वैभव पिचड भाजपाला मदत करण्यासाठी उभे राहिले, पण जनता स्विकारणार नाही, मी अमितला १० हजारांचे लिड पठाराहून देणार- भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात
सार्वभौम (अकोले)-
अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे. या तालुक्याने कधीच भाजपाला स्विकारले नाही आणि भाजपाला मदत होईल असे देखील काम केले नाही. त्यामुळे, वैभव पिचड हे भाजपाला मदत करण्यासाठी उभे राहिले असून जनता त्यांना स्विकारणार नाही असे सुचक विधान बाळासाहेब थोरात यांनी पिचडांचे नाव न घेता केले. लोक शेतमाल, महागाई, बेरोजगारी,़ जातीयता, फोडाफोडी अशा गोष्टींना कंटाळले आहेत. त्यामुळे, आता लोकांना महाविकास आघाडी पाहीजे आहे. राज्यात आपले सरकार येणार आहे. मी अमित भांगरे यांनी पठार भागाहून १० हजार मतांचे लिड देणार आहे असे राज्याचे भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. ते महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे (चिन्ह-तुतारी वाजविणारा माणूस) यांच्या प्रचार सभेची सांगता करण्यासाठी अकोल्यात आले होते.
लाडक्या बहिनींना प्रतीमहिना ३ हजार मिळणार.!
शिंदे फडणविस आणि पवार सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना सुरू केली. त्याचा हेतू फक्त महिलांची मते ७ हजार ५०० रुपयात खरेदी करण्याचा होता. यांना योजना सुरू करायची होती. तर यांनी सरकार स्थापन झाल्या-झाल्या का सुरू केली नाही? हे पुर्ण फसवे सरकार आहे. यांच्या चुकीच्या नियोजनामुळे महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली आहे. केवळ तीन चार महिन्यात लाडक्या बहिनीची योजना राबविण्यासाठी १ लाख ३० हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. केवळ नियोजन नाही म्हणून महाराष्ट्र कर्जाच्या खाईत यांनी लोटला आहे. जेव्हा महाविकास आघाडी सरकार येईल तेव्हा प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध प्रोग्राम केल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यामुळे, महायुतीच्या भंपक घोषणांना बळी पडू नका असे ते म्हणाले.
टक्केवारीचा पैसा निवडणुकीसाठी वापरात.!
भाजपाचे सरकार म्हणाले होते. प्रत्येक वर्षी राज्यातील दोन लाख तरुणांना रोजगार निर्माण करुन देऊ. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु, शेतकर्यांची कर्जमाफी करू, शेतमालास हमीभाव देऊ, महागाई कमी करू, अशी अनेक अश्वासने दिली होती. पण, यातले एक तरी वचन त्यांनी पुर्ण केले का? तर मुळीच नाही. उलट महाराष्ट्रातील कंपन्या त्यांनी गुजरातला पाठविल्या, नोकर भरत्यांमध्ये घोटाळे केले, आवश्यक त्या भरत्या लवकर घेतल्या नाही. महाराष्ट्रात नवे प्रकल्प आणले नाही, शेतकर्यांच्या मालाचे पाणी केले, कर्जमाफी केली नाही, स्वयाबीनचे भाव शुन्य झाले, खाद्यतेलाचे भाव गगणाले भिडले. उलट भाजपा सरकारने तेल आयात केले, त्यातून टक्केवारी खाल्ली आणि तेच पैसे आता निवडणुकीसाठी वापरत आहे असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केले.
पठारावरून अमितला १० हजारांचे लिड देणार.!
आजवर ज्याला-ज्याला पठार भागाने साथ दिली, त्या प्रत्येक उमेदवाराचा विजय झाला आहे. अमित भांगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही माझी आहे. मी पठार भागावर माझ्या कार्यकर्त्यांना सुचना केल्या आहेत. त्यांचे काय काम चालु आहे त्याचा देखील पाठपुरावा करतो आहे. यावेळी सर्वात जास्त मते देण्याचा प्रयत्न असणार आहे. अमित भांगरे यांना मत म्हणजे पुरोगामी विचारांना मत आणि डॉ.लहामटे व अन्य उमेदवारांना मत म्हणजे भाजपाला मत जाणार आहे. मला विश्वास आहे आणि अभिमान देखील आहे. की, हा अकोले तालुका भाजपाला कधीच मतदान करीत नाही. तसेच जो उमेदवार भाजपाला मदत होईल म्हणून उमेदवारी करतो. त्याला देखील मत देत नाही हा देखील येथील इतिहास आहे. त्यामुळे, अमित भांगरे यांचा आजच विजय झाला असे मला वाटते.
बटेंगे तो कटेंगे.! हे विसरु नका...
आता महायुतीच्या हातून निवडणुक निघुन गेली आहे. महाराष्ट्रात ज्यांनी-ज्यांनी सर्व्हे केले. त्यांनी-त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता येणार असे सांगितले आहे. अनेक एक्झीट पोल महाविकास आघाडीचे आहेत. त्यामुळे, शिंदे, फडणविस, पवार हे महागाई, रोजगार, कर्जमाफी, हमीभाव, दरवाढ अशा कोणत्याच मुद्द्यांवर बोलत नाही. फक्त लाडकी बहीण योजना पुढे करून लोकशाहीतील मते विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता लाडकी बहीण देखील त्यांना मतदान करणार नाही हे लक्षात येताच. त्यांनी निवडणुक जाती धर्मावर नेवून घालण्याचा प्रयत्न केला आहे. बटेंगे तो कटेंगे.! असे म्हणत वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यांचा आपल्याप्रती असणारा द्वेष लक्षात ठेवा आणि योग्यवेळी एक नंबर असलेले बटन तुतारीचे असून महाविकास आघाडीला विजयी करा. मविआ हे जातीपातीचे, धर्माचे, पंथाचे राजकारण करत नाही. तर विकासाचे करते असे बाळासाहेब थोरात म्हणाले.