अमोल खताळ यांना निवडून द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संगमनेरकरांना आवाहन, खताळ कर्तुत्ववान तरुण आहे.

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                      संगमनेर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होती. त्यांना काल सभेला उपस्थित राहता आले नसले. तरी त्यांनी शिवसेचे उमेदवार अमोल खताळ यांच्या बद्दल महत्वाचा संदेश व्हिडीओ मार्फत संगमनेरकरांसाठी पाठवलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब व्हिडीओ मध्ये म्हणले आहे. की, संगमनेर विधानसभेत अमोल खताळ यांच्या सारख्या युवा नेतृत्वाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. संगमनेर तालुका टँकर मुक्त करण्यासाठी अमोल यांचे प्राधान्य आहे. आजपर्यंत अमोल खताळ यांनी संगमनेर मतदारसंघाला स्वतःचे कुटुंब मानुन सामाजिक क्षेत्रात काम केले. माजी मंत्री बीजे. खताळ पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन अमोल खताळ हे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतोय. 

एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे अमोल खताळ यांना संगमनेरातील समस्यांची जाणीव आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष झाल्यानंतर वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजना संगमनेर मतदारसंघातील बांधवांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा कौतुकास्पद आहे. त्यामुळे, संगमनेरच्या मायबाप जनतेने अमोल खताळ यांचा विचार करावा. असा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरकरांसाठी पाठवला आहे. तो व्हिडीओ संगमनेरात प्रचंड व्हायरल होत असुन एकनाथ शिंदे साहेबांची संदेशाची संगमनेरात चर्चा होत आहे.

             खरंतर, काल महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांची नवीन नगर रोड येथे सांगता सभा झाली. त्यांना संगमनेरातील सर्वात मोठे मैदान हवे होते. त्यामुळे, ते संगमनेर शहरातील जाणताराजा मैदानाची परवानगी घेण्यासाठी गेले. परंतु, ती मिळाली नाही. कारण, ते आ. थोरात यांनी १५ नोव्हेंबर पासुन परवानगी घेऊन ठेवले होते. त्यामुळे, अमोल खताळ यांना ते मैदान मिळाले नाही. परंतु, आ. थोरात यांनी जेव्हापासून ते बुक केले. तेव्हापासून एकही सभा जाणता राजा मैदानावर झाली नाही. मात्र, येथील प्रस्थापितांनी हा रडीचा डाव खेळुन हे मैदान मिळु दिले नाही. असा आरोप अमोल खताळ यांनी केला. त्यामुळे, आम्ही नवीन नगररोड येथे सभा घेण्याचा निर्णय घेतला. या सांगता सभेला डॉ. सुजय विखे पाटील आले आणि त्यांनी देखील या मैदानावरून आ. थोरात यांच्यावर निशाणा साधला. "हम जहां से खडे होते है, लाईन वहां से शुरू होती है" असे म्हणुन हा जनसामान्यांचा जनसागर रस्त्यावर आलाय. त्यामुळे, येथे परिवर्तनाची नांदी आहे. हे येथील दडपशाहीला पडल्याशिवाय थांबणार नाही. असे बोलत आ. थोरातांवर टीकेची झोड उठवली. या सांगता सभेचा शेवट शेरो शायरीने केली. "महायुती का अमोल खताळ हम सब में से ऐक नेक बंदा है, फडकने वाला संगमनेर में महायुती का झंडा है, गरीब लोगों को साथ लेलो यही यहां का नया फंडा है, क्योंकी टायगर अभी जिंदा है.!

       दरम्यान, अमोल खताळ यांनी माझी उमेदवारी कशासाठी यावरून जनतेला संबोधीत केले. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवन्यासाठी. मंग ते साकुर पठारभागाचे हे टोक ते तळेगाव, निमोण पर्यंतच्या टोकापर्यंत सर्व महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवणार असल्याची ग्वाही दिली. टँकरमुक्त संगमनेर करणार. ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी झाली ती मोडीत काढणार. युवकांच्या रोजगारासाठी एमआयडीसी आणणार. आरोग्यसेवेसाठी ५०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल तयार करणार. मुलींसाठी वस्तीगृहनिर्माण करणार. आजपर्यंत संगमनेरात एकही शासकीय विद्यालय नाही. प्रथमतः उभारणार. आतापर्यंत  माझ्यावर खबऱ्या म्हणुन टीका झाली. पण, टीकेचे कारण येवढेच आहे. की, येथील आमदारांच्या कार्यकर्त्यांचा मी भ्रष्टाचार काढला. ज्यांनी कोट्यवधी रुपये शासनाचे बुडवले त्यांना दंड केला. शोषित लोकांच्या पाठीशी उभा राहिलो म्हणुन या अमोल खताळला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. पण, तुम्ही मायबाप जनतेने मला नेहमी साथ दिली आता फक्त २० नोव्हेंबरला मतदानातून साथ द्या असे मत त्यांनी सांगता सभेत मांडले.