डॉ. लहामटे घोरपडा देवीच्या बेल भंडार्याला जागले नाही, २०१९ ला ठरले होते, २०२४ ला भांगरेंना उमेदवारी द्यायची.! यांनी देवीशी सुद्धा गद्दारी केली.!
सार्वभौम (अकोले)-
अकोले तालुक्यातील आदिवासी समाज गेली ४० वर्षे पिचड साहेबांच्या पाठीशी खंबिर उभा राहिला. तितकाच तो स्व. अशोकराव भांगरे यांच्या देखील पाठीशी उभा होता. पिचड साहेबांना ४५ वर्षे मत विभाजनाचा फायदा होत होता. म्हणून २०१९ साली आमचे ठरले होते. की, एकास एक उमेदवारी द्यायची. तेव्हा, घोरपडा देवीच्या मंदीरात बसून ठरले होते. की, २०१९ मध्ये डॉ. लहामटे यांना उमेदवारी तर २०२४ मध्ये भांगरे कुटुंबात उमेदवारी. तेथेच आई देवीच्या मंदिरात बेल भंडार घेऊन एकमेकांना विश्वास दिला होता. अशोकराव भांगरे यांनी त्यांचा शब्द पाळला. मात्र, जसजशी वचनपुर्तीची वेळ आली. तसतसे डॉ. किरण लहामटे यांची नियत फिरली आणि त्यांनी भांगरे कुटुंबात उमेदवारी देण्यासाठी असमर्थता दर्शविली. या बेल भंडार्याचा मी स्वत: साक्षिदार आहे. जर, लहामटे यांची नियत फिरली. तर, देवीचा कोप होऊन त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना एका साक्षिदार व्यक्तीने केली.
त्याचे झाले असे. की, अशोकराव भांगरे यांनी १९९० ते २०१४ असा राजकीय संघर्ष माजी मंत्री आदरणीय मधुकर पिचड साहेब यांच्याशी केला. मात्र, कधीच यश मिळाले नाही. सतत मत विभाजनाचा फायदा पिचड साहेबांना झाला आणि त्यामुळे येथे कधीच परिवर्तन झाले नाही. परिणामी आदिवासी समाजाचे सर्व नेते एकत्र आले आणि त्यांनी एकास एक उमेदवारी करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यात सर्वांची महत्वाची भुमिका ज्येष्ठ म्हणून स्व. अशाकराव भांगरे यांची होती. तेव्हा असे ठरले होते. की, ज्याला कोणाला शरद पवार साहेब यांच्याकडून उमेदवारी मिळेल त्यानेच उमेदवारी करायची आणि ज्याला मिळणार नाही. त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम करायचे, काही झालं तर जो उमेदवार दिला आहे. त्याच्या विरोधात काम करायचे नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांना मदत होईल असा कोणताही निर्णय किंवा काम करायचे नाही. तसेच, येणार्या काळात ज्याला ज्याला तिकीट मिळेल, त्याच्या पाठीशी उभे रहायचे आणि त्याला मदत करायची. त्याच प्रमाणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा जागा वाटून देत एकमेकांना सहकार्य करायचे. मात्र, दुर्दैव असे. की, डॉ. किरण लहामटे निवडून आल्यानंतर म्हणाले. की, मी स्वत:च्या जिवावर निवडून आलोय. त्यामुळे, तुमचा काहीच यात रोल नाही. त्यांनी जरा देखील जाणिव ठेवली नाही, नैतिकता ठेवली नाही. उलट ज्या अशोकराव भांगरे यांच्यामुळे ते निवडून आले. ते हयात नसताना देखील त्यांच्या विषयी किती विकृतपणे बोलतात. हे आदिवासी सामाजाला पहावत नाही.
तेव्हा लहामटेंसाठी थांबलो, आज भांगरेंसाठी.!
खरंतर आमच्यात २०१९ मध्ये एकास एक उमेदवारी देण्याचे ठरले होते. त्यानुसार आम्ही कोणीच अर्ज भरले नाही. २०१९ ला डॉ. लहामटे आमदार झाल्यानंतर त्यांनी स्वत:हून थांबने अपेक्षित होते. त्यांच्यानंतर ज्येष्ठतेने अशोकराव भांगरे यांचा नंबर होता. मात्र, लहामटे निवडून आले आणि त्यांनी भर सभेत सांगायला सुरूवात केली. की, मी स्वत:च्या जोरावर निवडून आलो आहे. त्यामुळे, गेल्या पाच वर्षात त्यांनी साधा एक फोन सुद्धा केला नाही. ना निधीची पुर्तता केली. तेव्हा मी देखील शपथ घेण्यास उपस्थित होतो. तेव्हा डॉ. लहामटे यांच्यासाठी थांबलो, आता अमित भांगरे यांच्यासाठी थांबलो आहे. मला खात्री आहे. येणार्या काळात आई घोडपडा देवीच्या आशिर्वादाने माझा सुद्धा एक दिवस येईल. मी एकमेव असा आहे. की मी अर्ज भरला नाही. मात्र, बाकी सर्वांनी अर्ज भरले आहे. एक दिवस मला ही जनता न्याय देईल.
पत्रावळी सारखी किंमत लहामटेंनी केली.!
जोवर शरद पवार साहेब यांच्याकडून एकास एक म्हणून उमेदवार घोषणा होत नव्हती. तोवर डॉ. किरण लहामटे हे गप्प बसून होते. साधा खर्च देखील करीत नव्हते. सभा आणि सर्व नियोजन अशोकराव भांगरे यांचे चालु होते. मात्र, सभा चालु झाली आणि यांनी काही भाड्याने मानसे आणली व घोषणाबाजी सुरु केली. एकच फॅक्टर, लहामटे डॉक्टर. त्यानुसार यांनी कृत्रीम वातावरण तयार केले. अर्थात पवार साहेबांच्या शब्दावर सगळ्यांनी थांबुन घेतले आणि अनेकांनी दिवस रात्र काम केले. जेव्हा हे बहाद्दर निवडून आले. त्यानंतर ते म्हणतात कृष्णाने तो गोवर्धन एकट्याने उचलला असता. मात्र, वाकड्या आणि सुदाम्यांना बोट लावण्याची संधी दिली. हे ऐकल्यानंतर किती वाईट वाटते. पत्रावळी सारखी किंमत लहामटेंनी केली. गरज सरो आणि वैद्य मरो अशा मानसिकतेचा व्यक्ती आमदार केल्याची फार दु:ख आज मनाला होतो असे लोक म्हणू लागले आहे.
देवीशी सुद्धा गद्दारी, प्रकोप निच्छित आहे.!
ज्यांनी गद्दारी केली, त्यांना धडा शिकविण्यासाठी डॉ. लहामटेंना निवडून दिले. त्याच लहामटेंनी देखील गद्दारी केली. त्यामुळे, जालिंदर वाकचौरे साहेब एका सभेत म्हणाले होते. हौसाने केला पती, अन त्याला झाली रघतपिती.! होय, अकोले तालुक्यातील जनतेच्या मनात याच भावना आहेत. डॉ. लहामटे यांना तिकीट देताना शरद पवार साहेब होते, एकास एक करताना येथील आदिवासी नेते होते, निवडून आणताना येथील मायबाप जनता आणि पुरोगामी चळवळी होत्या. या सगळ्यांशी डॉ. लहामटे यांनी गद्दारी केली आहे. इतकेच नव्हे.! आई घोरपडा देवीच्या मंदिरात ठरले होते, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या उमेदवाराला संधी द्यायची. आज त्या शब्दाला डॉ. लहामटे जागले नाही. सत्ता, खोके आणि टक्केवारीत ते इतके बुडाले. की, त्यांनी बेल भंडार घेऊन घेतलेली शपथ देखील लक्षात राहिली नाही. त्यामुळे, त्यांनी देवीशी देखील गद्दारी केली आहे. त्यांच्यावर पराभवचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या भावना आदिवासी ज्येष्ठ मतदारांनी व्यक्त केल्या आहेत.