उमेदवार अमोल खताळ यांचे स्टेटस ठेवल्याने एका बुक्कीत दात पाडून टाकले, मुंडके पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न 6 जणांवर गुन्हे.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात धांदरफळ घटने नंतर आता पुन्हा मिर्झापुर येथे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचे स्टेटस ठेवतो म्हणुन रॉड व काठ्यांनी मारहाण करून दात तोडले. तसेच दंडाच्या पाण्यात डोके धरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ९:३० वाजता घडली. यामध्ये आरोपी विजय ज्ञानेश्वर वलवे, गीताराम सयाजी वलवे, राहुल चंद्रभान वलवे, कैलास गणपत वलवे, बाजीराव रामनाथ वलवे,तन्मय विजय वलवे (सर्व. रा. मिर्झापुर, ता. संगमनेर) यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस करत आहे. खरंतर, जस - जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे. तसे वादाच्या घटना घडत आहे. किरकोळ वाद टोकाला जाताना दिसत असल्याने प्रशासनाने सर्वांना शांततेचे आव्हान केले आहे.
याबाबत पंढरीनाथ वलवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, १६ नोव्हेंबर रोजी पाण्याचे बारे देण्यासाठी शेतात गेलो होतो. तेथे शेतात पाणी अचानक बंद का झाले म्हणुन बॅटरी लाऊन पाहत असताना शेताच्या शेजारी असलेल्या पाईप वरून गाडी घातलेली पहिली. विजय वलवे यांची चारचाकी गाडी नं.एम. एच.१४,इ. सी.८७३६ ही सफेद रंगाची गाडी दिसली. त्यावेळी, फिर्यादी पंढरीनाथ वलवे यांनी आरोपी विजय वलवे यांना गाडी पाईपावरून का घातली? याबाबत विचारणा केली असता विजय वलवे, गीताराम वलवे, राहुल वलवे असे गाडीतुन उतरून विजयने फिर्यादी पंढरीनाथ वलवे याची गच्ची धरली आणि शिविगाळ, दमदाटी करीत मारहाण करायला सुरुवात केली.
दरम्यान, तु विरोधात काम काम का करतो? भाजपचे व अमोल खताळ यांचे स्टेटस का ठेवतो? असे म्हणुन दोन कानाखाली मारल्या. तसेच आरोपी गीताराम व राहुल हे म्हणाले. की, गाडीतुन काट्या व रॉड बाहेर काढा. याचा कार्यक्रम करू असे म्हणाले असता. सिताराम व राहुल यांनी गाडीतील काठी व रॉड काढुन फिर्यादी पंढरीनाथ याच्या पाठीवर व उजव्या हातावर मारले. त्यावेळी अंधारात बांदावर उभे असलेले आरोपी कैलास वलवे, बाजीराव वलवे व तन्मय वलवे हे अंधारात येऊन त्यांच्या हातातील काठीने डोक्यावर मारहाण केली. आरोपी कैलास व बाजीराव यांनी फिर्यादी पंढरीनाथ यांना खाली पाडून तु अमोल खताळ यांचे स्टेट्स ठेवतो का असे म्हणुन पाठीत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
दरम्यान, तेथे शेतात दंडाने पाणी चालू होते. आरोपी विजय वलवे याने फिर्यादी पंढरीनाथ याचे मुंडके दंडात दाबुन धरले. आज तुला संपवून टाकतो असे म्हणुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ केली. या वादात फिर्यादी याच्या तोंडाला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने दात तुटल्याचे दिसत आहे. फिर्यादी पंढरीनाथ याला खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपी विजय ज्ञानेश्वर वलवे, गीताराम सयाजी वलवे, राहुल चंद्रभान वलवे, कैलास गणपत वलवे, बाजीराव रामनाथ वलवे,तन्मय विजय वलवे (सर्व. रा. मिर्झापुर, ता. संगमनेर)यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.