मी थोरात यंत्रणेच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडणार - अमोल खताळ, आर्थिक निधीसाठी लाडकी बहिण सरसावली.!


सार्वभौम (संगमनेर) :- 
                          संगमनेर विधानसभा जस जशी जवळ येत आहे. तसा राजकीय मुद्द्यांना रंग चढत चालला आहे. तळेगावात आ. थोरात यांनी सभा घेतली. त्या सभेत अमोल खताळ यांना खबऱ्या म्हणत टीका केली या टिकेला उत्तर देत अमोल खताळ यांनी गावभेटी दरम्यान आ. थोरातांवर टीका करून खरपुस समाचार घेतला आहे. आ. थोरात मला खबरे म्हणाले पण या खबरीलाल पाडण्यासाठी तीन खासदार, एक माजी मंत्री कशासाठी. तुम्ही जर निवडून येणार आहे तर मला खबऱ्या म्हणायची वेळ का आली. कारण, यांचा भ्रष्टाचाराचा बुरखा आता मी फाडला आहे. तो समोर आला आहे. कार्यकर्त्यांचे घोटाळे बाहेर येऊ लागले आहे म्हणुन खबऱ्या म्हणत दवंडी पिटवत आहे. मात्र, या लाडक्या बहिणी, जेष्ठ नागरिक, तरुणांनी ही लढाई हातात घेतली आहे. येथे परिवर्तन अटळ आहे. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांना चाळीस वर्षे संधी दिली या शेतकऱ्याच्या मुलाला पाच वर्षे संधी द्या तुम्हाला या भागाचा कायापालट करून दाखवीन नाहीतर या भागात पुन्हा पाय ठेऊ देऊ नका असे मत अमोल खताळ यांनी निमोण येथे व्यक्त केले.
               
खरंतर, एका शेतकऱ्याच्या मुलाला खबऱ्या म्हणताय. याच शेतकऱ्याच्या मुलाला पाडण्यासाठी तीन खासदार एक माजी मंत्री बोलवताय. एक खासदार तो लंके काय करतो तर सुपा एमआयडीसी मध्ये खंडनी गोळा करतो, दुसरा खासदार साई बाबांच्या संस्थांनात तुपात पैसे खातो, तिसरे कोल्हे आले आता किती कोल्हे कुत्रे भूकले तरी या वाघाला काही फरक पडत नाही वाघ तो वाघच राहणार आहे. यांनी जर चाळीस वर्षे विकास केला असता तर यांना तीन खासदार एक मंत्री आणायची वेळ आली नसती. यांच्या झोळीत भरभरून लोकांनी मते दिली असती. नेहमी जनतेची दिशाभूल करायची. निमोणवाल्याचे भांडण तळेगाव बरोबर लाऊन द्यायचे हाच प्रकार तालुक्यात सगळीकडे आहे. घरा घरात भांडणे लाऊन द्यायची ग्रामपंचायत मध्ये जो पडला त्याला हार टाकायचा जो जिंकला त्याला ही हार घालायचा असे भांडणे गावा गावात घरा घरात लाऊन दिले आहे.  
              ते पुढे बोले की, आ. थोरात हे नेहमी बोलत असतात तालुका आमचं कुटुंब आहे मंग साकुर, निमोण,तळेगाव हा कुटुंबाचा भाग नव्हता का येथे पाण्यामुळे किती दुष्काळ आहे. जे काही भोजपुर धरणाची चारी मार्गी लावली यामध्ये स्व. बी. जे.खताळ पाटलांचे योगदान आहे. त्यामुळे, येथे थोडेफार प्रमाणात नंदनवन आहे. पाण्याचा प्रश्न अजुनही या भागात गंभीर आहे. चाळीस वर्षे एकाच आमदाराला संधी दिली.त्यामुळे, महिलांच्या डोक्यावर हंडा आहे. टँकर बोलवावे लागतात. या शेतकऱ्याच्या मुलाला एकदा संधी द्या महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवेल टँकर बंद करील. पाणी प्रश्न नाही मिटवला तर या भागात पुन्हा पाऊल ठेऊ देऊ नका फक्त या शेतकऱ्याच्या मुलाला एकदा संधी द्या. या मतदारसंघात बहिणींनी मला मोठ्या प्रमाणात निवडणूकीत आथिर्क मदत केली. त्या सर्व महिलांचा मी ऋणी आहे. येथील स्वाभिमानी जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. तरुणांनी निवडणुक हातात घेतली आहे. कारण, शेतकऱ्याच्या सर्वसामान्य घरातील मुलाला आमदार करायचे आहे. गुलाल आपणच उधळणार आहे.
            भाजपचे जेष्ठ नेते भीमराज चत्तर बोले की, आ. थोरात यांचे वय ७३ . आहे. सरकारी माणुस हा ५८ व्या वर्षी रिटायर होतो. आता आ. थोरात यांना रिटायर करण्याची वेळ आली आहे. त्यांनी तरुणपणी कधी निमोण भागाला पाणी देता आले नाही आता रिटायर झाल्यावर कधी देणार आहे. त्यामुळे, अमोल खताळ या तरुण नेतृत्वाला एकदा संधी द्या. तो पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल असा मला विश्वास आहे. ज्या रस्त्याला पायी चालता येत नाही त्या रस्त्याला अकरा कोटी रुपये निधी विखें पाटलांनी दिला. आपल्या भागातील धरणे, बंधारे हे बी. जे. खताळ पाटलांनी बांधले हे विसरू नका. या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी ज्या संस्था काढल्या त्या संस्थेचे वाटोळे झाले. ते जेल मध्ये गेले आता तरी बदल घडवा. तुम्हाला ही सुवर्ण संधी चालून आली आहे. अमोल खताळच्या रूपाने एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार करा असे भाजपचे जेष्ठ नेते भीमराव चत्तर यांनी जनतेला संबोधीत केले.
          अमोल भाऊंनी सातत्याने जनतेत काम केले. जिथे भ्रष्टाचार झाला तिथे आवाज उठवला. अनेकांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. संजय गांधी निराधार योजनेतुन गोर गरीब जनतेला या योजनेचा लाभ मिळून दिला.लाडकी बहीण योजना गावागावा पर्यंत पोहचवली. आज त्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली. त्यांना आमचा छोटासा हातभार म्हणुन इथल्या विकासासाठी परिवर्तन करण्यासाठी जे शिंदे साहेबांनी पंधराशे रुपये हप्ता दिला तो आम्ही अमोल भाऊंना देत आहे. कारण, अमोल भाऊंच्या रूपाने आम्हाला संगमनेरचा आमदार पाहायचा आहे. जो सर्वसामान्य जनतेचे काम करेल. आमच्या बहिणींची रक्षा करेल.
           - सौ.नंदा विलास काकड.