भाजपाचा नगरसेवक हितेश कुंभार याने काढली 8 वीच्या विद्यार्थीनिची छेड, खंडणी नंतर पुन्हा पोस्कोचा गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (अकोले) :-

                                 भाजपाकडून अकोले नगरपंचायतीवर नगरसेवक म्हणून निवडून गेलेला हितेश कुंभार (रा. मनकर सोसा. अकोले) याने मुंबईलीत खंडणी प्रकरणानंतर आता पुन्हा अकोल्यात गुन्हेगारी सुरु केली आहे. मुंबईतून सुटून आल्यानंतर त्याने आता इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीची छेडछाड काढल्याची धक्कादायक व घृणास्पद बाब समोर आली आहे. तु मला फार आवडतेस असे म्हणून तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. वारंवार तिच्या मागे जाणे आणि टक लावून पाहणे हा प्रकार क्लासच्या शिक्षिकेने पाहिला असता एकच गोंधळ उडाला. मुलगी घाबरुन गेली, मात्र, घरच्यांना सांगितल्यानंतर मुलीस धिर देण्यात आला. त्यामुळे, नगरसेवक हितेश कुंभार याच्यावर काल अकोले पालीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            याबाबत पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. की, ती शाळा सुटल्यानंतर एका खाजगी कोचिंग क्लासेससाठी जात होती. तिच्या सोबत तिची लहाण बहिण देखील होती. आजवर त्यांना कोणताही कटू अनुभव आला नाही. मात्र, गेल्या पंधरा दिवसापासुन ती क्लासेसला जात असलेल्या ठिकाणी भाजपाचा नगरसेवक हितेश कुंभार हा येता जाता पीडित विद्यार्थिनीकडे एकटक बघत होता. परंतु, तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. क्लास सुटल्यानंतर पाटलाग करणे आणि संबंधित मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करणे असा प्रकार वारंवार होत होता. परंतु ती त्याच्याशी न बोलल्यामुळे त्याला वाईट वाटत होते. त्यामुळे तो तिचा पाठलाग करुन तिच्या घरापर्यंत जात होता. या दरम्यान पीडित मुलगी प्रचंड घाबरुन गेली होती. मात्र, घरच्यांना सांगावे तर घरचे लोक मलाच बोलतील, क्लास बंद करतील, पुढे शिक्षण घेऊ देणार नाही. अशी तिची भावना झाली. त्यामुळे तिने हा प्रकार घरी कोणालाही सांगितला नाही.

                     मात्र, नगरसेवक हितेश कुंभार याचे वागणे फार अती होत चालले होते. त्याने शुक्रवार दि. 30 आगस्ट 2024 रोजी सायकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान फार भयानक कृती केली. पीडित मुलगी क्लासला गेली आणि सांयकाळी 7.30 वाजता क्लास सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी क्लास बाहेर आली. तेव्हा हितेश कुंभार हा तिच्या जवळ आला आणि पीडित विद्यार्थीनिचा हात धरून तिला जवळ ओढले. तु मला फार आवडतेस असे म्हणुन तिच्या अंगावरुन हात फिरवला. तिला लज्जा उत्पन्ना होईल असे कृत्य करुन अश्लिल हावभाव करु लागला. तेव्हा तिने तिचा हात हिसकवला आणि घाबरुन ती तेथून पळत सुटली. हा सर्व प्रकार हा कोचिंग क्लासच्या शिक्षिका ह्या तिस-या मजल्या वरुन पाहत होत्या. त्या खाली येईपर्यंत मुलगी घराकडे तर हितेश कुंभार जवळच कोठे दडल होता. पीडित मुलगी घरी भेदरलेल्या आवस्थेत घरी गेली, रडत रडत तिने घडलेला प्रकार आपल्या वडीलांना सांगितला. त्या क्षणी कोणताही विलंब न करता त्यांनी मुलीला सोबत घेतले आणि क्लास गाठला, क्लासच्या परिसरात ते आले असता काही अंतरावर हितेश उभा होता. संबंधित इसम कोण आहे हे पाहण्यासाठी वडिल पुढे झाले. तर तो व्यक्ती भाजपाचा नगरसेवक हितेश कुंभार हा होता.

                      दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी त्यास सदर प्रकाराबाबत जाब विचारला. तू एक जबाबदार नागरिक आहे, नगरसेवक आहे तुला असले कृत्य शोभते का? असा जाब विचारला असता तो काही न बोलता त्याठिकाणावरुन पळून गेला. त्यानंतर, पालकांनी क्लासशी संपर्क केला असता तेथील व्यक्तींनी सागितले की, हा व्यक्ती कायम येथे येत होता, मात्र, लहान लहान लेकरं आणि तो इतका मोठा आणि एक नगरसेवक असल्यामुळे आम्हाला कधी शंका आली नाही. मात्र, आज   मी देखील घाबरून गेल्यामुळे वडिलांसोबत घरी गेले होते व आज त्याने जबाबदारीच्या सर्व मर्यादा ओलांडून टाकल्या आहेत. हा इतका मोठा कलह झाल्यामुळे मुलगी मुलगी फार घाबरुन गेली होती. नगरसेवकाच्या विषयी तिच्या मनात प्रचंड घृणा निर्माण झाली होती. तर, क्लासला जाण्याची देखील भिती वाटत होती. त्यामुळे, तिच्या पालकांनी या नरगसेवकास शिक्षा झालीच पाहिजे असे ठरविले. घटनेनंतर काल पीडित मुलीची मानसिकता ठिक झाली. म्हणून तिने मंगळवार दि. 3 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस ठाण्यात जाऊन नगरसेवक हितेश कुंभार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे खंडणी प्रकरण....

मी भाजपाचा नगरसेवक आहे, तुम्हाला जर बार चालवाचे

असेल तर मला ऑर्केट्रा बारचे पाच लाख, सर्व्हीस बारचे तीन लाख आणि दरमहा २५ हजार अशी रक्कम द्यावी लागेल. अन्यथा तुम्ही कसे बार चालविता हेच आम्ही पाहतो असे म्हणून नगरसेवक हितेश कुंभार याने लाखे रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर मुंबईतील आठ बार चालकांनी बैठक घेतली आणि या नगरसेवकासह तिघांना धडा शिकविण्याची योजना आखली होती. यांनी सगळ्या बारवाल्यांकडून २७ हजार रुपये जमा केले आणि ते यांना देण्यासाठी बोलावून घेतले. यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर थेट कोणगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी भाजपाचा नगरसेवक हितेश कुंभार यांच्यासह तिघांवर सापळा रचला आणि २७ हजार रुपयांची खंडणी घेताना यांना रंगेहात ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी हितेश रामकृष्ण कुंभार (रा. कमानवेस, ता. अकोले, जि. अ.नगर) देवेंद्र चंद्रकांत खुंटेकर (रा. चर्चगेट, मुंबई) आणि राकेश सदाशिव कुंभकर्ण (रा. पोलीस वसाहत शेजारी, ता. अकोले) अशा तिघांना आरोपी करून अटक करण्यात आली होती.