बाई,,,काय प्रकार.! कॉलेज समोर वेश्या व्यवसायावर छापे.! पाच जणांवर गुन्हे दाखल.! संगमनेरच्या कुटणखान्यात अकोल्याचे ग्राहक.!

सार्वभौम (संगमनेर)-

संगमनेर शहरात पोलिसांनी एकाच वेळी दोन वेश्या व्यवसायांवर छापे टाकले. यात पहिला छापा शारदा बेकरी निर्मल नगर परिसरात आणि दुसरा छापा राजूर रोड घुलेवाडी परिसरात टाकला. यात कुंटणखाना चालविणार्‍या दोन महिला आणि एक पुरूष तसेच ग्राहक म्हणून आलेले हिवरगाव पावसा आणि पिंपळगाव निपाणी येथील एक तरुण अशा पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. ही कारवाई गुरूवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकारणी पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. तर अकोल्यात देखील कॉलेजच्या समोर एका गाळ्यात गेल्या काही दिवसांपासून  असाच घाणेरडा प्रकार चालु होता. त्यावर पोलिसांनी छापा टाकून किरकोळ कारवाई केली होती. त्यानंतर हा घाणेरडा प्रकार बंद झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, शारदा बेकरी निर्मल नगर परिसरात एक महिला वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार केले आणि काही बनावट ग्राहक तयार करुन त्यांनी शरीर सुखासाठी एका महिलेची मागणी केली. त्यानंतर आरोपी महिला आरती किरण मोरे हिने ठरल्या प्रमाणे रक्कम ताब्यात घेतली आणि एका पीडित महिलेस  पोलिसांच्या बनावट ग्राहकाच्या ताब्यात दिले. याच वेळी पोलिस आत घुसले असता त्यांनी आपली ओळख सांगितली आणि संबंधित ठिकाणाची झडती घेतली. तेव्हा तेथे पिंपळगाव निपाणी, ता. अकोले येथील एक तरुण ग्राहक म्हणून मिळून आला. तेथे पोलिसांनी ६१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, संगमनेर शहरालगत घुलेवाडी परिसरात राजापूर रोडवर एका बंगल्यात देखील वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे देखील बनावट ग्राहक पाठविले. त्या ठिकाणी धिरज नवनाथ भागवत (साठेनगर, घुलेवाडी, संगमनेर) व सोनाली जालिंदर गुंजळ ही दोघे कुंटनखाना चालवत असल्याचे लक्षात आले. जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तेथे हिवरगाव पावसा येथील एक तरुण मिळून आला. तर, एक पीडित महिला देखील संबंधित बंगल्यात मिळून आली. त्या ठिकाणी कुंटनखाना सुरू असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून तेथून ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोन्ही प्रकरणात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. तर, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.  

घ्या शटर खाली...!!

अकोले कॉलेजच्या परिसरात एका गाळ्यात दुकानाच्या नावाखाली अक्षरश: धंंदा मांडला होता. कॉलेजच्या तरुण तरुणींना अर्धा पाऊन तासासाठी गाळा खाली करून द्यायचा, दुकान मालकाने दोनचार जोड्यांना आत सोडायचे आणि नंतर शटर खाली घेऊन आत नको तो भारभार चालत होता. ही माहिती जेव्हा अकोले पोलिसांना समजली. तेव्हा त्यांनी रंगेहाथ तीन जोड्या पकडल्या होत्या. यातील कळस आणि नवलेवाडी येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांचा पोलिसांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. अल्पवयीन मुली आणि प्रेमाच्या नावाखाली घाणेरडे चाळे आणि ते देखील कॉलेजच्या समोरील गजबजलेल्या परिसरात, हे म्हणजे मोगलाई माजल्यासारखी कृती झाली. पोलिसांनी प्रसाद दिल्यानंतर गाळ्याचे शटर आता बंद होणे बंदच झाले आहे. तर, अकोल्यातील काही ठिकाणी वार पाहून वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे बोलले जात आहे.