प्रेम संबंधातून प्रेयसिची दगडावर आपटून हत्या, रस्त्यावर टाकून देत अंगाहून गाडी घातली व अपघाताचा बनाव केला. आरोपी अटक, पोलिसांची उत्तम कामगिरी.!
सार्वभौम (संगमनेर) :-
प्रेम जुळले आणि मनही शांत झाले. मात्र, कालांतराने प्रेयसी त्याला वारंवार पैसे आणि सोने घेण्यासाठी ब्लॅकमेल करीत होती. जितके शक्य होते तितके त्याने दिले. मात्र, अतिरेख झाल्यानंतर तिचा जीव घेण्यापलिकडे पर्याय राहिला नव्हता. म्हणून त्याने तिला चंदनापुरी घाटात नेले आणि तेथे दगडावर डोके आदळले आणि तिची हत्या केली. मात्र, हे मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी? हा प्रश्न पडला असता प्रियकराने अपघाताचा बनाव केला आणि तिला कासारवाडी परिसरातील पुणे नाशिक हायवे वरील पुलावर रस्त्यात टाकून दिले. त्यानंतर अपघाताची नोंद देखील झाली. मात्र, पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने सखोल तपास करुन हा अपघात नव्हे तर हत्या आहे हे सिद्ध केले आहे. यात रंजना शिवाजी खेमणर (रा. अंभोरे, ता. संगमनेर) ही मयत झाली आहे. तर, तिचा प्रियकर बाळासाहेब बिरु हळनर (रा. आंभोरे, ता. संगमनेर) यास अटक करण्यात आली आहे.
मयत रंजना आणि आरोपी बाळासाहेब यांचे गेल्या काही दिवसांपुर्वी प्रेम जुळले होते. एकमेकांचा जीव जडल्याने ती जे काही मागत होती. ते बाळासाहेब आणून देण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला शक्य नसले तरी तो काहीही करुन तिच्या आपेक्षा पुर्ण करीत होता. याचे प्रेम असले तरी तिच्याकडून आता तो केवळ एक पैसे आणि सोनेनाणे पुरविणारा अशाच प्रकारची भावना झाली होती. याच्याकडून जे-जे शक्य आहे. ते-ते उकळविण्याची मानसिकता हिने केली होती. मात्र, हे दिवस फार काळ टिकले नाही. प्रत्येक वेळी अशा मागण्यांमुळे बाळासाहेबाचे प्रेम हे देखील रोषाच्या भावना धारण करीत होत्या. यापुर्वी त्याने काही सोने आणि पैसे रंजनाला दिले होते. मात्र, आता त्याला ते शक्य नव्हते.
दरम्यान, पैसा येईना आणि समाधान होईना म्हणून यांच्यात फार टोकाचे वाद होऊ लागले होते. त्यामुळे, बाळासाहेब प्रचंड अस्वस्थ झाला होता. रंजना मयत होण्याच्या पुर्वी तिने याच्याकडे काही पैसे आणि सोने घेऊन देण्याची मागणी केली होती. मात्र, याने सांगितले होते. की आता शक्य नाही. त्यामुळे, यांच्यात वाद होऊ लागला होता. रंजनाकडून वारंवार होणारी मागणी आणि दोघांमध्ये कमी झालेले प्रेम हे अनेकांना माहित झाले होते. गावात देखील याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, महिलेचा विषय असल्यामुळे कोणी स्पष्ट वाच्चता करीत नव्हते. त्यामुळे, जे काही चालु होते ती खर्या अर्थाने वादळापुर्वीची शांतता होती असे म्हटल्यास काहीच वावघे ठरणार नाही.
दरम्यान, रंजनाच्या त्रासाला कंटाळून बाळासाहेब याने ठरविले होते. की, हा काटा आपल्या वाटेतून कायमचा दुर करायचा. तेव्हा याने दि. १५ जून २०२४ हिला प्रेमात घेतले. तिला बाहेर फिरायला जाऊ असे सांगून चंदनापुरी घाटात नेले आणि निर्जन स्थळाचा फायदा घेत त्याने तिला खाली उतरविले. तेथे दोघांमध्ये चर्चा चालु होती. मात्र, ही बेसावध असतानाच त्याने तिचे डोके दगडावर आपटून रक्ताच्या थारोळ्यात पाडले. त्यानंतर तिचा श्वास बंद झाला. मात्र, आता हे प्रेत टाकायचे कोठे? जर असेच उघड्यावर पडले किंवा घाटात टाकले तरी लोकांना दिसेल आणि पोलीस कसा का होईना शोध लावतील त्यामुळे याने अगदी कोल्ड माईंडने तिचा मर्डर करुन गुन्हा दडपण्याचा कट रचला होता. रंजनाची हत्या झाली की अपघात? याबाबत कोणाला शंका देखील येणार नाही अशा पद्धतीने याने डोके लावले होते.
हत्या केल्यानंतर याने रंजना तथा आपल्या प्रेयसिचा मृतदेह गाडीत टाकला. त्यानंतर गाडी भरधाव वेगाने कसारवाडी पुलावर आली. तेथे याने गाड्या शांत झाल्याचा अंदाज घेतला आणि हळुच रंजनाचा मृतदेह रस्त्यावर फेकला. तिच्या अंगाहून त्यानेच गाडी घातली आणि जणूकाय हा अपघात आहे असे दर्शविण्याचा प्रयत्न केला. हे सर्व उपक्रम करुन झाल्यानंतर बाळासाहेब घटनास्थळाहून निघुन गेला. दुसर्या दिवशी अपघातात महिला मयत झाली अशा प्रकारची संकल्पना अनेकांनी त्यांच्या डोक्यात फिट केली. मात्र, रंजना आणि बाळासाहेब यांच्या बाबत अनेकांना बर्याच गोष्टी माहित होत्या. त्यामुळे, त्यांनी पोलीस उपाधिक्षक यांच्याकडे धाव घेतली आणि हा अपघात नव्हे.! तर खुन केलेला आहे असे ठामपणे सांगितले.
त्यानंतर पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी एक विशेष पथक तयार करुन या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस नाईक राहुल डोके, पो. कॉ.राहुल सारबंदे,दत्तात्रय मेंगाळ,सायबर पोलीस पो. ना. सचिन धनाड, पो. ना. राम वेताळ यांनी तपासाची चक्रे फिरविली. कानून के हाथ लंबे होते है.! या म्हणी प्रमाणे त्यांनी अगदी खोलात जाऊन या गुन्ह्याची उकल करण्यासाठी माहिती गोळा केली. जो संशयीत व्यक्ती होता त्यास निगरानीखाली ठेवून त्याच्या बारीक हलचालींवर या पथकाचे लक्ष होते. अखेर सबळ पुरावे हाती आल्यानंतर या पथकाने बाळासाहेब बिरु हळनर (रा. आंभोरे, ता. संगमनेर) यास बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर त्याने ही सिनेस्टाईल हत्या कशी केली याची कबुली दिल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. या गुन्ह्याच अधिक तपास पोलीस करीत आहेत.
आरोपी याने रंजना हिला दुचाकीवर चंदनापुर घाटात नेले, तेथे दोघाचे असे ठरले. की, दोघांनीही आत्महत्या करायची. किंवा रंजना म्हणत होती आपण लग्न करु. मात्र, त्याने मान्य केले नाही. त्यावर ती म्हणाली. की, लग्न करायचे नसेल तर 50 हजार रुपये द्यावे लागेल. तो वाद विकोपाला गेला आणि त्याने तिची हत्या केली. त्यानंतर बाळु याने तो मृतदेह दगडाच्या आडोशाला लपून ठेवला. तो पुन्हा घरी गेला आणि चारचाकी गाडी घेऊन आला. त्याचा परावा कोठे मिळू नये किंवा टोलनाका किंवा अन्य ठिकाणी तो कैद होऊ नये. म्हणून, तो जवळे बाळेश्वर, सावरचोळ, निमगाव पागा व खांडगाव मार्गे कसारवाडी येथे आला. त्यानंतर तिला नाशिक पुणे हायवे पुलावर फेकून देत तिच्या अंगाहून गाडी घालुन हा अपघात आहे. असे दर्शविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सखोल तपसात तो वाचला नाही.