आमदार साहेेब.! तुमच्याही पाठीपोटी मुलं आहेत, इतकीही निच पातळी गाठू नका.! कॉलेजच्या त्या फोटेंमध्ये गैर काहीच नाही.!
सार्वभौम (अकोले)-
अमित भांगरे हे शिक्षण घेण्यासाठी नेदरलँण्डमध्ये होते. तेव्हा त्यांचे काही मित्र मैत्रीणी एका हॉटेलमध्ये बसले दिसत असून सॅण्डविच खाताना दिसतात, तर दुसर्या चित्रात अमित भांगरे हे समुद्र किणार्यावर एका मुलीसोबत सेल्फी स्टिकने फोटो काढताना दिसत आहेत. अर्थात जे काही फोटो आहेत. त्यात गैर असे काहीच नाही. जे लोक कट्टर दारुडे आहेत त्यांच्या पंगतीला बसून सगळा चकना संपविणारे लाखो लोक सापडतील. इतकेच काय.! अर्धनग्न असणार्या हिरोईन आणि गोव्यासारख्या बिचवर अनेक सेलिब्रेटींसोबत फोटो काढले जातात. तेव्हा तो माणूस वाईट ठरतो का? तर मुळीच नाही. त्या-त्या परिस्थितीत व्यक्ती समरूप होत असतो. मात्र, अमित भांगरे यांचा अक्षेपहार्य असा कोणताही फोटोे नाही. मात्र, दुर्दैव असे. की, डॉ. किरण लहामटे यांना स्वत:चा पराभव दिसू लागल्याने त्यांनी तरुण उमेवाराला बदनाम करण्याचा कट रचला आहे. मात्र, आजकाल अकोल्यात देखील कॉलेजची मुले-मुली काय करतात हे डॉ. लहामटेंना दिसत नाही. भर दिवसा कॉलेजच्या समोर कॉलेजच्या अल्पवयीन मुलींचा उपभोग घेतला जात होता. ते लहामटे साहेबांना दिसले नाही. पण, निवडणुकीच्या तोंडावर स्वत: शेतकर्यांची आयमाय काढताना व्हिडिओ समोर येताच अमित भांगरे यांना बदनाम करण्यासाठी कॉलेजचे काही फोटो एकत्र करुन त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. पण, डॉ. लहामटे साहेब, तुमच्या पाठीपोटी देखील लेकरंबाळं आहेत. त्यामुळे, राजकारणासाठी इतक्या निच पातळीला जाऊ नका. अशा प्रकारचे मत ज्येष्ठ नेते प्रकाश मालुंजकर यांनी व्यक्त केले आहे.
खरंतर अकोले तालुक्यातील राजकारणाची पातळी गेल्या पाच वर्षात प्रचंड बिथरली आहे. जेव्हापासून डॉ. लहामटे आमदार झाले आहेत. तेव्हापासून मी विकास करतोय त्यामुळे, येथील बहुजनांना मी कोलुन देऊ शकतो, मी निधी आणतोय म्हणून मी कोणालाही लाथाडू शकतो, मी धावपळ करतोय त्यामुळे कोणाचाही काटा काढू शकतो, मी रस्ते करतोय त्यामुळे, शेतकर्यांना शिव्या घालु शकतो, जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे, मी बहुजन वर्गाला माझा नाद करायचा नाही असे म्हणू शकतो. मला वर्गनी काढून निवडून दिले म्हणून मी लाखो रुपये खर्च करून मंगळा गौरी करुन पैसे उधळु शकतो, तिरंगा रॅलीतू कोट्यावधींची उधळपट्टी, लाखो रूपये खर्च करून महिलांना घाटनदेवी करुन आणू शकतो, कोट्यावधी रुपये खर्च करुन मीडिया हायजॅक करू शकतो. स्वत:चा डिजे घेऊन प्रत्येक गावात जाऊन नाचू शकतो. कोट्यावधी रुपये खर्च करुन मोठमोठ्या सभा आणि उधळपट्टी करु शकतो. अशा प्रकारचे वातावरण करुन ठेवले आहे. त्यामुळे, मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे असे म्हणत या अकोले तालुक्यात गेल्या पाच वर्षात नंगानाच केला आहे. त्यामुळे, आता या तालुक्यातील जनतेने ठरवायचे आहे. की, मायबाप जनता म्हणून हा नंगानाच आपल्याला सहन करायचा की मी म्हणेल तेच खरे असे म्हणत येथील पुरोगामी संस्कृतीला सुरुंग लावणार्या व्यक्तीला घरी बसवायचे..!!
खरंतर बाप गेल्यानंतर अमितने स्वत:ला सावरुन आपला व्यवसाय उभा ठेवला आहे. या दरम्यानच्या काळात अर्थात २०१९ पासून डॉ. किरण लहामटे यांचा प्रचार करताना ते आज २०२४ मध्ये स्वत: उमेदवारी करताना त्याच्यात कोणताही अहंमभाव दिसून आलेला नाही. ना त्याच्याकडून कधी चुकीचे वर्तन दिसून आले नााही. आजवर त्याला कोणी मद्यपान देखील करताना पाहिले नाही. कारण तो निर्व्यसनी आहे. त्यामुळेे, वयाच्या २८ व्या वर्षी बाप गेल्यानंतर जी जबाबदारी त्याने स्वत:च्या खांद्यावर पेलली आहे. ती खरोखर वाखान्याजोगी आहे. त्याचे कौतुक करायचे सोडून डॉ. लहामटे अमित भांगरे यांचे जुने फोटो व्हायरल करीत आहे. खरंतर डॉ. लहामटे यांच्यावर अशोकराव भांगरे यांचे अनंत उपकार आहेत. आज त्यांच्या कृपेने ते आमदार आहे. दुर्दैवाने अशोकराव नाहीत. त्यामुळे, अमितचे पालकत्व लहामटे यांनी स्विकारुन स्वत: माघार घेत अशोकराव यांचे स्वप्न पुर्ण करायला पाहिजे होते. मात्र, अमितची आब्रु वेशिवर टांगून मी कसा निर्मळ आहे. हे जनतेला दाखवून पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न लहामटे पहात आहे. परंतु आता हे शक्य होणार नाही.
२०१९ ला अमितची भाषणे चालली का?
अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे. अशोकराव भांगरे यांनी तालुक्यातील विरोध जिवंत ठेवण्याचे काम केले. मात्र, डॉ. लहामटे हे विरोधक ठार मारुन टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेदरलॅण्ड येथील फोटो व्हायरल करुन यांना काय सिद्ध करायचे आहे. कॉलेज लाईफ आहे, तेथील जीवणशैली वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे, कॉलेजमधील वातावरण वेगळे आहे. आता हे आमच्यासारख्या ७० वर्षे पार केलेल्या व्यक्तींना कळते. तर, डॉ. लहामटे यांना का कळत नाही? ते डॉक्टर झाले मग काय कॉपी करुन की बाहेरून ऍडमीशन करुन पास झाले? त्यांना कॉलेज जीवण माहित नाही. केवळ आपला विरोधक आहे म्हणून तो बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. आम्ही ५० वर्षे निवडणुका पाहिल्या. पण, इतक्या निच आणि गलिच्छ पातळीचे राजकारण कधी पाहिले नाही. मला विश्वास आहे, अमित भांगरे यांचे फोटो व्हायरल करुन उलट आमदार रिवस गेले आहे. लोकांना काय चुक आणि काय बरोबर, कोणाचा काय हेतू आहे. हे तेव्हाच लक्षात येते. याच अमित भांगरे यांनी २०१९ मध्ये लहामटे यांच्यासाठी जीव तोडून भाषणे केली, त्यांच्यासाठी मते मागितली. तेव्हा अमित भांगरे वाईट नव्हते का? आता स्वत:चे अस्तित्व धोक्यात आले म्हणून अमित भांगरे यांना बदनाम करण्याचा हा डाव आखला आहे.
- गुलाबराव शेवाळे (ज्येष्ठ नेते)
मी आज देखील धुतल्या तांदळासारखा स्वच्छ.!
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अनेक देशांतून तेथे विद्यार्थी येत असतात. जशी संस्कृती आपल्याकडे आहे, तशी तिकडे नाही. तिकडे राजरोज मुली शिगारेट ओडतात, बिअर घेतात. त्यामुळे, त्यांच्यासोबत बसणे, त्यांच्याशी मैत्री करणे म्हणजे मी देखील तसाच असे मुळीच होत नाही. जर कोणी बिअर घेत असेल तर त्यांच्याशी मैत्री करुच नये का? एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असेल तर सोबत हॉटेलला बसू नये का? असे म्हणतात. मन चंगा तो कठोती मे गंगा. त्यामुळे, मी सोबत बसणे म्हणजे त्यांच्या सारखा असे होत नाही. मी नेदरलॅण्ड सोडल्यानंतर किंवा अन्य ठिकाणी जाऊन परत आल्यानंतर या अकोले तालुक्यात एकदा तरी मी व्यसनाधिन दिसलो का? तर मुळीच नाही. ती संस्कृती आमची नाही. आज देखील मोठमोठी माणसे भंडारदरा येथील हॉटेलवर येतात. ते बिअर किंवा अन्य ब्रॅण्ड घेतात. चर्चा करण्यासाठी किंवा त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही टेबलावर बसत असतो. मग याचा अर्थ आम्ही देखील त्याच पंगतीत असे म्हणणे. केवळ आणि केवळ अर्धवट बुद्धीचा खेळ आहे. येणार्या काळात माझी जी बदनामी झाली. त्यावर मी आब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे. मला केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जनतेला माहित आहे. भांगरे घराण्याचे संस्कार आणि संस्कृती काय आहे. त्यामुळे, आमदारांनी जे षडयंत्र राचले आहे. ते जनता हानून पाडणार आहे.
- अमित भांगरे (तुतारी - उमेदवार)
डॉ. लहामटे.! लव्हाळीला पार्टीत काय झाले.!
डॉ. लहामटे यांनी लव्हाळी येथे पार्टीचे आयोजन केले होते. त्यात त्यांचे जुने सहकारी आणि अन्य मित्र परिवार होता. तेथे मस्त मटनाची मेजवाणी दिली होती. तर, अनेक तास चालेली ही पार्टी त्यात कोण-कोण काय काय प्राषण करुन नाच होते. याचे देखील फोटो आणि व्हिडिओ अकोले तालुक्यातील काही व्यक्तींकडे आहे. मात्र, डॉक्टर साहेबांचे बुरखे फाडायला नको म्हणून झाकली मुठ सव्वा लाखाची. जेव्हा चारदोन मित्र एकत्र येतात तेव्हा तुम्ही देखील काय-काय पुरविले आहे. हे दाखवायला लावू नका. उगच जे व्यक्ती डान्स करतात त्यांना बदनाम करायचे नाही, त्यांचे चेहरे तुमच्यासारखे बाहेर काढायचे नाही, जीवण क्षणभराचे आहे. कधी-कधी चाकोरी सोडून आनंद साजरा केला जातो हे आम्ही समजू शकतो. मात्र, प्रत्येक व्यक्ती त्या पार्टीचा भाग असतो असे काही नाही. तसेच अमित भांगरे यांच्या फोटोत काहीच वावघे दिसत नाही. फक्त राजकारण खालच्या पातळीवर आणून ठेवण्याचे काम लहामटे करीत आहे. का? तर आता पराभव दिसू लागला आहे.
- पोपट चौधरी (कार्यकर्ता)
बाप असता तर तुमची हिंमत झाली असती का?
२८ वर्षाच्या लेकराला पाहून त्याच्यावर अशा प्रकारचे आरोप त्याच्यावर करत आहात. तो तुमच्या लोकरासारखा आहे. निवडणुका येतील जातील. पण, उद्या एकमेकांवर दु:खाची वेळ आली तर एकमेकांच्या मागे उभे रहाता आले पाहिजे. त्यामुळे, ज्येष्ठ म्हणून डॉ. लहामटे यांनी स्वत:ची पातळी सोडायला नको आहे. सत्ता आणि राजकारण तथा आमदारकीसाठी जी लोकं मृत्युशी झुंज देत आहेत आणि जे लोक देवाघरी गेले. त्यांच्याबाबत देखील तुम्ही किती घाणेरडे आणि नैतिकता सोडून बोलतात. हे फार क्लेशदायी वाटते. या तालुक्याला विकास नव्हे.! तर येथील संस्कृती, पुरोगामी विचार आणि राजकीय एकोप्याची परंपरा कायम पाहिजे आहे. त्यामुळे, तुमच्या राजकीय पापाचा घडा भरला आहे. एकट्या लेकराला पाहून तुम्ही त्याच्यावर गिधाडासारखे तुटून पडलात. त्याच्या कॉलेज जिवणात डोकावून पाहता हे कितपत योग्य आहे. त्यामुळे, उद्याच्या २० तारखेला ही जनता डॉ. लहामटे तुम्हाला, तुमच्या व्यक्तीद्वेषाला, तुमच्या मी पणाला, तुमच्या अविर्भावाला शंभर टक्के घरी बसविल्याशिवाय राहणार नाही.
- बाळासाहेब ताजणे (ज्येष्ठ नेते)