अरे देवा.! गद्दार म्हणताच डॉ. लहामटे पिसाळले आणि सभेतून चालते झाले.! खरं बोलल्याने कार्यकत्यावर खवळले.! साहेब, खोटं काय होतं, पचत नसेल तर माघार घ्या.!
सार्वभौम (अकोले)-
अकोले तालुक्यातील जनतेने आजवर ज्यांनी-ज्यांनी गद्दारी केली त्यांना-त्यांना धडा शिकविला आहे. त्यात २०१९ ची निवडणुक काही वेगळी नव्हती. १९८० पासून ते २०१९ पर्यंत स्व. अशोकराव भांगरे साहेब आणि आदरणीय पिचड साहेबांच्या देखील वाट्याला जनतेने वेगळे काही दिले नाही. मग तुम्ही २०२३ मध्ये लाखो लोकांच्या भावना पायंदळी तुडवत आधी दादांकडे तर नंतर शरद पवारांकडे आणि विकासाच्या नावाखाली पुन्हा अजित दादांकडे. मग याला राजकीय परिभाषेत गद्दारी नाही तर काय म्हणतात? त्यामुळे, आपल्या कर्माचा आरसा दाखविणार्या कार्यकर्त्यांवर खवळण्यापेक्षा आणि सभात्याग करण्यापेक्षा जे केले ते स्विकारला आणि निवडणुकीला सामोरे जा. अशा प्रकारचे मत तालुक्यातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.
त्याचे झाले असे. की, २०१९ मध्ये डॉ. लहामटे म्हणजे जनतेच्या मनातील सर्वात गरिब आणि प्रमाणिक व्यक्ती म्हणून पुढे आले. त्यामुळेे, जसे २०१९ मध्ये त्यांनी चाकण, टिटवाळा, सिन्नर अशा ठिकाणी सभा घेणे सुरू केले. तसे यावेळी सुद्धा सुरू केले आहे. तेव्हा फारक इतकाच होता. की, ते आमदार होण्यासाठी लोक स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करीत होते. त्यांच्या निधीसाठी केलेल्या झोळीत पोटाला नको पण डॉक्टरला असे म्हणत मदत करत होते. स्व-खर्चाने मतदारांना मतदानासाठी आणत होते. आता मात्र पाच वर्षात विरोधी वातावरण आहे. हेच आमदार गाड्या करुन लोकांनी सभेला बोलवत आहेत, त्यांना जेवण घालत आहेत. महिलांना देवदर्शन करीत आहेत, लाखो रूपयांची बक्षिसे वाटत आहेत, कधी न साजरा होणारा सन मंगळागौरी आणि त्यासाठी अलिशान व खर्चीक यंत्रणा राबवत आहेत, २५० गावांमध्ये स्वत:चा डिजे नेवून दणक्यात मिरवणुका आणि रात्रीच्या जेवणासह यात्रा आयोजित करीत आहेत. असे अनेक विषय आहेत. त्यामुळे, २०१९ चा उमेदवार आणि २०२४ चा उमेदवार यात आता जमिन आसमानचा फरक दिसू लागला आहे.
अर्थात हे उपणायची काय गरज पडली? तर, २०१९ मध्ये जो उमेदवार तुमच्या पाया पडत होता. तोच आमदार आज तुम्ही गद्दार शब्द उच्चारला म्हणून व्यासपिठ सोडून चालता होऊ लागला आहे. म्हणजे, लोक निवडणुकीत जनतेला मायबाप माणतात, त्यांना सर्वेच्च ठेवून लोकशाहीचा आत्मा म्हणून पाया पडतात. मात्र, आपले २०१९ चे साहेब आता मोठे झाले आहेत. त्यांना मतदारांची गरज नाही, त्यांचे शब्द आता साहेबांना बोचु लागले आहेत. मला तुमची गरज नाही. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मला निवडून द्या अशा प्रकारचा अविर्भाव गाजविताना दिसत आहे. त्यामुळे, मतदार मायबाप राजांनो.! इतके सुद्धा हतबल होऊ नका. की, हे नाही तर पुढे काहीच नाही. ज्याला संधी दिली त्यांनी इतके काम केले. यानंतर दुसर्या व्यक्तीला संधी द्या. तो यापेक्षा जास्त आणि वेगळे काम करुन दाखवेल. मात्र, अहंभाव असणार्यांना आता पुन्हा जमिनिवर आणण्याची ताकद तुमच्या बोटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. तुम्ही बघा, गहाण ठेवायची की महान करायची. असे सुज्ञ मतदार तो व्हिडिओ पाहून म्हणू लागले आहेत.
राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली. तेव्हापासून शिंदे गटाला गद्दार म्हणून हिनवण्यात आले. ५० खोके एकदम ओके असे म्हणत त्यांची चेष्ठा केली. त्यात आपले आमदार महोदय देखील होते. मग तेव्हा कोणी का भर सभेतून किंवा विधानभवनातून उठून गेले? त्यानंतर अजित दादांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी स्वत:च्या नावे केली. त्यानंतर त्यांच्या आमदारांना देखील गद्दार म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांनी हिनवले. तेव्हा त्यातील एकाने देखील ना विधानभवन सोडले ना कोणती सभा सोडली. मग त्यात गेली अडिच वर्षे आपले साहेब देखील होतेच की.! उलट त्यांनी इतकडू तिकडे आणि तिकडून इकडे अशा दोन कोलांटउड्या खाल्ल्या. मग ते कोण झाले? त्यांना महाराष्ट्राने काय संबोधले? आज देखील काय संबोधतात? मग खरं बोलल्याचा इतका झटका का? सहन होत नसेल तर मतदारांवर रागविण्यापेक्षा माघरीच्या दिवशी आपला अर्ज मागे घ्या आणि खुशाल आपला व्यवसाय सुरु करा. पण, मतदारांशी असला उर्मटपणा हा अकोले तालुका सहन करणार नाही. असे मत आता मतदार व्यक्त करु लागला आहे.
खरतर, डॉ. लहामटे यांना निवडून देताना अनेकांनी फार मोठमोठी स्वप्ने पाहिली नव्हती. त्यांनी शक्य होईल तितका निधी आणावा, शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ राहून तालुक्यातील मतदारांचा अनादर करू नये आणि ज्या-ज्या फाटक्या कार्यकर्त्यांनी त्यांना २०१९ मध्ये पोटावर भाकरी बांधून दिवसरात्र निवडून येण्यास फुल ना फुलाची पाकळी मदत केली. अशा प्रत्येक कार्यकर्त्यांस सोबत ठेवावे किंवा किमान त्याच्या सुख दु:खात त्याच्या डोक्यावर हात ठेवून लढ म्हणावे. झालं मात्र उलटंच.! साहेबांनी खडकीच्या मतदाराच्या छाताडात लाथा मारल्या आणि पठारावरील काळे सारख्या कष्टाळू मतदाराला पहाटे ३ वाजता उचलून आणून जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले. इतकेच काय.! येणार्या काळात यादी प्रसिद्ध होणार आहे. की, ज्यांनी साथ दिली त्यांना लाथ कशी दिली. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे, साहेब.! मतदार हा कोणाचा घरगडी नाही. ज्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणून दडपशी करण्याचा प्रयत्न कराल. आम्हाला वाटेल तेच बोलायचे आणि आम्ही म्हणू तेच सांगायचे ही भाजपा निती हा तालुका सहन करणार नाही. त्यामुळे, येणार्या काळात यावर पायबंद बसला नाही. तर, ही जनता २०२४ मध्ये याचे उत्तर आपल्याला देईल असे ठोस मत विरोधकांनी मांडले आहे.