मा. नगराध्यक्षाचा भाऊ अर्धनग्न अवस्थेत नगरपालिकेत घुसला, सर्व महिला थेट अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसल्या, मद्यापान करुन कर्मचाऱ्याचा नंगानाच.!
-सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर नगरपरिषदेत एक निर्लज्जपणाचा कळस गाठलेला घृणास्पद प्रकार घडला आहे. नगरपालिकेचा वायरमन सुनील सहदेव पुंड याने मद्य प्राशन करून भर कार्यालयात नंगानाच केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्याने नगरपरिषद कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत शिरून नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून तुमच्या मुला बाळांना संपवुन टाकीन अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडला. आता ह्या माथेफिरू वायरमनला याचे सुद्धा भान राहिले नाही. की, येथे महिला कर्मचारी असतात. नेमकी त्या दिवशी नगरपालिकेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी व अन्य कामांसाठी अनेक महिला आल्या होत्या महिलांनी हा माथेफिरू पाहिल्यानंतर त्या थेट मुख्यधिकारी यांच्या दालनात शिरल्या. त्यामुळे, नगरपालिकेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी संबंधित व्यक्तीला करणे दाखवा नोटीस काढली आहे. आता या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार की पुन्हा राजकीय वरदहस्त मिळणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्थात वारंवार असे प्रकार याच्याकडून झाल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे, आता म्हतारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नयेे. नशिब.! आज तो अर्धनग्न आला होता... कारवाई झाली नाही तर उद्या तेथे वेगळे चित्र पहायला भेटले नाही म्हणजे देव पावला.!!
दरम्यान, मुख्याधिकारी यांनी काढलेल्या कारणे दाखवा नोटीस मध्ये म्हणले आहे की, तुम्ही अर्धनग्न अवस्थेत नगरपालिकेत का आलात. अशी विचारणा अधिकाऱ्यांनी केली असता तुम्ही त्यांना अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ दमदाटी केली, तुमच्या मुलाबाळांना संपवुन टाकीन अशी धमकी देखील दिली. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असुन कार्यलयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. एकतर आपण कार्यलयात कधीच उपस्थित नसतात. वेळी- अवेळी कार्यलयात येऊन हजेरी पत्रकावर सह्या करतात. तर आपले विभाग प्रमुखांनी सांगितलेले कामकाज तुम्ही करीत नाही. आशा घटना सुनील पुंड यांच्याकडून वारंवार होत असल्याचे कारणे दाखवा नोटीस मध्ये उल्लेख केला आहे.
दरम्यान, कामावर वेळेत न येणे, दिलेले काम न ऐकणे, याबाबत सुनील पुंड यांना मुख्याधिकारी यांनी वेळोवेळी आदेश, नोटीस व तोंडी सुचना देऊनही सुनील पुंड यांच्या वागण्यात कुठल्याही प्रकारचा बद्दल झाल्याचे दिसुन आले नाही. याचा अर्थ सुनील पुंड यांना नगरपरिषदेच्या सेवेची गरज नसल्याचे दिसुन येत आहे. सुनील पुंड यांच्या बेजबाबदारपणाच्या वर्तवणुकीमुळे कार्यलयात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन कर्मचाऱ्यांच्या रोशास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, कर्तव्यात कसुर, बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा, विनापरवाना कर्तव्यावर गैरहजर राहणे, कार्यलयात अर्धनग्न अवस्थेत येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी देणे, शिवीगाळ करणे हे कृत्य सुनील पुंड यांनी नगरपरिषदेच्या कार्यलयीन शिस्तीस बाधा आणणारे कृत्य केलेले आहे. या कारणांमुळे मुख्याधिकारी वाघ यांनी सुनील पुंड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम (1979 प्रमाणे) शिस्तभंगाची कारवाई का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस सुनील पुंड यांना काढुन तीन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. मुदतीत खुलासा सादर न केल्यास पुढील उचित कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. सुनिल पुंड यांनी 23 तारखेला मद्य प्राशन करून अर्धनग्न अवस्थेत जो नगरपरिषदे मध्ये पराक्रम केला त्याबद्दल सुनील पुंड यांचे गैरहजेरी विनावेतन करण्यात आली आहे.
खरंतर, सुनील पुंड या माथेफिरूच्या गैरवर्तनावर आतापर्यंत राजकीय वरदहस्तांनी पडदा टाकण्याचे काम केले. मात्र, त्याचे बावळट चाळे उघडकीस आलेच. शहरात लाईटीचे प्रश्न नेहमी प्रलंबीत असतात हे महाशय तिथे कधी तत्परतेने दिसले नाही. मात्र, मद्य प्राशन करून अर्धनग्न अवस्थेत नगरपरिषदेत जाऊन तिथे शिवीगाळ करण्यास स्वारस्य वाटले. शहरातीलच कर्मचारी एकाच जागी असल्याने यांचे राजकीय पक्षांकडून पाळेमुळे रोवली गेली आहे. त्यामुळे, संगमनेर नगरपालिकेत अनेक कर्मचारी हे कामचुकारपणा करतात. दिवस काढण्याचे काम करतात. यातील अनेकांची वर्षानुवर्षे बदली होत नाही. ते एकाच जागी भुजंग होऊन बसले आहे. त्यामुळे, या राजकीय वरदहस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या होऊन सुनील पुंड सारख्या माथेफीरुंवर उचित कारवाई व्हावी अशी मागणी संगमनेर शहरातील सुज्ञ नागरिक करत आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे सुनिल पुंड यांना विशेष बाब म्हणून सेवेत रुजू करुन घेतले आहे. त्यांचे बंधू नगरपरिषदेत नगराध्यक्ष होते. अशी विशेष बाब नियुक्त व्यक्तीने असे विशेष कृत्य करणे अशोभनिय असल्याच्या भावना संगमनेरातून व्यक्त होत आहेत.