डॉ. लहामटे आणि वैभव पिचड या दोघांनी पवार साहेबांशी गद्दारी केलीय! हे दोघेही टप्प्यात आले असून जनता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार - जयंत पाटील

सार्वभौम (अकोले)-

 गेली ४० वर्षे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी पिचड साहेबांवर प्रचंड विश्‍वास ठेवला होता. मात्र, पुत्र प्रेमापोटी त्यांनी भाजपात जाणे पसंत केले. त्यांची बंडखोरी ही साहेबांच्या जिव्हारी लागली होती. पण, त्यानंतर जेव्हा डॉ. लहामटे यांना पवार साहेबांनी पर्याय म्हणून नेमले. त्यांच्यावर विश्‍वास टाकला. सुशिक्षित आहे, डॉक्टर आहे, यांना जनतेच्या प्रश्‍नांची नस माहित आहे. हे तरी माझ्या विचारांच्या अकोले तालुक्यातील जनतेला धोका देणार नाही. मात्र, डॉ. लहामटे हे देखील येरे माझ्या मागल्या.! अशाच कुळातील निघाले. त्यामुळे, आता वैभव पिचड आणि डॉ. किरण लहामटे या दोघांनी पवार साहेबांचा विश्‍वासघात केला आहे. ही दोघे आता एकाचवेळी टप्प्यात आले असून जनता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असे मत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले. ते अकोले तालुक्यात विधानसभेचा आढावा घेण्यासाठी आले होते.

पुणे ग्रामीण येथून रात्री सभा अटोपल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अकोल्यात आले होते. त्यांनी अकोले तालुक्यातील निवडणुकीचा आढावा घेतला आणि काही सुचना देखील केल्या. त्यावेळी जयंत पाटील साहेब यांनी रोखठोक सार्वभौमशी गप्पा मारल्या. अकोल्यातील जनता ही पवार साहेबांना मानणारी आहे. सलग दोन वेळा आता गद्दारी झाली आहे. त्यामुळे, लोक अमितला साथ देतील आणि लिडने निवडून आणतील असे दिसते आहे. आम्हाला येथील जनतेवर पुर्ण विश्‍वास आहे, येथे पवार साहेबांचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे. त्यामुळे, अकोल्याच्या विचारधारेवर आमचा विश्‍वास आहे असे पाटील म्हणाले. दोन-तीन तास चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी तातडीने हेलिकॉप्टर बोलविले आणि चिचोंडी येथून ते पुन्हा जुन्नर, पर्वती, कात्रज अशा सभांना रावाना झाले.  

सर्वेत अकोल्याची जागा विजयी.!

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार उभे केले आहेत. त्या-त्या ठिकाणी एक सर्वे करण्यात आला आहे. त्यात नगर जिल्ह्याचा देखील सामावेश आहेत. त्यात रोहीत पवार, अमित भांगरे यांच्यासह अन्य काही ठिकाणच्या जागा चांगल्या फरकाने विजयी असल्याचे जयंत पाटील यांच्या बोलण्यातून समोर आले. अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे, येथे भाजपाला बळ देणारे आणि भाजपाला मदत करणारे देखील कधी विजयी झाले नाही हा या तालुक्याचा इतिहास आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे सर्वे सुरू होता. त्यात अमित भांगरे यांची जागा विजयी आहे.

 शरद पवारांचे अकोले तालुक्यावर विशेष प्रेम.!

सन १९९९ पासून ते आजवर अकोले तालुक्याने व्यक्तीश: शरद पवार साहेबांना कधीच दुजाभाव दिला नाही. मधुकर पिचड साहेब पक्षात होते तेव्हा देखील नाही आणि पिचड साहेब पक्षातून निघुन गेले तेव्हा देखील पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक कमी झाले नाही. उलट दुपटीने साहेबांचे कार्यकर्ते वाढले हे आपण २०१९ मध्ये पाहिले. जेव्हा जागा वाटपाचा विषय सुरू होता. तेव्हा पहिल्याच यादीत नो तडजोड म्हणून अकोले तालुक्याच्या जागेचे नाव होते. तेव्हाच लक्षात येते. की, अकोले तालुका हा साहेबांच्या किती भावनेचा आणि विश्‍वासाचा प्रश्‍न आहे. येणार्‍या काळात आता साहेब स्वत: या तालुक्यात लक्ष घालणार आहे. सर्वात जास्त निधी आणि सर्वाधिक काम अमित भांगरे यांच्याकडून करुन घेणार आहे.

मला तर शॉकच बसला.!

माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर बोलताना मा. आमदार डॉ. लहामटे म्हणाले. की, साहेब या तालुक्यात तुम्ही चांगले हॉस्पिटल काढले असते तर तुमच्यावर आणि तुमच्या मुलावर ही वेळ आली नसती. मी अकोले तालुक्याचा कसा विकास करतो आहे. हे पाहण्यासाठी तुम्ही थांबले पाहिजे असे वक्तव्य लहामटे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केले होते. हे सांगितल्यानंतर जयंत पाटील यांना शॉक बसला. विरोध असावा पण तो इतकाही नसावा, एक सुशिक्षित आमदार असे बोलु शकतो. यावर त्यांना विश्‍वास बसला नाही. मात्र, डॉ. लहामटे यांना मदत व्हावी म्हणून वैभव पिचड यांनी उमेदवारी केले ही देखील त्यांनी खंत व्यक्त केली.  

मला वैभव पिचड म्हणाले माघार घेतो.!

माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केल्याचे मला समजले होते. मात्र, पवार साहेबांनी अमित भांगरे यांना उमेदवारी जाहिर केली होती. त्यामुळे, शब्द दिला तो दिला. त्यात बदल नाही. अशा प्रकारची चर्चा झाली असावी. त्यानंतर अमितला सपोर्ट करण्याविषयी चर्चा झाली होती. मी स्वत: वैभव पिचड यांच्याशी संपर्क केला होता. त्यांनी मला सांगितले होते. की, मी माघार घेतो, कार्यकर्त्यांना समजून सांगतो. असे म्हणाले होते. मात्र, नंतर नेत्यांचा दबाव पडला असावा म्हणून उमेदवारी करावी लागली असेल असे पाटील यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. 

रोखठोक सार्वभौमचे कौतुक.!

२०१९ मध्ये देखील सार्वभौमने शरद पवार म्हणून किंवा त्यांचे पुरोगामी विचार म्हणून डॉ. लहामटे यांना साथ दिली होती. आज सार्वभौम विचार जाग्यावर आहेत. डॉ. लहामटे विकासाच्या नावाखाली भाजपाच्या वळचणीला जाऊन बसले. शरद पवार साहेबांनी रोखठोक सार्वभौमचे अंक संग्रही नेले आहेत. बाळासाहेब थोरात, विखे पाटील आणि अनेक बड्या नेत्यांनी आजवर सार्वभौमचे कौतुक केले आहे. तर, रोखठोक सार्वभौम म्हटल्यानंतर स्वत: जयंत पाटील साहेब यांनी सार्वभौमच्या लेखांचे कौतुक केले. त्यानंतर प्रत्येक बातमीला होणारे हजारो आणि लाखो वाचक पाहून सर्व टिमचे कौतुक केले. काही झालं तरी आपले पुरोगामी विचार सोडायचे नाही. सत्ता येते जाते, खुर्ची येते जाते, पक्ष आदलाबदल होतात. पण, विचारांच्या मुल्यांना ठेच लागता कामा नये. याच विचारांचा अकोले तालुका आहे असे म्हणत त्यांनी मार्गदर्शन केले. 

सार्वभौमचे वाचक पाहताना