कोण आहे हा विकृत वसंत देशमुख.! सगळ्या अंगाला प्लास्टर करुन आला होता, महिलांनी मारहाण केली होती.! एकूण चार गुन्हे, अमोल खताळसह ११ जण आरोपी.!
सार्वभौम (संगमनेर)-
माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अतिशय घाणेरडे वक्तव्य करणारा हा वसंत देशमुख हा कोण आहे हे अनेकांना माहित नाही. मात्र, हा विकृत व्यक्ती असून निवडणुका जवळ आल्या की याला अशा प्रकारचे चाळे सुचतात. कधी स्टण्टबाजी करतो तर कधी बेताल वक्तव्य करुन स्वत: प्रसिद्धीच्या झोतात येतो. याने १९८९ साली संगमनेर साखर कारखान्याच्या वेळी स्वत:चा अंगाला प्लॅस्टर करून मतदारांना सांगितले होते. की, मला भाऊसाहेब थोरात यांनी मारहाण केली आहे. मात्र, स्वत:ला जखमी दाखविले आणि बुथवर उभे राहून देखील त्यांचा सगळा पॅनल पडला होता. त्यानंतर याने सर्व प्लॅस्टर काढून फेकून दिले. इतका नाटकीपणा याने केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. तर, संगमनेर येथे एकदा कार्यकर्त्याचा मेळावा होता. त्यात देखील याच महाशयांनी बेताल भाषण करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा देखील या वसंत देशमुखला महिलांनी बेदम मारहाण केल्याची जाणकार मंडळी सांगतात. त्यामुळे, देशमुख हे विकृत व्यक्ती असून निवडणुका आली की त्यांच्या अंगात येते आणि वय होऊन देखील त्यांच्या अंगात नवचैतन्य संचारते. मात्र, ते सामाजिक सलोख्यासाठी घातक आहे. देव करो आणि त्यांना उतारवयात सामाजिक शहाणपण येवो.!!!
सन १९८९ साली संगमनेर साखर कारखान्याची निवडणुक लागली होती. त्यात विरोधक म्हणून दत्तात्रय देशमुख, दशरथ सावंत, कारभारी कडलग, वसंत देशमुख असे काही लोक होते. त्यावेळी सकाळी मतदान सुरू झाले तेव्हा कारभारी कडलग यांच्यासोबत भाऊसाहेब थोरात यांची बाचाबाची झाली होती. तेव्हा हाच वसंत देशमुख तेथे उपस्थित होता. त्याला कोणी हात देखील लावला नव्हता. मात्र, हे महाशय थेट दवाखान्यात गेले आणि त्यांनी एका डॉक्टरांकडून संपुर्ण अंगाला प्लॅस्टर केले आणि मतदार बुथवर जाऊन उभे राहिले. मला भाऊसाहेब थोरात यांनी मारल्याचा कांगावा केला. मात्र, त्यांचे दुर्दैव असे. की, एक देखील सिट त्यांचे निवडून आले नाही. संपुर्ण पॅनल थोरात साहेबांचा आला होता. त्यानंतर काही काळाने स्वत: हे महाशय थोरात यांच्या संपर्कात आले आणि त्यांना संगमनेर कारखान्यावर संचालक म्हणून संधी दिली होती. त्यामुळे, निवडणुकीत लोकांंना भुलविणे, प्रक्षोभित बोलणे, ड्रामे करणे अशा प्रकराची कामे हा व्यक्ती करतो.
सन २०१४ साली देखील विखेपाटील कॉंग्रेसमध्ये होते. तेव्हा स्वागत लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होता. त्यात हेमंत उगले यांच्यासह पक्षनिरीक्षक संगमनेर येथे आले होते. तेव्हा हाच वसंत देशमुख हा विखे पा. यांच्यासोबत बैठकीला आला होता. तेथे याच्या हाती माईक मिळाला आणि याने तेथे देखील उलटपालट बोलायला सुरूवात केली. तेव्हा लोक त्याला समजून सांगत होते. मात्र, त्याला पाठबळ असल्यामुळे त्यांने कोणाला जुमानले नाही. अखेर कार्यकर्ते उठले आणि त्याला बेदम मारहाण केली. तो सगळ्यांच्या तावडीतून सुटला यात महिला देखील मारहाण करायला होत्या असे बोलले जाते. त्यानंतर त्याने स्वत:ची सुटका केली आणि देशमुख हा पळुन गेला. त्यानंतर त्याने अशा अनेक ठिकाणी बेताल वक्तव्य करुन स्वत:ची इमेज कमी करून घेतली आहे. लोक त्याला ज्येष्ठ म्हणन मान सन्मान देतात. मात्र, त्याचा तो गैरफायदा घेतो आणि दहाव्यात सुद्धा नको त्या विषयावर बोलून अनेकांच्या रोषाला तो आजवर सामोरे गेला आहे.
डॉ. विखे पा. तुम्ही माफी का मागितली नाही.!
डॉ. जयश्री थोरात यांनी सात लाख जनतेचा बाप असा उल्लेख केला म्हणून तुम्ही साकूर येथील सभेत मोठे मन करुन ताईंच्या वतीने हात जोडून माफी मागितली. तेव्हा जनतेने तुमचे टाळ्या वाजवून स्वागत गेले. मात्र, जेव्हा तुमच्या धांदरफळ येथील सभेत तुमच्या निष्ठावंत अध्यक्षाने त्याच ताईंबद्दल अक्षेपहार्य वक्तव्य केले तेव्हा तुम्ही ३४ मिनिट भाषण केले. मात्र तेथे बाकी आपले मन माफी मागण्यासाठी धजले नाही. आपल्या लाडक्या बहिनीबद्दल इतके गलिच्छ शब्द कानावर पडून देखील आपण ब्र शब्द काढला नाही. त्यामुळे, आपला ढोंगीपणा काल जनतेच्या समोर आला आहे.
एकाच दिवसात चार गुन्हे दाखल.!
काल धांदरफळ येथे केलेल्या बेताल वक्तव्यानंतर वसंत देशमुख याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अमोल खताळ, हरीष वलवे, प्रशांत कोल्हे, कमलेश डेरे, यांच्यावर देखील सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यात आचारसंहीता भंगाचा देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन जयश्री थोरात यांच्याबाबत अक्षेपहार्य वक्तव्य केल्याबद्दल वसंत देशमुख याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच गाड्या फोडल्याप्रकरणी देखील अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेनंतर निमोण येथे भांडणे झाली होती. त्यात देखील एक गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात शाहनाज तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संदिप भास्कर देशमुख (सरपंच), चांगदेव मारुती घुगे, जालिंदर रमेश मंडलिक, विकास रामनाथ आंधळे, आदेश विजय शेळके, वसिम मनियार अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा तर विखेंचा कार्यकर्ता.!
भाऊसाहेब थोरात यांना विरोध करता करता वसंत देशमुख हा विखे कुटुंबाचा कार्यकर्ता झाला. मात्र, तरी देखील या महाशयांनी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा थोरातांना उदोउदो करून पदे मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, त्याला संगमनेर साखर कारखान्यावर संचालक म्हणून देखील घेतले होते. मात्र, त्यानंतर तो पुन्हा विरोधात गेला. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा-तेव्हा थोरात कुटुंबियांना गलिच्छ पद्धतीने डिवचण्याचे काम याने केले आहे. दरम्यानच्या काळात विखे आणि थोरात वाद हा राज्यात नावारूपाला आला तेव्हा याने कायम विखेंचा आसरा करुन थोरातांना टार्गेट केले आहे. त्यामुळे, काल धांदरफळ येथे सभा असताना तो विखेंच्या सभेचा अध्यक्ष होता आणि त्याच्या गळ्यात भाजपाचा गमछा देखील होता.