डॉ. लहामटेंना भाजपाचं भ्याव.! बॅनरवर मोदी, शहा, शिंदे, फडणवीस नकोच राव.! कारण, डॉ. लहामटेंना मत म्हणजे भाजपाला मत हे सिद्ध होतय.!

सार्वभौम (अकोले)-

अकोले तालुक्यातील जनता भाजपाला स्विकारत नाही, किमान विधानसभेला तर नाहीच नाही. त्यामुळे, इथे फार-फार तर शिवसेनेचे भगवे निशाण चालते. पण, फार कट्टरता, आर.एस.एसची विचारसारणी, डाव्या विचारांचा पगडा, पुरोगामी चळवळी आणि संविधान बाबत केलेले संदिग्ध वक्तव्य अशी अनेक कारणे बीजेपी येथे मागे पाडतात. त्यामुळे, बीजेपीची धाव झेडपीपर्यंत अशा प्रकारचे गणित आमदारांना देखील माहित आहे. त्यामुळे, त्यांच्या प्रचार यंत्रणेच्या बॅनरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे अमित शहा, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, तसेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि खद्द रिपाईचे रामदास आठवले यांचा देखील फोटो लावलेला नाही. आता ही ऍलर्जी कशामुळे? तर, त्यांना माहित आहे. या प्रचाराच्या गाड्या गावोगावी फिरणार आहे. त्यावर मोदी, शहा आणि फडणविस म्हणजे भाजपा. अर्थातच डॉ. लहामटे यांना मत म्हणजे भाजपाला मत हाच सरळ मेसेज जाणार आहे. त्यामुळे, आमदार महोदयांनी महायुतीच्या सर्वच नेत्यांना बॅनरहून हद्दपार केले आहे. महायुतीमधील कोणालाही सोबत न घेता एकला चलो रे ही भुमिका घेऊन त्यांची प्रचाराला प्रारंभ केला आहे. पण, माझा आणि भाजपाचा काही एक संबंध नाही. अशा प्रकारचा संदेश  त्यांना द्यायचा आहे. मात्र, जनता इतकी काही दुधखुळी नाही. ये पब्लिक है, सब जानती है.! असे म्हणत अनेकांच्या आमदारांवर टिका केली आहे.

खरंतर, आमदार डॉ. लहामटे हे व्यक्ती म्हणून फार चांगले आहे. त्याहून ते कामे करण्यास देखील चांगले आहेत. मात्रए त्यांना माणसांना धरुन चालणे, प्रत्येकाला सोबत घेऊन चालणे, कार्यकर्ता आहे त्याला विश्‍वासात घेणे, चुकीचा असला तरी कार्यकर्त्याला माफ करुन त्याच्या पाठीशी उभे राहणे अशा अनेक गोष्टींचा हातखंडा त्यांना जमला नाही. जे पिचड विकास करायचा म्हणून भाजपात गेले. त्यांच्यावर टिका करताना डॉक्टरांची दमछाक झाली. पण, त्यांनी देखील नंतर विकास करायचा आहे म्हणून भाजपाच्या मांडीला मांडी लावली. त्यामुळे, या दोन्ही उमेदवारांमध्ये बदल काय? असा प्रश्‍न सहज पडतो. मात्र, अडिच वर्षे डॉ. लहामटे सत्तेत होते. पण, भाजपाच्या एक सुद्धा नेत्याला घेऊन किंवा शिंदे आणि रिपाई गटाला सोबत घेऊन कधी एक नारळ फोडला नाही. ही खंत महायुतीच्या सर्व घटकपक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. इतकेच काय.! डॉ. लहामटे यांनी त्यांच्या पोष्टरवर कधीच मोदी, शहा, फडणविस यांचे चित्र लावले नाही. त्याचे मुळ कारण हेच आहे. की, अकोले तालुक्यात हे चेहरे पाहिले की येथील मतदार आणि पुरोगामी विचारांना उधान आल्याशिवाय रहात नाही.

आता डॉ. लहामटे हे तर मुळचे आर.एस.एस विचारांचे आहेत. मात्र, आता त्यांना निवडणुकीसाठी त्या विचारांची ऍलर्जी होऊ लागली आहे. एकटे अजित दादा म्हणजे महायुती नाही. किंवा लाडकी बहीण ही काही एकट्या दादांची योजना नाही. महायुतीने एक मित्र पक्ष तयार झाला आहे. त्यामुळे, डॉ. लहामटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणविस या महाराष्ट्राच्या नेत्यांसह देशाच्या देखील नेत्यांचे फोटो यांच्या प्रचारात असणे बंधनकारक आहे. मात्र, डॉ. लहामटे यांना भिती वाटते. की, कदाचित आपल्या पोष्टरवर मोदी, शहा, फडणविस, शिंदे यांचे फोटो लावले. तर, या पुरोगामी तालुक्यात फार गोंधळ निर्माण होईल. जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओपन, मुस्लिम लोक आहेत. ते डॉ. लहामटे यांचा प्रचार करणार नाहीत आणि मतदान देखील करणार नाही. कारण, त्यांना मत म्हणजे भाजपाला मत अशा प्रकारची धारणा आज फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. तीच येणार्‍या काळात अधिक वृद्धींगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, प्रचाराच्या गाड्यांवर अजित दादा, लहामटे गुरुजी आणि बहुजन चेहरा हवा म्हणून सिताराम पा. गायकर साहेब अशा तिघांचे फोटो लावण्यात आले आहेत. मात्र, हे योग्य नसल्याचे भाजपाच्या काही नेत्यांचे मत आहे. 

खरंतर, काल भाऊ-भाऊ म्हणून नाचणारे आज पुन्हा यु टर्न घेऊन डॉ. लहामटे यांना साकडे घालु लागले आहेत. ते भाजपाचे आहेत त्यामुळे, जीतके भाजपा-भाजपा नाचवू तितका तालुक्यात तोटा होणार आहे. त्यामुळे, भाजपा वाल्यांची डॉ. लहामटे यांच्यासोबत जाण्याची तिव्र इच्छा असली तरी, डॉक्टरांना ही जनता नको आहे. कारण, गोवोगावी आज लोक म्हणत आहे. डॉक्टरांना मत म्हणजे भाजपाला मत. त्यामुळे, हेच दुखणे काही कमी नाहीत. त्यात आणखी प्रश्‍न वाढवून घेण्याची इच्छा आमदारांची दिसत नाही. म्हणून तर दाखवायला का होईना त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांना सोबत घेतले आहे. अर्थात वाकचौरे आणि पिचड गट यांच्यात कधीही जमले नाही. त्यामुळे, वाकचौरे यांचे गंगेत घोडे न्हाले आहेत. पण, हौसाने केला पती अन त्याला झाली रगपिती हे आमदारांसाठी वापरलेले वाक्य आजून देखील लोक विसलले नाहीत.

आता जालिंदर वाकचौरे यांचा विषय निघालाच आहे. तर, सहज आठवण होते. की, त्यांना अगस्ति कारखान्यातून पिचड साहेबांनी कोढून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच पिचड साहेबांनी जेव्हा भाजपात प्रेवश केला तेव्हा हेच वाकचौरे पहिल्या रांगेत उभे राहून त्यांचे स्वागत करीत होते. त्यांच्यासाठी सभा गाजवत होते. दरम्यान, अगस्ति कारखान्याच्या दोन वर्षापुर्वीच्या वार्षीक अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणविस यांचे फोटो नव्हते. तर, किती गदारोळ केला होता. त्यानंतर यंदाच्या अहवालात हे फोटो घेण्यात आले आहेत. मग, हीच तत्परता त्यांनी आमदार साहेबांच्या बाबत का बाळगली नाही? आमदारांनी छापलेली पत्रके, बॅनर आणि सोशल मीडियात अशा कशात मोदी, शहा, आठवले, शिंदे नाहीत. तरी देखील एक सुद्धा सभेत साधा ब्र शब्द काढाला तयार नाहीत. त्यामुळे, त्यांचे पक्षप्रेम यावर खुद्द भाजपावाल्यांनी देखील लाजिरवाण्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अकोले तालुक्यात खा. रामदास आठवले यांच्या गटाचे किमान सहा सात हजार मतदान आहे. तर, आंबेडकरी चळवळीला माणणारे किमान २५ ते ३० हजार पेक्षा जास्त लोक आहेत. त्यामुळे, किमान महायुती म्हणून तरी यांची मोट बांधने गरजेचे होते. पण ते देखील आमदारांना जमले नाही. आज आमदारांनी अशीच ताठर भुमिका घेतल्याने महायुतीत रिपाई त्यांच्या सोबत नाही. एकनाथ शिंदे गटाची शिवसेना सोबत नाही. विशेष म्हणजे निवडणुकीत एक एक मताला किंमत असते. पण, त्याचे मुल्य आमदारांना नाही. मी म्हणेल तेच खरे अशी भुमिका घेतल्याने त्यांचा पराभव खरोखर त्यांना दिसू लागला आहे की काय? असा प्रश्‍न पडतो. रिपाईचे विजय वाकचौरे, राजेंद्र गवांदे, रमेश शिरकांडे यांनी स्पष्ट सांगितले आहे. की, आम्ही डॉ. किरण लहामटे यांच्यासाबत काम करणार नाही. अर्थात रामदास आठवले यांचे स्वत:ला मंत्रीपद मिळाले म्हणजे पुरे.! ही भुमिका असल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन होते. मात्र, कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आज देखील भाजपाचा विचार मान्य नाही. त्यामुळे, त्यांनी महाविकास आघाडीला साथ देण्याचे ठरविले आहे. अर्थात डॉक्टरांपासून एक एक करुन कायर्र्कर्ता दुर गेल्याने तेच त्यांच्या पराभवाला जबाबदार राहणार आहे.