पत्नीच्या लफड्यांना कंटाळुन पतीची आत्महत्या, ती म्हणे तु झुंगाळा आहे आत्महत्या कर.! आईची लेकाच्या न्यायसाठी धडपड, पोलिस सहकार्य करेना.!

सार्वभौम (संगमनेर)

संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्‍वर परिसरात एका तरुणाने आपल्या पत्नीच्या बाहेरख्याली पणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचे एक नव्हे दोन-दोन ठिकाणी लफडे असल्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन संबंधित पतीने स्वत:चे जीवण संपविले आहे. याबाबत पीडित मुलाची आई अद्याप पोलीस ठाण्यात न्याय मागत आहे. मात्र, पोलिसांकडून फक्त टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत पोलीस उपाधिक्षक संगमनेर यांना पत्र दिले असून त्यावर अद्याप कोणताही कार्यवाही झाली नसून पोलीस आम्हाला न्याय देत नसल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, कवठे कमळेश्‍वर परिसरात एका तरुणाचा विवाह एक वर्षापुर्वी झाला होता. मात्र, जिच्याशी विवाह झाला तिचे आणि याच्या नात्यातील एका व्यक्तीचे पुर्वीच प्रेम संबंध असल्याचे नंतर निदर्शनास आले. या दोघांना एका ठिकाणी रंगेहाथ पकडल्यानंतर यांनी पत्नीस मारहाण केली आणि असले उद्योग करु नको असे म्हणत समज दिली. मात्र, तीने नवर्‍यास सुनावले की, माझ्याकडून माझे समाधान होत नाही. त्यामुळे, मी असे बाहेर लफडे करते त्याहून पुन्हा वाद झाले आणि संबंधित महिलेने मारहान केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

दरम्यान, वाद झाल्यानंतर संबंधित महिला घुलेवाडी परिसरात राहणार्‍या आपल्या बहिनीकडे गेली. तेथे देखील तिने आपल्या बहिनीचा नवरा गठविला आणि त्याच्याशी चाळे सुरू केले. मात्र, आपला संसार उघडा पडू नये म्हणून तिच्या बहिनीने तिला तेथून काढून दिले. त्यानंतर ती पुन्हा कोपरगाव येथे गेली. तेथे देखील तिच्या सासरी असणारे पहिले प्रेम कोपरगाव येथे भेटण्यासाठी येत होते. तिला सोन्याची अंगठी, महागडा मोबाईल असे गिफ्ट तिला देत होता. तो राजरोस तिला भेटायला जात होता. तर, याबाबत तिच्या पतीला देखील माहित होईल असे मुद्दाम वागत होता. त्यामुळे, तिच्या मयत पतीचे मानसिक संतुलन बिघडत होते. त्याने फाशी घेण्यापुर्वी या व्यक्तीला समजून सांगितले होते. की, तु माझ्या बायकोला भेटू नको, तिचा वापर करु नको. पण, हा व्यक्ती म्हणाला, की तुझी बायको तुझ्या ताब्यात नाही. तुझ्याकडून तिचे समाधान होत नाही त्यामुळे मला काही बोलु नको. हे शब्द मयत झालेल्या व्यक्तीच्या फार जिव्हारी लागले.

दरम्यान, संबंधित पतीने आपल्या पत्नीची भेट घेतली. तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला दोन वर्षाचा मुलगा आहे. उगच संसार उध्वस्त करु नको. मात्र हिने काहीच ऐकले नाही. तु झुंगाळा आहे, तुझ्यात दम नाही असे म्हणून त्याची अवहेलना केली आणि त्यास प्रत्येक वेळी मुलास भेटण्यासाठी गेला की मारहाण केली जात होती. त्याच्या पत्नीचा पहिला प्रियकर देखील यात म्हणत होता. की, तुझ्यात दम नाही, तो दम माझ्यात आहे. त्यामुळे, तु आता जगू नको. आमच्यातील काटा बनू नको, तु आत्महत्या कर म्हणजे आमच्या मार्गातील काटे दुर होतील. हे सर्व प्रकरण पीडित व्यक्तीस असहाय्य होत होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली आणि आपल्या जीवण संपवून आपली पत्नी व जवळचा पाहुना यांच्या अय्याशीची वाट मोकळी केली.

ही आत्महत्या नव्हे.! हत्या आहे...!

मयत व्यक्तीच्या आईने पत्रात म्हटले आहे. की, मी घरात नव्हते, मुलाने गळफास घेतला तेव्हा घर हे आतून लॉक पाहिजे होते. मात्र घराची कडी बाहेरून लावलेली होती. तसेच मुलाच्या गळ्याभोवती एक काळी वायर आणि दुसरी साडी असा दोनदोन गळफास तो एकटा कसा घेऊ शकेल? महत्वाची गोष्ट म्हणजे तो जमिनीपासून पाच फुट वर तरंगत होता. मात्र, पाच फुटाची एक देखील वस्तू घरात नाही. तसेच घराची उंची फार आहे. त्यामुळे, ना शिडी, ना उंच वस्तु मग त्याने आड्याला दोर बांधला कसा? तो फाशीच्या दोरीपर्यंत वर गेला कसा? त्याने बाहेरून कडी लावली कशी? घटना घडल्यानंतर पत्नी आणि तिचे प्रियकर गायब झाला कसा असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहे. त्यामुळे, हा अपघात नसून घातपात आहे. माझ्या मुलास फासावर लटकविले आहे असा आरोप आईने केला आहे.