सु करण्यासाठी बसलेल्या बाळावर बिबट्याचा हल्ला, भाचीसाठी मामाची बिबट्याशी झुंज.! होता मामा म्हणून वाचली भाची...

- सुशांत आरोटे

सार्वभौम (गणोरे)

विरगाव येथील बिबट्याच्या हल्ल्यानंतर आता त्याच परिसरात पिंपळगाव निपाणी येथे खंडोबा डोंगराच्या पायथ्याशी राहणार्‍या किरण केशव खोडके यांच्या भाचीवर बिबट्याने हल्ला केला. मात्र, नशिब बलोत्तर म्हणून तिला काही झाले नाही. बिबट्या मुलीवर झेपावला आणि  त्या क्षणी बिबट्यावर मुलीच्या मामाने झडप मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, एक आवाज, आरडाओरड आणि किंकाळ्या यामुळे भयावह वातावरण तयार झाले आणि बिबट्याने माघार घेत पुन्हा मकाच्या शेतात प्रवेश केला. ही घटना आज गुरुवार दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी पहाट; ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात किरण खोडके किरकोळ जखमी झाले आहेत तर जयश्री नामदेव भुतांबरे (इयत्ती ३ री) ही मुलगी सुरक्षित आहे. या घटनेनंतर वनरक्षक पंकज देवरे यांनी तत्काळ पुढील कार्यवाही सुरू केली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, पिंपळगाव निपाणी परिसरात धांबोडी फाटा येथील स्व. सावळेराव आव्हाड यांच्या वस्तीच्या मागे व खांडोबा डोगराच्या पायथ्याशी किरण केशव खोडके यांची वस्ती आहे. या परिसरात सर्व शेती असून डोंगराच्या भागात काही लपन आहे. त्यामुळे, या भागात बिबट्याचा किंवा अन्य जनावरांचा वावर कायम असतो. कारण, यापुर्वी अशा प्रकारच्या वर्दळी कायम कानावर पडल्या आहेत. अशीच भयान घटना आज पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, जिगरबाज किरण केशव खोडके यांच्या धाडसाने कोणताही अनर्थ घडला नाही.

त्याचे झाले असे. की, काल रात्री खोडके परिवार जेवण करुन झोपला होता. या दरम्यान आज पहाटे किरण केशव खोडके यांची भाची जयश्री नामदेव भुतांबरे हिला लुशंका आली आणि तिने मामाला आवाज दिला. मामाने कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता तिला बाहेर आणले. ती लघवी करण्यासाठी बसली आणि त्या क्षणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत तिच्या दिशेने चाल केली. हे बघताक्षणी तिच्या पाठीशी उभा असलेल्या किरण खोडके यांनी बिबट्याच्या दिशेने झेप घेतली. प्रचंड मोठा आवाज करुन त्यांनी बिबट्याला हकलण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, प्रत्येक व्यक्तीला आपला जीव प्रिय असतो. त्या प्रमाणे बिबट्याने देखील हल्ला करायचा टाईम आणि बिबट्यावर हल्ला होण्याची टाईम एकच झाला. त्याक्षणी त्याने माघार घेतली आणि जवळ असणार्‍या मकाच्या शेतात तो जाऊन बसला. असे म्हणतात, की, होता जीवा म्हणून वाचला शिवा, असेच आज मामा होता म्हणून भाची वाचली असे म्हटल्यास काही वावघे ठरणार नाही. या घटनेनंतर तेथे अनेक लोक जमा झाले. त्यांनी आरडाओरड केली त्यानंतर बिबट्या कोठे गेला हे लक्षात आले नाही. मात्र, या दरम्यान वनविभागाचे अधिकारी पंकज देवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले. की, आज दुपारी येथे पिंजरा लावून प्रतिबंध केला जाणार आहे.

जनजागृती मोहीम सुरू..

गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर गावांच्या जवळ वाढला आहे. गावातील कुत्रे किंवा जनावरे यांना भक्ष करण्यासाठी बिबट्या गावांमध्ये येतो. मात्र, चुकून त्याची भेट मनसांशी झाली तर बिबट्याच्या समोर खाली वाकायचे नाही, त्याची कोणतीही खोड काढायची नाही, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा नाही. बिबट्याची पिले असतील तर त्यांच्या जवळ किंवा त्या परिसरात देखील जायचे नाही. अन्यथा हल्ला होऊ शकतो. घराबाहेर लाईट लावा, मुलांना रात्री घराबाहेर पडू देऊ नका, उघड्यावर शौचास जाऊ नका, बिबट्यांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी विरगाव, गणोरे, देवठाण येथे जनजागृती घेण्यात आली आहे. तर येणार्‍या काही दिवसात तांभोळसह अन्य ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 

- पंकज देवरे (वन अधिकारी)

बिबटे पकडून जंगलात सोडा...

गेल्या काही दिवसांपासून विरगाव, गणोरे, देवठाण, पिंपळगाव निपाणी, तांभोळ अशा ठिकाणी बिबट्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे वनविभागाने येथील बिबटे पकडून ते घनदाट जंगलांच्या ठिकाणी नेवून सोडले पाहिजे. जसा गांडूळ शेतकर्‍यांचा मित्र आहे तसा बिबटे काही मित्र नाही. त्यामुळे, त्यांचे येथे लालन पालन करणे, त्यांची संख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन देणे हे कौतुक बंद केले पाहिजे. शेतकर्‍यांना रात्री अपरात्री शेतात जावे लागते. जो देशाला अन्न देतो त्यालाच बिबटे अन्न म्हणून खाणार असेल तर यावर विचार केला पाहिजे. त्यामुळे, विरगाव, गणोरे आणि आता पुन्हा पिंपळगाव निपाणी येथे बिबट्याने हल्ला केला आहे. यावर वनविभागाने तातडीने उपायोजना केली पाहिजे.

- राजाराम वाकचौरे (विखे फाऊंडेशन)