टायगर अभी जिंदा हैं - तर टायगर दिसेल तेथे गोळ्या घाला, संगमनेरात टायगर पिंजर्‍यात कोंडून खाली नेवून सोडले.!

सार्वभौम (संगमनेर)-

गेल्या काही दिवसांपुर्वी संगमनेर तालुक्यात टायगरने हल्ले करुन अनेकांना जखमी केले होते. त्यामुळे, टायगरची फार दहशत निर्माण झाली होती. त्याचा अनेकांनी इतका धसका घेतला होता. की, लोक घराबाहेर निघत नव्हते. आज वन्य टायगरची दहशत संपली असून लोणीच्या टायगरची राजकीय दहशत संगमनेरात वाढली आहे. दक्षिणेत ज्याची शिकार संगमनेरने केली तोच चवताळून येथे डरकाळ्या फोडताना दिसत आहे. की, टायगर अभी जिंदा हैं.! पण, टायगरची दहशत अती होत असेल, तो जनतेच्या "मानगुंटीवर" बसत असेल तर तो दिसेल तेथे गोळ्या घाला असे आदेश दिले होते. त्यामुळे, वन विभागाने गोळ्या नाही घातल्या, पण टाईगर अलगद पकडले आणि खाली त्यांच्या हाद्दीत नेवून सोडले. त्यामुळे, ही जनता टायगरला अलगद बाजुला करते की तळेगाव, साकूर आणि हिवरगाव पावसा प्रमाणे हजारोंची गर्दी करून डरकाळ्यांचा आनंद घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संगमनेरचे नेते दहशत आणि दडपशाही करत असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहे. मात्र, स्वत:ला टायगर म्हणून घेताना माणसापेक्षा टायगर जास्त दहशत निर्माण करतो हे विसरुन कसे चालेल? अर्थात हे संगमनेर तालुक्यातील जनतेने पाहिले आहे. की, गेल्या दोन महिन्यात किती व्यक्तींवर हल्ले केले. अनेकांचे जीव देखील गेले आहे, अनेकांना अधुपण आले आहे. त्यामुळे, टायगर जिंदा असणे हे निसर्गाचे भुषण असले. तरी मानवी वस्तीला ते पुरक नाही. त्यामुळे, डरकाळ्या फोडणार्‍या टायगरच्या जवळ जाण्याचे धाडत अनेकजण करत नाही. त्यात जखमी किंवा पराभूत झालेला टायगर किती आकांत तांडव करतो हे आजकाल दिसू लागले आहे. तुम्ही दोन ठेऊन द्या मग 

आता खरोखर संगमनेर तालुक्यात टायगर भर दिवसा हल्ले करत होता, लोकांवर दहशत करीत होता. लोकांचे बळी घेत होता तेव्हा खुद्द संगमनेरच्या नेत्यांनी वनमंत्र्यास फोन करुन आदेश घेतला होता. की, टायगर दिसेल तेथे त्याला गोळी घाला. त्याला जखमी करा आणि सुरक्षित ठिकाणी सोडून द्या. त्यानंतर संगमनेरचे वनरक्षक फार तल्लख होते. त्यांनी टायगर पिंजर्‍यात पकडले आणि सुरक्षित ठिकाणी नेवून सोडले. आता संगमनेरात राजकीय टायगर हौदोस घालत आहे, दहशत निर्माण करीत होता, डरकाळ्या फोडत होता, लोकांच्या मनात भिती घालत आहे. मग यावर उपाय काय? तर संगमनेर तालुक्यातील नेत्याना सांगितले आहे. मी राज्याचे काम पाहतो आहे. त्यामुळे, येथील जनतेचे रक्षण करणे, त्यांना सुरक्षित वाटेल असे स्थान देणे, जात, धर्म, पंथ या गोष्टी संगमनेरच्या जंगलात रूजणार नाही याची काळजी घेणे. असे म्हणत संगमनेरच्या जनतेला त्यांना विश्‍वास दिला आहे. की, लवकरच यांचा देखील बंदोबस्त केला जाईल. फक्त राज्यात मविआचे सरकार येण्यास काही दिवस बाकी आहे. फक्त असल्या डरकाळ्यांनी कोणी घाबरून आणि विचलित होऊ नये.

टायगर का चवताळला आहे?

टायगरची शिकार यापुर्वी पारनेरकरांनी केली आहे. मात्र, त्या शिकार्‍याचे कर्तेकरविते गुरू संगमनेर येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे, बदल्याची भावना म्हणून टायगरने नगर, राहाता, लोणी, कोपरगाव, नेवासा, कर्जत, जामखेड, पाथर्डी शेवगाव अशा ठिकाणी जिंदा होण्याचे सोडून संगमनेरात जिंदा होण्याचा अट्टाहास केला आहे. मात्र, टायगरला पाहण्यासाठी सगळ गाव येत असला तरी टायगरच्या मागे उभे राहण्याची वेळ आली. की, टांगा पलटी घोडे फरार असेच चित्र दिसणार आहे. त्यामुळे, या केवळ वायफळ डरकाळ्यांनी संगमनेरची जनता घाबरणार नाही. येणार्‍या महिनाभरात तुमचा टायगर खालच्या भागात सही सलामत सोडून दिला जाईल. काळजी नसावी..!!