तो गडी एकटा निघाला अन हा गडी सर्वांना घेऊन निघाला, मग ठरवा कोणाला मतदान करायचे.!
सार्वभौम (अकोले)-
सह्याद्रीचा राजाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा वचननामा होता. सर्वांस पोटास लावणे आहे. म्हणजे, प्रत्येकाला सोबत घेऊन जायचे आहे. मात्र, दुर्दैवाने त्याच सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या डॉ. लहामटे यांनी जनतेशी गद्दारी केली. २०१९ मध्ये वैभव पिचड यांनी गद्दारी केली म्हणून पर्यायी लहामटे यांना निवडून दिले. पण, हौसाने केला पती, अन त्याला झाली रघतपिती.! त्यांनी देखील गद्दारी केली. बरं केली तर केली. पण, मै शेहनशाह हुँ.! मै हिटलर हुँ.! मी म्हणेल तसेच चालेल अशा अविर्भावात ते चालत राहिले. २०१९ मध्ये परिवर्तन घडविण्यासाठी त्यांच्या सोबत डॉ. अजित नवले, बी.जे.देशमुख, अमित भांगरे, दशरथ सावंत, विजय वाकचौरे, सुनिता भांगरे, महेश तिकांडे, मारूती मेंगाळ, मधुकर तळपाडे, सतिश भांगरे, राजेंद्र कुमकर, सुरेश गडाख, रवि मालुंजकर असे हजारो कायकर्ते होते. मात्र, आज त्यांच्यासोबत त्यावेळचा एक देखील कार्यकर्ता नाही. मी स्वत:च्या हिमतीवर निवडून आलोय. असे म्हणत ते स्वत:ला श्रीकृष्ण समजतात आणि त्यांना निवडून देणार्यांना ते वाकड्या आणि सुदाम्या म्हणून अवहेलनात्मक संबोधतात. त्यामुळे, डॉ. अजित नवले म्हणतात. की, भाऊ..!! तु एकटा होता आम्ही तुला साथ दिली. आता तू निवडून आला, आम्हाला मागे सोडले अन एकटा चालला कुठं.!! तुला नव्हे, तुझ्या उर्मटपणाला एकटे टाकण्यासाठी पुन्हा ही जनता एकवटली आहे.
गडी एकटाच बॅनरवर..!!
पक्षांच्या निवडणुका ह्या एकट्याने होत नसतात, प्रत्येकाला सोबत घ्यावे लागते. मात्र, आपले लहामटे भाऊ भाजपाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तरी देखील ते मोदी, शहा, फडणविस, शिंदे यांचे फोटो बॅनरवर लावायला तयार नाहीत. त्यामुळे, मी एकटा आहे आणि मला कोणाची गरज नाही. असे म्हणत त्यांनी भाजपा व शिंदे गटाच्या नाकावर टिच्चून बॅनर छापले आणि ते लावले सुद्धा. हा विषय इतक्यावरच सिमीत नाही. आपण ज्यांना सहकार महर्षी म्हणतो. त्यांना सुद्धा हे बॅनरहून हद्दापार करतात. तालुक्यातील असे अनेक बॅनर आहेत. ज्यावर सिताराम पा.गायकर साहेब यांचे फोटो नाहीत आणि महायुतीच्या नेत्यांचे देखील फोटो नाहीत. त्यामुळे, काल सर्वांनी निवडून आणलेला आमदार, आज जेव्हा एकटा निघतो. तेव्हा ज्यांनी-ज्यांनी त्यांना २०१९ मध्ये मदत केली. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. केेलेल्या मदातीचे जाण न ठेवता उलटवार करणारा आमदार आता एकटा पाडण्याची गरज आहे.
कार्यकर्ते वार्यावर सोडले.!
माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांनी राजकारण करताना कार्यकर्त्यांना कायम संभाळले आहे. त्यांच्या हाताला रोजगार दिला आहे.त्यांच्या घरातील सुख दु:खात साथ दिली आहे, मदत केली आहे. म्हणून तर साहेब मृत्युंशी झुंज देत असताना तालुक्यातील लोकांनी पक्षाचे पायजोडे बाजुला ठेवले आणि रुग्णालय गाठले. शेवटी डॉक्टर वैतागले इतकी गर्दी तेथे झाली. त्या तुलनेत वैभव पिचड यांना इतकी माणसे संभाळता आली नाही. त्या तुलनेत डॉ. लहामटे यांनी तर सगळेच कार्यकर्ते वार्यावर सोडले. उलट चूक नसताना रेशनमध्ये जीवाभावाचे कार्यकर्ते जेलमध्ये टाकले, रवि मालुंजकर सारखा तरुण तोफेच्या तोंडी दिला, गद्दारी नंतर तुम्ही कोणत्या पक्षाचे असे विचारले असता कार्यकर्त्यास पहाटे ३ वाजता उचलुन आणून जेलममध्ये टाकले. इतकेच काय.! ज्यांनी २०१९ मध्ये जीव काढला त्यातील कोणलाच ठेकेदारी दिली नाही. उलट मलिदा खाण्यास सोईस्कर व्हावे म्हणून संगमनेरच्या ठेकेदारांना काम दिले पण येथील तरुणांना रोजगार दिला नाही. अन आता एमआयडीसीच्या गप्पा मारत आहेत. त्यांच्यासोबत बहुजन चळवळीतील एक सुद्धा कार्यकर्ता टिकला नाही. आमदारांनी सर्वांना बाजुला लोटले आणि गडी एकटा निघाला....!!
साहेब.! हे लोक २०१९ ला कोठे होते मग.!!
डॉ. अजित नवले, बी.जे.देशमुख, अमित भांगरे, दशरथ सावंत, विजय वाकचौरे, सुनिता भांगरे, बाजीराव दराडे, महेश तिकांडे, मारूती मेंगाळ, मधुकर तळपाडे, सतिश भांगरे, अमित नाईकवाडी, चंद्रकांत सरोदे, स्वातीताई शेणकर, संपत नाईकवाडी, आ.के.उगले, भाऊसाहेब साळवे, शांताराम संगारे, चंद्रभान नवले, डॉ. मोहन पवार, कोंडाजी ढोन्नर, राजेंद्र कुमकर, सुरेश गडाख, रवि मालुंजकर, राजेंद्र गवांदे, शंकरभाऊ चोखंडे, सुरेश खांडगे, अरुण रुपवते, रमेश शिरकांडे, दोन्ही संदिप शेणकर, निलेश गजे, प्रकाश देशमुख, अभिजीत देशमुख अशी शेकडो नावे सांगता येईल. की, जी लहामटेंच्या सोबत होते आणि आता ते सोबत नाहीत. यांनी दिवस रात्र एक करुन स्वखर्चाने प्रचार केला आणि लहामटे यांना निवडून आणले. मी ही लोक प्रचंड मेहनत घेत होते. तरी देखील आमदार म्हणतात गडी एकटा निघाला. पण निवडून आल्यानंतर जे लोक भाजपाचे झेंडे घेऊन पळत होते, जे लहामटेंचे बुथ गावोगावी लावू देत नव्हते. ते आज आमदारांचे निष्ठावंत गडी झाले आहेत. त्यामुळे, अशा स्वार्थी मानसला धडा शिकविण्याची हीच वेळ आहे.
एकट्या गड्याचीच प्रगती झाली.!
२०१९ नंतर तब्बल अडिच वर्षे कोरोनाच्या काळात गेले. उरलेल्या वर्षात जेव्हा डॉ. लहामटे साहेब सत्तेत आले. तेव्हा त्यांच्यावर आरोप झाला, ५० खोके एकदम ओके. आता ते खोके बाहेर पडू लागले आहेत. की, काय? असा प्रश्न उपस्थित होतो. काय त्या टोलेजंग सभा, काय ती जेवण, डिजेची गाडी, सोबत डिझेल, पेट्रोलसह दहा गाड्यांचा ताफा अन काय ती तिरंगा रॅली. काय तो यापुर्वी कधी न झालेला आदिसवासी दिन, काय त्या राजूर मधील मिरवणुकी, काय ते संभळ, महिलांचे नृत्य, पोलीस ठाण्यासमोरुन डिजेचा आवाज, काय त्या मंगळा गौरीचा कार्यक्रम, काय ती जेवणं, काय ते क्रिकेटला बक्षिसे, काय तो ठेकेदारांचा ताफा, आज काय तो प्रचार, सोशल मीडिया चालविण्यासाठी थेट नाशिक येथील संस्थेला दिलेले कॉन्ट्रॅक्ट, काय ते प्रत्येक गावोगावी बॅनर, गाड्या आणि स्टिकर, काय ते सर्व्हेसाठी हजार रुपये रोजाने नेमले २५ मुले, प्रत्येक पट्ट्यात बुक केलेले हॉटेल. काय हा पैसा... संपायलाच तयार नाही. मात्र, यांच्यासोबत काम करणारा एक सुद्धा कार्यकर्ता उजरला नाही. पण, काल झोळी मागून निवडून आलेला आमदार आज इतका पैसा उघाळतो आहे. केवळ गडी एकटा कमविता झाला... असे म्हटल्यास काय वावघे आहे.! याचा मतदारांनी विचार केला पाहिजे. या कमाईत कोणी वाटेकरी नको म्हणून गडी एकटा निघाला.. अशी टिका डॉ. अजित नवले यांनी केली.
ही लोकं गड्याने ठेकेदारांसाठी एकटी पाडली.!
डॉ. अजित नवले, बी.जे.देशमुख, अमित भांगरे, दशरथ सावंत, विजय वाकचौरे, सुनिता भांगरे, बाजीराव दराडे, महेश तिकांडे, मारूती मेंगाळ, मधुकर तळपाडे, सतिश भांगरे, अमित नाईकवाडी, चंद्रकांत सरोदे, स्वातीताई शेणकर, संपत नाईकवाडी, आ.के.उगले, भाऊसाहेब साळवे, शांताराम संगारे, चंद्रभान नवले, डॉ. मोहन पवार, कोंडाजी ढोन्नर, राजेंद्र कुमकर, सुरेश गडाख, रवि मालुंजकर, राजेंद्र गवांदे, शंकरभाऊ चोखंडे, सुरेश खांडगे, अरुण रुपवते, रमेश शिरकांडे, दोन्ही संदिप शेणकर, निलेश गजे, प्रकाश देशमुख, अभिजीत देशमुख अशी शेकडो नावे सांगता येईल. की, जी लहामटेंच्या सोबत होते आणि आता ते सोबत नाहीत. यांनी दिवस रात्र एक करुन स्वखर्चाने प्रचार केला आणि लहामटे यांना निवडून आणले. मी ही लोक प्रचंड मेहनत घेत होते. तरी देखील आमदार म्हणतात गडी एकटा निघाला. पण निवडून आल्यानंतर जे लोक भाजपाचे झेंडे घेऊन पळत होते, जे लहामटेंचे बुथ गावोगावी लावू देत नव्हते. ते आज आमदारांचे निष्ठावंत गडी झाले आहेत. त्यामुळे, अशा स्वार्थी मानसला धडा शिकविण्याची हीच वेळ आहे.