बिबट्याचा पुन्हा हल्ला, मका तोडण्यासाठी गेलेल्या महिलेच्या नरडीचा घोट घेतला.! देवगाव येथील घटना.! वन विभागाच्या हालगर्जीपणाचा बळी.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे पानोबा वस्तीवर मका तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर नरभक्षक बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये ४० वर्षीय महिलेच्या मानेवर व डोक्यावर दात लागल्याने ती जागीच ठार झाली आहे. ही सर्व धक्कादायक घटना आज शुक्रवार दि.११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. योगीता आकाश पानसरे (वय ४० रा. देवगाव, ता. संगमनेर) ही मयत झाली आहे. या घटनेमुळे देवगाव परिसरात एकच शोककळा पसरली आहे. याच गावात महिन्यापूर्वी महिलेचा नरडीचा घोट याच वाघाने घेतल्याचे बोले जात आहे. हा वाघ काल सकाळी देखील याच वस्तीवर निघाला होता. यासंदर्भात वनरक्षक अधिकारी यांना फोन करून व्हिडीओ देखील टाकला होता. मात्र, वन अधिकारी यांनी या व्हिडीओकडे दुर्लक्ष केले. काल या गावकऱ्यांची वनाधिकाऱ्यांनी दखल घेतली असती तर आज या निष्पाप महिलेचा बळी गेला नसता. त्यामुळे, संतप्त गावकऱ्यांनी वनअधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावकऱ्यांची जोर धरू लागली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवगाव गावात पानोबा वस्ती आहे. तेथे हे छोटेसे कुटुंब राहते. मयत योगीता व पती आकाश यांना तीन मुले आहेत. ते शेती करून दुग्ध व्यवसाय करतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दररोज प्रमाणे आज देखील काम सुरू होते. सकाळी गायांना चारा-पाणी केले. त्यानंतर स्वयंपाक करून मुलांना डबा करून दिला. सर्वजण आपल्या आपल्या कामावर गेले. त्यांनी पुन्हा गायांचा चारा पाणी केला.
दरम्यान, घरातील सर्व कामे आवरून ती महिला घरा शेजारी असणाऱ्या मकेच्या शेतात गेल्या. तेथे आजूबाजूला शेती आहे. झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात आहे. वस्तीच्या कडेला मकेची शेती असल्याने तेथेच हा बिबट्या दबा धरून बसला होता. त्याची चाहुल कोणाला ही लागली नाही. मयत योगीता या त्यांच्या कामात व्यस्त होत्या. वाघाने या महिलेला एकटीच असल्याचे पाहिले आणि आपला डाव साधला. घरा शेजारील मकेच्या शेतातून आला आणि मयत योगीतावर झडप मारली. मागे फिरून पाहण्यासाठी देखील वेळ दिला नाही तेच बिबट्याने महिलेवर पाठीमागून हल्ला करत तिच्या नरडीचा घोट घेतला. हा सर्व प्रकार वस्तीवरील माणसांनी पाहीला.
दरम्यान, मकेच्या शेता शेजारी घास कापणारे काही महिला होत्या. त्यांनी हा आवाज एकला त्यानंतर महिलांनी आरडा ओरड केला. मकेची शेती ही मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने आतमध्ये जाण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती. या महिलेला पन्नास मीटर पर्यंत वाघाने जबड्यात धरून ओढीत नेले. वस्तीवरील माणसांनी मोठ मोठ्याने आवाज केल्याने बिबट्यापासुन या महिलेची सुटका केली. मात्र, तोपर्यंत ४० वर्षीय महिलेने जीव गमावला होता. या महिलेला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा या महिलेला डॉक्टरांनी मयत घोषीत केले.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात बिबट्यांनी आता हैदोस घातला आहे. भर दिवसा गावात प्रवेश करणे, वाडी वस्तीत घुसून मानसे व जनावरे यांच्यावर हल्ले करणे. हा फार मोठा अतिरेख होऊ लागला आहे. यात वन विभाग मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असून आम्ही काय करु शकतो अशा प्रकारची उत्तरे देत आहेत. त्यामुळे, भर दिवसा बिबट्या शहरात फिरावा अशी इच्छा वन विभागाची आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागल आहे. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. मात्र, सकाळीच लोक दुध घालण्यासाठी येतात, त्यांना रोज बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे, वेळीच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.