संगमनेरात वृद्धाच्या डोक्यात टणक वस्तू मारुन केली हत्या, पोलीस तपास सुरु, रक्ताच्या थारोळ्यात मिळून आला मृतदेह.!
सार्वभौम(संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील एका वृद्ध व्यक्तीचा ठणक वस्तूने डोक्यात वार करून निघृणहत्या केल्याची धक्कादायक घटना दि.4 व 5 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 ते पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यान झोळे गावातील भर चौकात घडली. यात साहेबराव भिमाजी उनवणे (वय 77,रा. झोळे, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. कुटुंबातीलच व्यक्तीने हा मृतदेह पाहिल्या नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील प्रक्रीया सुरू केली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, झोळे गावात मयत साहेबराव उनवणे हे गेली अनेक वर्षांपासून वास्तव्य करत होते. त्यांची गावातच छोटीशी चहाची दुकान होती. त्यावर आपला उदरनिर्वाह करत होते. जेव्हा मुले मोठे झाली तेव्हा चहाची दुकान बंद केली. ते घरीच बसुन शेतीतील छोटे मोठे कामे करत. अध्यत्माची आवड असल्याने ते मंदीर परिसरात जात होते. काल संध्याकाळी नेहमी प्रमाणे जेवण केले व झोपण्यासाठी घरा समोरील शेड मध्ये आले.
पलंगावर आपले कपडे घेऊन झोपले. घरातील सर्व लोक देखील झोपेत होते. मात्र, जेव्हा सकाळी सहा वाजता उठले तेव्हा साहेबराव उनवणे यांच्या डोक्यावर टणक वस्तूचा घाव दिसला. ते मयत व्यक्तीच्या सुनेने पाहिल्यानंतर ओरडत घरात पळत आली. सर्वांना झोपेतून उठवले व सांगितले की, मामांच्या डोक्यातुन रक्त आले आहे ते काही बोलत नाही. असे सांगितल्याने कुटुंबातील सर्वजण घरासमोरील शेडमध्ये पळत आले. जेव्हा मयत व्यक्तीच्या मुलाने पाहिले असता ते संपुर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते असे प्रथमदर्शी दिसले.
दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचमाना आणि पीएम करण्याची प्रोसिजर पार पाडली. जो काही प्रकार घडला तो अत्यंत भयानक आणि मानुसकीला काळीमा फासणारा आहे. एखाद्या वृद्धाला आशा पद्धतीने कृरतेने हत्या करणे म्हणजे नक्कीच या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. हा खुन नेमकी कोणी व का केला याचे रहस्य कायम असुन पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तर वृद्ध व्यक्तीची हत्या का व कोणी केली याचा शोध पोलिसांनी तात्काळ लावावा अशी विनंती नातेवाईकांनी केली आहे.