खा. भाऊसाहेब वाकचौरे, जयश्री थोरात, दुर्गाताई, डॉ. सुधिर तांबे, करण ससाणे, उत्कर्षा रुपवते यांच्यासह ५० बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर)-
विधानसभेची आचारसंहीता चालु असताना विना परवाना आंदोलन करणे, असंवैधानिक शब्दांचा वापर करून जोडे मारो आंदोलन केले. याप्रकरणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. सुधिर तांबे, उत्कषा रुपवते, इंद्रजित थोरात, शरयु थोरात, सुरेश थोरात, प्रभावती घोगरे, करण ससाणे, बाबा ओहळ यांच्यासह ५० जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल शनिवार दि. २६ आक्टोबर २०२४ यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन केले होते. त्यामुळे, पोलीस कर्मचारी संदिप आघाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, डॉ. सुजय विखे पा. यांनी धांदरफळ येथे युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत देशमुख या आरोपीने माजी महासुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ भाषा वापरुन टिका केली होती. त्याच्या निषेधार्थ आणि न्याय मागण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते, सामजसेवक आणि अन्य पक्षांचे पदाधिकारी यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाणे गाठले होते.
दरम्यान, तेथे जाऊन या सर्वांनी डॉ. सुजय विखे, कार्यक्रमाचे आयोजक आणि वाच्चाळवीर वसंत देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, आठ तास ठिय्या मांडून देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करण्याची भुमिका घेतली नाही. त्यामुळे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हाद्दीत हजारो कार्यकर्ते जमा झाले. त्यानंतर या जमावाचे रुपांतर थेट आंदोलन आणि घोषणाबाजी तसेच कळत नकळत सभेत रुपांतर झाले. यावेळी, संतप्त झालेल्या जमावाने डॉ. सुजय विखे आणि वाच्चाळवीर वसंत देशमुख यांच्या फोटोला जोडे आणि लाथा मारो आंदालन केले.
दरम्यान, न्याय मागण्यासाठी गेलेल्या या जमावाकडे कोणतीही परवानगी नव्हती, सध्या विधानसभेची निवडणुक सुरू आहे. त्यामुळे, त्या अनुषंगाने आचारसंहीता सुरू आहे. परिणामी पोलिसांनी कायद्याला धरुन पुढील कारवाई केली आहे. डॉ. जयश्री थोरात यांना आठ तास बसून देखील न्याय मिळत नाही. त्यामुळे, जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते आणि समाजसेवक तथा राजकीय व्यक्तींनी संगमनेर गाठले होते. त्यामुळे, तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर प्रचंड मोठी गर्दी जमा झाली होती. मात्र ती कायद्याला धरुन नाही असे म्हणत पोलिसांनी २५ ज्ञात आणि २५ अज्ञात अशा ५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
यात खा. भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, संगमनेरच्या मा. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॉंग्रेसचे नेते विश्वास मुर्तडक, मा. आ. डॉ. सुधिर तांबे, कॉंग्रेसचे नेते इंद्रजित थोरात, बाळासाहेब थोरात यांची कन्या शरयु थोरात, सुरेश थोरात, राहाता विधानसभेच्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे (रा, लोणी), सचिन बडगुजर (रा. श्रीरामपूरा), बाबा ओहोळ (रा. वडगाव पान, ता. संगमनेर), सिताराम राऊत (संगमनेर),वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, बाळासाहेब गायकवाड (रा. आश्वी), हेमंत उगले (रा. श्रीरामपूर), करण ससाणे (रा. श्रीरामपूर), दिपाली करण ससाणे (रा. श्रीरामपूर), अमर कतारी (संगमनेर), अशोक सातपुते (रा. खांजापूर), माधवराव कानवडे (रा. संगमनेर), सचिन खेमनर, इंद्रजित खेमनर (रा. साकूर), राजाभाऊ खरात (रा. घुलेवाडी), सचिन चौघुले (रा. शिर्डी), सचिन दिघे (रा. तळेगाव) आणि यांच्यासह अन्य २५ जणांवर कलम २२३, ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.