विरगाव येथे बिबट्या मादीचा चौघांवर हल्ला, बिबट्याचे पिल्लु पकडले, मादीचा शोध सुरू.! सावधान मुले व वृद्धांनी बाहेर पडू नका.
सार्वभौम (विरगाव) :-
अकोले तालुक्यातील विरगाव येथे आज पहाटे बिबट्या मादीने तीन व्यक्तींवर हल्ला केला. यात तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. तर, अत्यावस्थेत असणार्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. यात बस्तिराम रामचंद्र गांगड (वय ३५) माधव पोपट देशमुख (वय ४० रा. विरगाव, ता. अकोले) या दोघांवर हल्ला केला असून ते उपचार घेत आहेत. तर संदीप लक्ष्मण वाकचौरे आणि सार्थक संदिप वाकचौरे या दोघांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते प्रसंगावधान राखून पळाले. त्यामुळे, दैव बलोत्तर म्हणून त्यांना कोणतीही ईजा झाली नाही. त्यामुळे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे, देवठाण, तांभोळ, गर्दनी या गावांमध्ये राहणार्या नागरिकांनी, लहान मुलांनी काळजी घ्यावी, जनावरे देखील बाहेर बांधू नये. कारण, या मादीस पिल्ले झाली असून ती पिल्ले जिकडे जातील तिकडे मादी जाते. या दरम्यान कोणी दिसेल त्यांच्यावर हल्ला करते आहे. यातील एक पिल्लू वनविभागाने पकडून नेले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, विरगाव येथे बस्तिराम रामचंद्र गांगड हे शेतात काम करीत होते. त्यावेळी जवळच्या गिन्नी गवतात काहीतरी हलचाल झाली. मात्र, कुुत्र वैगरे असे म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, काही क्षणात तेथून काही बिबट्याची पिल्ले बाहेर आली. त्यानंतर लगेच मादी आली आणि तिने बस्तिराम यांच्यावर हल्ला केला. मात्र, त्यांनी जीव मुठीत धरून स्वत:ची सुटका केली. मात्र, तरी देखील त्यांच्या हाताचा लोचका तोडला. तर काही ठिकाणी चांगलेच दात लागले आहेत.
दरम्यान बस्तिराम यांच्यावर पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला होता. त्याची चर्चा चालुच होती कोठे नाहीतर त्या पाठोपाठ माधव पोपट देशमुख हे तेथे गेले असता बिबट्याची पिल्ले त्याच परिसरात खेळत होते. देशमुख यांना पाहून मादीने त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांच्यावर देखील हल्ला करीत देशमुख यांना जखमी केले. त्यांनी देखील मोठ्या धाडसाने मादीच्या ताब्यातून सुटका करीत स्वत:चा जीव वाचविला. त्यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा सर्व हल्लेचा प्रकार सुरू असताना संदीप लक्ष्मण वाकचौरे आणि सार्थक संदिप वाकचौरे हे त्यांच्या शेतात असताना त्यांना देखील मादी बिबट्याने पाहिले. तिला वाटले की, हे देखील आपल्या पिलांवर हल्ला करण्यासाठी आले आहेत. काही झाले तरी आई म्हणून बिबट्या मादीने त्यांचे संरक्षण करण्यासाठी या वाकचौरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांनी देखील तत्काळ तेथून पळ काढला आणि आपला जीव वाचविला. त्यानंतर तेथे वन विभागाला पाचारन करण्यात आले होते. त्यांनी एक बिबट्याचे पिल्लू गिनी गवतातून ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाची सुचना
बाळासाहेब कडलग यांच्या गीन्नी गवतात बिबट्याची लहान पिले आढळली असून पिले जिकडे जातील तिकडे बिबट्याची मादी जात आहे.. पिलांना कुठल्याही प्रकारचा धोका वाटल्यास मादी तातडीने हल्ला करते.. आणि तो हल्ला गंभीर जखमी करणारा किंवा प्राणघातकही होऊ शकतो.. त्या परिसरातील सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.. वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी त्या परिसरात येत आहेत. मा.आमदार किरण लहामटे यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे तातडीने सूचना दिलेल्या आहेत.. संबंधित अधिकारी घटनास्थळावर येत असून त्यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. वन अधिकारी व कर्मचारी हे ही माणसेच असुन त्यांना सहकार्य करावे. शाळा भरण्याची वेळ झाली असून त्या परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवत नका.. किंवा पाठवायचे असेल तर चार चाकी वाहनात पाठवा..
ग्रामसुरक्षा यंत्रणा वीरगाव
वनविभागाने गणोरे व पंचक्रोशीतील गस्त सुरू करून परिसरात जनजागृती करणे अत्यंत गरजेचे बनले आहे त्याचे कारण ह्या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून, पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा. जखमींना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.तसेच त्यांच्या औषध उपचारांचा खर्च शासकीय खर्चातून करावा. परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा.
-- सुशांत आरोटे
(तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले