गद्दारी केलेल्या डॉ. लहामटेंना त्यांची जागा दाखविण्यासाठी शरद पवारांनी दंड थोपटले अकोल्यातून अमित भांगरे यांना उमेदवारी.!

सार्वभौम (अकोले) :- 

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाराष्ट्रातील त्यांच्या पक्षाचे दोन उमेदवार जाहिर केले आहेत. त्यात सांगली विधानसभेतून रोहित पाटील आणि अकोले विधानसभेतून अमित भांगरे यांना जाहिर केले आहे. कारण, २०१९ साली सगळ्या विरोधकांची मोट बांधून डॉ. किरण लहामटे यांना शरद पवार यांनी निवडून आले होते. मात्र, त्यांनी आज इकडे तर उद्या तिकडे अशी दुटप्पी भुमिका घेत पवार साहेब यांच्याशी गद्दारी केली होती. त्यामुळे, त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी पवार आज अकोल्यात आले होते. प्रचंड उत्साह आणि हजारो संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायसमोर त्यांनी अमित भांगरे यांना पाठबळ द्या अशी विनंती मतदार बांधवांना केली. अकोल्यातील अलोट गर्दी पाहून शरद पवार भारावून गेले. हा तालुका पुरोगामी विचारांचा आहे. जो कोणी गद्दारी करतो, त्याला जनता धडा शिकविल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे, आता डॉ. किरण लहामटे यांना चांगलाच घाम फुटला आहे.



पवार साहेबांशी गद्दारी करणे म्हणजे राजकीय आत्महत्या केल्यासारखे आहे हे अनेकांनी पाहिले आहे. एकाने गद्दार केली म्हणून डॉ. किरण लहामटे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. हा साधा माणूस आहे. शब्दाला किंमत देईल. मात्र, अकोल्यात येऊन म्हणे मी पवार साहेबांसोबत आणि मुंबईला जाऊन भलतीकडेच बसले. त्यामुळे, ज्यांना कोठे बसायचे हे माहित नाही. त्यांना योग्य ठिकाणी बसवायचे काम येत्या २०२४ च्या निवडणुकीत करायचे आहे. असे म्हणत किरण लहामटे यांचा काटा करण्यासाठी शरद पवार यांनी दंड थोपटले आहे. डॉ. लहामटे यांना पाडण्यासाठी अमित भांगरे या युवा तरुणाला बळ द्या, असे म्हणत त्यांनी अमितराव यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे.

खरंतर विकास म्हणजे निवडणुका नव्हे.! निष्ठे काही मोल आहे की नाही, श्रद्धेला कोठे किंमत आहे की नाही. निधी मिळतो म्हणून गद्दारी स्विकारायची ही अकोले तालुक्याची परंपरा नाही. अन ज्यांनी ही परंपरा स्विकारली त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे, जो कोणी शरद पवार गटाचा उमेदवार असेेेल तोच विजयी होणार हे यापुर्वीच्या निवडणुका आणि आजच्या सभेने दाखवून दिले आहे. हे असे असले तरी डॉ. लहामटे यांची घरी देखील बसण्याची तयारी आहे. जनतेने कौल दिला नाही तरी त्यांना त्याचा फारसा काही फरक पडणार नाही असे ते कायम म्हणत आले आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात शरद पवार यांनी आणखी एक सभा आणि अन्य नेत्यांच्या देखील सभा घेण्याचा मानस भांगरे यांचा आहे. त्यातून अकोल्याचे राजकीय वातावरण पार ढवळून निघणार आहे.

आम्ही भाजपा सोडणार नाही...

दरम्यान, पिचड राष्ट्रवादीत जाणार अशा प्रकारची बातमी सोशल मीडियावर फिरत होती. त्यामुळे, पिचड साहेब हे आजच प्रवेश करणार अशी देखील चर्चा रंगली होती. त्यावर उत्तर देत मा.आ. वैभव पिचड म्हणाले. की, आम्ही कोठेही जाणार नाही. ह्या केवळ अफवा आहेत. आम्ही भाजपात समाधानी आहोत. गेल्या काही दिवसांपासून आमच्या बाबत चुकीच्या माहित्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. मात्र, तसे काही होणार नाही असे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. 

पिचडांवर टिका नाहीच..!

सन २०१९ च्या निवडणुकीत शरद पवार यांनी डॉ. किरण लहामटे यांचा प्रचार करताना माजी मंत्री तथा जुने सोबती मधुकर पिचड यांच्यावर तोंड भरुन टिका केली होती. तालुक्याचा विकास करता आला नाही, निधी आणता आला नाही मग इतक्या दिवस काय गवत उपटत होते का? असे म्हणत त्यांनी टिकास्त्र सोडले होते. यंदा मात्र पिचड साहेब पुन्हा पवार साहेबांच्या सोबत जाणार अशी चर्चा चालु आहे. अशात पवार साहेबांनी डॉ. किरण लहामटे यांना जागा दाखविण्याची भाषा केली. मात्र, मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्यावर शब्दभर देखील बोलले नाही. त्यामुळे, पवार साहेबांच्या डोक्यात काय गणित सुरू आहे. आणि अंतर्गत काय हलचाली सुरू आहे याबाबत शंका निर्माण होते. हे असे असले तरी पिचड साहेब आणि पवार साहेब या दोघांचा उद्देश हा डॉ. लहामटे यांचा काटा करणे हाच असणार आहे. 

सार्वभौसाठी अभिमान...

अकोले तालुक्यातील जनतेच्या काळजावर कोरलेले नाव म्हणजे शरद पवार होय. ते अडिच वर्षापुर्वी शेंडीला आले होते. तेव्हा, व्यासपिठावर असताना त्यांनी दैनिक रोखठोक सार्वभौमच्या विशेष अंकाचे वाचन केले होते. इतकेच काय.! तर तो अंक नंतर मागवून घेत हेलिकॉप्टरमध्ये नेला होता. त्यानंतर आज देखील तब्बल ११ वेळा पेपर हातात घेऊन त्यांनी सार्वभौमच्या लेखांचे बारकाईने वाचन केले. त्याहून विशेष म्हणजे दोन लेखांतील गोष्टी त्यांनी नमुद करुन सार्वभौमच्या पहिल्याच पानावरील लेख जसाच्या तसा मांडला आणि अमित भांगरे यांना लेखातील शब्दानुसार पदरात घेतले. त्यानंतर ते रोखठोक सार्वभौमचा अंक गाडीत घेऊन गेले. अर्थात ही गुणवत्ता सार्वभौमची आहे. प्रचंड अभ्यासू आणि वास्तवदर्श लेख वाचकांच्या मनावर ताबा मिळवितात. त्यात पवार साहेबांचा देखील दोन वेळा सामावेश झाला आहे. अर्थात हे सार्वभौमसाठी अभिमानाची बाब आहे.