळी संकेतच्या शेजारी बसलेले गिरीष घुगे यास गाडीजवळ जमलेल्या लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. इंद्रजित थोरात व सुभाष सांगळे हे आमचे गाडीच्या खिडकी जवळ आले आणि म्हणाले की, "ही संदिप देशमुखची गाडी आहे, तर तो भडवा कोठे आहे". असे म्हणाले असता संकेत घुगे याने "गाडीत संदिप देशमुख भाऊ नाही." असे म्हणाले. त्यावर गौरव डोगंरे, अजय फटांगरे, हर्षल रहाणे, शुभम पेंडभाजे हे ओरडुन "गाडी फोडा, तो लपुन बसला असेल." असे म्हणाले.
दरम्यान, त्यावेळी विकास आंधळे याने काच खाली केली व "तुम्हीच बघा" असे म्हणत असताना शुभम पेंडभाचे व हर्षल राहणे यांनी खिडकीतुन त्याचे हातातील बाटलीतुन काहीतरी आत फेकले. गाडीत पेट्रोलचा वास आल्याने पेट्रोल गाडीत फेकल्याचे आमच्या लक्षात आले. इंद्रजित थोरात, निखिल पापडेजा, भास्कर खेमनर, शेखर सोसे हे मोठ मोठ्याने "थोरात सांहेबाच्या विरोधात सभा करताय काय? या संदिपचा व गाडीतल्यांचा माज मोडा, येथेच यांना जाळा असे म्हणत होते. पेट्रोलचा वास सुटल्याने व दोन्ही बाजुने लोक काठ्या व कुऱ्हाड घेवुन लोक उभे असल्याने आम्ही सर्वजण घाबरलो होतो. गाडीचे दरवाजे घाईघाईने उघडुन बाहेर पडलो त्यावेळी जमावातील वरील लोक आम्हाला मारत होते. त्यावेळी मी रस्त्याचे दक्षिणेस असलेल्या शेतात पळालो. आदेश शेळकेला मी पुर्वेकडील दर्ग्याकडे पळताना पाहिले. त्यावेळी विजय पवार हा हातातील कुऱ्हाडीने गाडीचे मागचे दारावर व काचेवर मारत होता. तसेच भगवान लहामगे हा त्याचे हातातील कुऱ्हाडीने आमचे गाडीच्या टायरवर मारत होता. एवढ्यात त्यांचेतील एकाने त्यांची उभी असलेली बोलेरो केम्पर गाडी क्र. एम एच 17 डी वाय 4707 या गाडीतुन काही तरी बाटलीत आणले व आमच्या स्कार्पिओ गाडीच्या मागच्या दारातुन आत टाकले. ती व्यक्ती हर्षल रहाणे होती. त्यांचे शेजारी त्यावेळेस सुभाष सांगळे हा वाकुन आमचे गाडीला काही तरी करत होता. त्यानंतर काही मिनिटांतच आमचे स्कॉर्पिओ गाडीच्या आत मध्ये आग लागल्याचे दिसले.
दरम्यान, पुढील 10 ते 15 मिनिटांत पुर्ण गाडीने पेट घेतला. तेवढ्यात अकोले बाजुकडुन कारचे दिवे चमकल्यावर "चला रे या गाडीचे काम झाले पुढचा कोण आला आहे, त्याचेही काम तमाम करु". असे अजय फटांगरे ओरडला. त्यानंतर आमचे पेटत्या गाडीजवळुन सर्व जमाव काठ्या कुऱ्हाडी उगारुन अकोले बाजुकडे पळाले व अकोले कडून येणारी इरटिगा गाडी क्रमांक एम एच 17 सी आर 8510 काठी व लोखंडी रॉड मारण्यास सुरुवात करुन त्यांची गाडीची पाठीमागील हेडलॅम्प, व विलनर साईट कडील आरसा फोडला. त्यानंतर मी खुप घाबरलेलो असल्याने मी रस्त्याच्या कडेला लपत लपत संगमनेरच्या दिशेने निघालो. मला माझे घरी पोहचवेसे वाटत होते पंरतु आमचे गाडीतील इतर जोडीदारांचे काय झाले हे मला समजले नाही. त्यानंतर मी एका मोटार सायकलला हात करुन अकोले नाका, संगमनेर येथे आलो. मला घ्यायला निमोणहुन शारुख निसार अत्तार हा अकोले नाका येथे आला. त्याचे बरोबर मी अकोले बायपास घुलेवाडी मार्गे निमोण कडुन निघालो. रस्त्यात घुलेवाडी पोलीस स्टेशन समोर सुमारे 50 ते 60 गाड्या व 2000 लोकांचा जमाव होता. त्यामुळे घटनेची फिर्याद द्यावी असे वाटुनही जिवाच्या भितीने आम्ही घाई घाईने निमोण गावाकडे कऱ्हे फाटा मार्गे घरी गेलो.
त्या रात्री पुन्हा निमोण मध्ये संदिप देशमुख याला घरी जावुन मारल्याचे समजल्याने मी घराबाहेर पडलो नाही. त्यानंतर आज शनिवार दि. 26 आक्टोबर 2024 रोजी सकाळी मला आमचे गावातील आदेश शेळके भेटला व त्याने सदर घटनेचे वेळी आडोश्याला लपुन काढलेला सदर घटनेबाबचा व्हिडीओ त्याचे मोबाईलवर मला दाखविला. त्यानंतर आता वातावरण निवळल्याने समजल्याने मी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास आलो असे फिर्यादी अशोक बाबुराव वालझाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.