गोमांसची टिप दिल्याने तरुणाची कत्तल करण्याचा प्रयत्न.! रॉडसह तलवार डोक्यात मारली, सहा जणांवर गुन्हा दाखल, संगमनेरात तडीपार व्यक्तीवर हल्ला.!


सार्वभौम (संगमनेर) :- 

                  संगमनेर तालुक्यातुन एक वर्षांसाठी तडीपार झालेला कासिफ कुरेशी या 24 वर्षीय तरुणाला नाशिक वरून संगमनेरात बोलवले. चारचाकीत बसवले आणि समनापूर फाट्याजवळ मोकळ्या प्लॉट मध्ये नेऊन डोक्यात तलवारीने वार करून पायावर लोखंडी रॉडने मारल्याची धक्कादायक घटना बुधवार दि.21 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान समनापूर परिसरात घडली. यामध्ये अब्दुल समद कुरेशी (रा.भारतनगर,ता. संगमनेर), साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी (रा. कोल्हेवाडी रोड, ता. संगमनेर), आयाज हबीब कुरेशी (रा.मदिनानगर,ता.संगमनेर), आकीब हरून कुरेशी (रा.भारतनगर, ता. संगमनेर),तन्वीर अस्लम पठाण (रा.नाईकवाडपुरा, ता. संगमनेर),इस्माईल उर्फ भय्यु नासीर पठाण (रा.नाईकवाडपुरा ता. संगमनेर),नवाज कुरेशी (रा.भारतनगर, ता. संगमनेर) यांच्यावर आर्मक्टसह विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.याचा पुढील तपास पोलीस करत आहे. तर यामध्ये वादाचे कारण अद्याप उघडकीस आले नसले तरी या वादाला गोमांसची टीप दिल्यावरून हा वाद झाल्याची चर्चा संगमनेरात रंगु लागली आहे. कारण, बहुतांश आरोपी हे हिस्टरी रेकॉर्ड वरील आरोपी आहे. त्यामुळे, या वादाला गोमांसची किनार असल्याचे बोले जाते.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी कासिफ कुरेशी या तरुणाला जिल्ह्यातून तीन दिवसांपुर्वी एक वर्षांसाठी हद्दपार केले. तो नाशिक रोड येथील नातेवाईकांकडे राहतो. दि. 21 ऑगस्ट रोजी रात्री 8  वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कासिफ कुरेशीला आरोपी अब्दुल  कुरेशी याचा फोन केला. मला तुझ्याशी बोलायचे आहे तु संगमनेरला ये. फिर्यादी कासिफ कुरेशी हा संगमनेरात 11:30 वाजण्याच्या दरम्यान घरी आला. आरोपी अब्दुल कुरेशी याने फोन करून फिर्यादी कासिफ कुरेशी याला बाहेर बोलवले.  फिर्यादी कासिफ हा बाहेर आल्यानंतर दोन कार घराच्या बाहेर उभी होती. फिर्यादी कासिफ याला गाडी मध्ये बस आपण बाहेर जाऊन बोलु असे बोलुन गाडीत बसवले आणि गाडी थेट समनापूर परिसरात मोकळ्या प्लॉट मध्ये आणली.

          दरम्यान,  तेथे चर्चा सुरू झाली. त्यावेळी आरोपी अब्दुल कुरेशी याने  नवाज कुरेशीला फोन केला. तेव्हा नवाज कुरेशी फोनवर बोला की, फिर्यादी कासिफ याला जिवंत सोडु नका मारून टाका असे सांगितले. तेव्हा आरोपी अब्दूल कुरेशी याने त्याच्या हातातील तलवार फिर्यादी कासिफ कुरेशी याच्या डोक्यात मारली. आरोपी इस्माईल पठाण व अकीब कुरेशी याने फिर्यादी कासिफला पकडुन ठेवले. त्यानंतर अकीब कुरेशी याने पायांवर रॉड मारले.इस्माईल पठाण याने लाकडी दांडक्याने पायावर, पाठीवर मारले.व बाकी सर्वांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी कासिफ रक्तबंबाळ अवस्थेत पडला. त्यानंतर आरोपी इस्माईल पठाण व आयाज कुरेशी यांनी चारचाकी मध्ये बसवुन चक्रपाणी येथे सोडले. त्यानंतर काही तरुणांना फोन करून घरी रक्तबंबाळ अवस्थेत सोडले. त्यानंतर नातेवाईकांनी खाजगी रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या जबाबा वरून अब्दुल समद कुरेशी (रा.भारतनगर,ता. संगमनेर), साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी (रा. कोल्हेवाडी रोड, ता. संगमनेर), आयाज हबीब कुरेशी (रा.मदिनानगर,ता.संगमनेर), आकीब हरून कुरेशी (रा.भारतनगर, ता. संगमनेर),तन्वीर अस्लम पठाण (रा.नाईकवाडपुरा, ता. संगमनेर),इस्माईल उर्फ भय्यु नासीर पठाण (रा.नाईकवाडपुरा ता. संगमनेर) यांच्यावर आर्मक्टसह विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

           दरम्यान, एवढी मोठी घटना होऊन देखील आरोपी मोकाट आहे. संगमनेरात वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कोठे पोलिसांना मारहाण होतेय तर कोठे पुढारी कायदा हातात घेतात. राजरोस चोऱ्या होत असून महिलांची मंगळसुत्रे हिसकवून नेली जात आहेत.  अवैध धंद्यांना उत आला असून शहरात नंग्या तलवारी नाचू लागल्या आहेत. वारंवार कायदा व सुव्यवस्था वेशिवर टांगला जात असून अद्याप गोहत्या मोठ्या प्रमाणावर सुरुच आहे. त्यामुळे, संगमनेरचे गुन्हेगारी ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना उपस्थित केला आहे.