वैभव पिचड भाजपाची बी टिम.! पिचड साहेबांवर घाणेरडे बोलुन सुद्धा डॉ. लहामटेंना मदत का? आमदारांना पाडायला अमितला पाठिंबा द्या.!

 

सार्वभौम (अकोले)-

हरियानामध्ये भाजपाने कॉंग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी काही अपक्ष उमेदवारांना बळ दिले होते. त्यांना रसद पुरवून वैचारिक उमेदवारांना पाडण्याचा डाव आखला आणि तो यशस्वी देखील झाला. हिच निती भाजपाने अकोले तालुक्यात वापरली आहे. वैभव पिचड हे त्यांची उमेदवारी माघारी घेणार होते. मात्र, त्यांनी डॉ. लहामटे यांना मदत व्हावी म्हणून भाजपाने त्यांना उमेदवारी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे, वैभव पिचड हे भाजपाची बी टिम आहे. त्यांच्यावर भावनिक प्रचारावर जाऊ नका. वाईट या गोष्टींचे वाटते. की, आदरणीय मधुकर पिचड साहेब यांच्या विषयी डॉ. लहामटे हे प्रचंड घाणेरडे बोलतात. तरी देखील लहामटेंना विजयी होण्यासाठी वैभवराव मदत करतात हे दुर्दैवी वाटते. त्यांनी आपला कट्टर विरोधक म्हणून डॉ. लहामटे यांना पाडण्यासाठी अमित भांगरे यांना पाठींबा द्यावा, अजून वेळ गेलेली नाही अशा प्रकारचे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.

आमदारांनी सिलवासाला कंपनी टाकली.!

डॉ. किरण लहामटे यांना शंभर-दोनशे रुपये देऊन तुम्ही सर्वांनी निवडून आणले. मात्र, ते पवार साहेबांसोबत राहिले नाही. म्हणे मला विकास करायचा आहे. मग यांनी कसला विकास केला? यांनी स्वत:चा विकास केला आहे. या आमदारांनी सिलवासा येथे एक कंपनी सुरू केली आहे. जर कदाचित हिच कंपनी अकोल्यात सुरू केली असती. तर, येथील तरूणांना रोजगार मिळाला असता. आता एमआयडीसीच्या नावाखाली हेच तेथे स्वत:च्या कंपन्या टाकणार आहेत. ५० एकरमध्ये साधे गुर्‍हाळ देखील उभे होत नाही. हे एमआयडीसी उभी करण्याचे खोटे अश्‍वासन देत आहे, ही तुमची फसवणुक आहे. अमित भांगरे निवडून आल्यानंतर १०० एकर जागेत मी एमआयडीसी उभी करुन देतो.

लाडक्या बहिनीला ३ हजार, ३ लाख कर्जमाफी.!

लाडक्या बहिनींचे प्रश्‍न १५०० मध्ये सुटणार आहे का? तेलाचे भाव काय आहे? सोयाबिनला बाजार आहे का? मुलांना रोजगार आहे का? गॅसटाकीचे भाव काय आहे? पेट्रोल-डिझेलचे भाव कुठवर नेवून ठेवले आहे? पेसा कायद्याअंतर्गत भरतीचे काय केले? महिला सुरक्षित आहे का? शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या का? शाळा आणि शिक्षण यांची वाट कशी लावली? शेतकर्‍यांची किती बिकट परिस्थिती करुन ठेवली? दुध, स्वयाबीन आणि कांद्याच्या भावाचे काय? असे अनेक प्रश्‍न राज्यापुढे यांनी आहेत. मात्र, यांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. महिलांना पंधराशे रुपये दिले पण अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला. आता आम्ही ३००० रुपये देणार आहोत. मात्र, त्यासाठी नियोजन आणि तरतुद करणार आहोत. त्यामुळे, लाडक्या बहिनी न म्हणता महालक्ष्मी योजना असे नाव देणार आहोत. तर शेतकर्‍यांची २०१९ मध्ये सरसकट कर्जमाफी केली. आता देखील ३ लाखापर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. 

२२ तारखेनंतर महाविकास आघाडीचे सरकार.!

लोकसभेला सर्वांनी पाहिले आहे. महायुतीचे किती हाल झाले. ही सर्व ताकद मायबाप जनतेची आहे. त्यामुळे, येत्या २३ तारखेेला राज्यात देखील महायुतीचे सरकार असणार आहे. आज राज्यात आम्ही फिरतोय तेव्हा लक्षात येते. की, जनतेकडून उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे. सभेंना गर्दी देखील होत आहे. तसेच काही ठिकाणी लोक बोलत नाही. पण, लोकसभेप्रमाणे ते परिवर्तन करुन दाखविणार आहे. त्यामुळे, अमित भांगरे हे येणार्‍या काही दिवसात आपल्याला माझ्या सोबत विधानसभेत दिसणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. असे पवार म्हणाले. 

जिंकण्यासाठी नको, मत खाण्यासाठी उभे रहा.!

पिचड साहेबांना शरद पवार गटाकडून लढायचे होते. पण, पवार साहेबांनी त्यांना नकार दिला. कारण, पवार साहेबांनी अमित भांगरे यांना शब्द दिला होता. दिलेला शब्द पाळायच ही त्यांची खासियत आहे. मात्र, पिचड यांचा विचार नंतर का होईना झाला असता. पण, आता त्यांना भाजपाकडून आदेश आला आहे. त्यांच्यावर पक्षाचा दबाव आहे. तुमच्यावर इडीची कारवाई करू अशी धमकी असावी. त्यामुळे, इतके कट्टर वैर असून देखील त्यांनी डॉ. लहामटे यांना मदत करण्याची भुमिका घेतली आहे. तुम्ही जिंकण्यासाठी नको तर, मते खाण्यासाठी उभे रहा. असा आदेश आल्यामुळे, त्यांना माघार घेतली नाही. अशा प्रकारचे वक्तव्य रोहीत पवार यांनी केले.  

इलेक्शनच्या तोंडावर विकासांचे कौतूक.!

महायुती सरकारने अनेक कामे केली आणि विकास केला, निधी आणला अशा प्रकारची जाहिरात केली जात आहे. मात्र, विकास हे केवळ निवडणुकीतील कौतूक आहे. फक्त आकडे फुगविण्यात आले आहेत. वास्तवात कामे काहीच नाही. अनेक कामांचे फक्त नारळ फोडले आहेत. मात्र, त्याच्या प्रमा नाही की कोणतीही ऑर्डर नाही. त्यामुळे, फक्त दाखवायचे म्हणून कामांना सुरुवात केली आहे. राज्यात ठेकेदारांची फार बिकट परिस्थिती आहे. पैसा नसतांना केवळ मंजुर्‍या दाखवून लोकांना फसविण्यात आले आहे. आता आमदार पडणार आणि सरकार देखील जाणार. त्यावेळी ठेकेदारांची फार बिकट परिस्थिती पहायला मिळणार आहे.

गृहमंत्री बनवलं तर ते गुवाहटीला पळतील.!

राज्यात इडी, सीबीआय आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर आपण पाहतो आहे. राज्यातील भ्रष्टाचार तर फार भयानक आहे, फोडाफोडी आणि गद्दारी आपण पाहत आहोत, नको तेथे सरकारी तिजोरीच्या पैशांचा गैरवापर, जाहिरातींवर अतिरिक्त खर्च, केवळ घोषणांचा पाऊस, ठेकेदारांकडून वसुल केलेला मलिदा अशा अनेक गोष्टींमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे, कदाचित रोहित पवार यांना गृहमंत्री बनविले. तर, ते कोठेही मॅनेज होत नाही, ते मराठी मातीतील असल्यामुळे कधी घाबरत नाही, कोणाच्या दबावाला बळी पडत नाही. त्यामुळे, एकनाथ शिंदे, अजित दादा आणि देवेंद्र फडणविस यांच्या पक्षातील ७० टक्के लोक गुवाहटीला पळुन जातील असे मिश्कील भाषेत पवार म्हणाले. (मात्र, हे सत्य आहे.)