वाघाने खाल्ल्याचा बनाव करुन मुलगी प्रियकरासोबत पळाली.! बापाला माहित होताच त्याने आत्महत्या केली.! तिच्यावर गुन्हा नोंदवा.!
सार्वभौम (गणोरे) :-
अकोले तालुक्यातील हिवरगाव परिसरात काल रात्री एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक शक्कल लढविली. तिला वाघाने पकडून नेले असे भासविण्यासाठी तिने स्वत: झोपलेल्या ठिकाणी कोंबडीचे रक्त सांडून रक्ताचा सडा शिंपडला. शेजारी आई झोपली होती तिने उठून पाहिले असता पहिला संशय वाघावर घेतला आणि एकच आरडाओरड केली. त्यानंतर सकाळीच गावकरी, नातेवाईक यांनी रान पिजून काढण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलीस आणि वनविभाग देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हे रक्त ना वाघाचे आहे ना मानसाचे. त्यामुळे तेथील नमुने घेऊन तत्काळ लॅबमध्ये त्याची चाचणी करण्यात आली. हे रक्त कोंबडीचे आहे तर मग मुलगी गेली कोठे? तेव्हा लक्षात आले की, मुलगी नळवाडी येथील एका मुलासोबत पळून गेली आहे. त्यानंतर सर्व गावासामोर त्या बापाची इज्जत केली. त्यानंतर काही क्षणात त्याने एक दावे घेतले आणि सरसर एका झाडावर चढून गळ्याला फास लावून खाली उडी मारली. त्याला काही व्यक्तींनी खालुन पकडले होते. मात्र, तडफडत त्या बापाने आपला जीव सोडला. मोठ्या दु:खी अंत:करणाने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर मात्र, संबंधित मुलीच्या असल्या वागण्याने अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, अशोक सखाहरी कदम यांचे कुटुंब दि. ११ मे २०२४ रोजी रात्री झोपी गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी देखील बाहेर झोपले होते. मात्र, पहाटे-पहाटे त्यांची पत्नी उठली आणि त्यांच्या हाताला काहीतरी ओले लागले. त्यांनी उठून पाहिले तर तेथे रक्ताचा सडा पडलेला होता. त्यामुळे, त्यांची धारणा झाली. की, बिबट्याने मुलीला उचलून नेले. त्यानंतर त्यांनी एकच काहूर केले. त्यानंतर बघता बघता शे-पाचशे लोक काठ्या, दंडके आणि बॅटर्या घेऊन शेतात, मकात आणि उसात घुसले. कोणीही स्वत:च्या जिवाची पर्वा केली नाही. डोंगरदर्या पायाखाली घालुन लोकं दमल्यानंतर लोकांनी वनविभाग आणि पोलीस प्रशासन यांना फोन केला. त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, त्यांना यात भलताच वास आला होता.
दरम्यान, दुसर्या दिवशी देखील सकाळी लोकांनी पुन्हा शिवार पिजून काढले. मात्र, त्यांच्या हाती काहीच आले नाही. त्यावेळी आई-बापाने मुलीच्या चिंतेने एकच टाहो फोडला. लहानपणापासून तिच्यासोबत घालविलेले दिवस दोघांच्या डोळ्यासमोर चिलचित्रासारखे फिरत होते. त्यामुळे, दोघांनी लेकीच्या विरहाने अन्न पाण्याचा घोट देखील घेतला नव्हता. त्यानंतर सकाळी जेव्हा वनविभाग व पोलिसांनी रक्ताचे नमुने तपासले तेव्हा फार धक्कादायक माहिती समोर आली. घटनास्थळी मिळून आलेले रक्त हे मानवी नसून ते कोंबडीचे असावे तसेच काही कुंकवाचे देखील पाणी करुन टाकलेले असावे असा तर्क प्रशासनाने लावला. त्यानुसार तपासणी अहवाल देखील तसाच आला. त्यानंतर लक्षात आले. की, हा काहीतरी बनाव दिसतो आहे.
दरम्यान, काही संशयित बाबी लक्षात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यात असे लक्षात आले. की, मुलीने पळून जाण्यासाठी हा बनाव केला आहे. कोंबडीचे रक्त आणि कुंकवाचे पाणी तयार करून ती झोपली होती त्या ठिकाणी टाकले होते. मला बिबट्याने नेले असा समझ निर्माण व्हावा म्हणून पुर्वनियोजित हा प्लॅन तिने आखला होता. ती तिच्या मार्गाने निघुन गेली. मात्र, इकडे सर्व यंत्रणा कामाला लागली होती. हजार पाचशे लोक घराभोवती असताना जेव्हा मुलगी वाघाने नव्हे तर भलत्याच कोल्ह्याने नेली हे बापाच्या लक्षात आले. तेव्हा त्यांना प्रचंड वाईट वाटले. आपल्या जन्मदात्या मुलीने अशा प्रकारे बनाव करुन आपल्या भावनांचा खेळ केला. गावाला, नातेवाईकांना आणि समाजाला हासू होईल असे वर्तन केले. हे त्यांना सहन झाले नाही. त्यामुळे, काही काळ मुलीच्या काळजीने रडणारा बाप आता मुलीच्या घानेरड्या कृत्यामुळे आतून रडत होता. त्यांची प्रचंड घुसमट होत होती.
दरम्यान, बिबट्यावरील संशय संपला आणि पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. शेळ्या मेंढ्या चारण्याच्या संपर्कातून या मुलीची ओळख नळवाडी येथील एका मुलाशी झाली होती. त्यांनी संगनमताने ही पळकुटी भुमिका घेतली. हे कदम यांना माहिती पडताच ते बराच काळ शांत होते. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन एक दोरी घेतली आणि ते सरसर एका झाडावर चडले. स्वत:च्या गळ्याभोवती गळफास करून दोर बांधला आणि थेट खाली उडी मारली. तोवर काही लोकांनी हा प्रकार पाहिला असता ते धावत गेले. कदम यांना मिठी मारली परंतु गळ्याला दणका बसला आणि त्यांनी तडफड तडफड करुन आपले प्राण सोडले. त्यानंतर मोठ्या दु:खी अंत:करणाने हतबल बापावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
असले कार्टे जन्माला न आलेले बरे.!
मुलांना लहानचे मोठे करताना आई-बाप किती खस्ता खात असतात याची कल्पना मुलांना असते. परिस्थिती नसताना देखील स्वत: त्रास सोसतील मात्र आपल्या पाल्याचे प्रत्येक लाड आईबाप पुरवत असतात. विशेषत: मुलींना तर याची चांगलीच कल्पना असते. मात्र, तरी देखील एखाद्या फडतुस मुलासाठी मुली असले गलिच्छ कृत्य करुन घरातून निघुन जातात तेव्हा त्या आई वडिलांच्या काळजाला किती वेदना होत असतील त्याची यांना जरा देखील कल्पना नसावी का? त्यामुळे, येणार्या काळात तरी मुलांनी आणि मुलींनी यावर विचार केला पाहिजे. ज्या आई बापाने तुम्हाला जन्म दिला त्यांच्या मृत्युचे कारण तुम्ही होत असाल तर तुमच्या जगण्याचे देखील काहीच कारण नाही. जर आई बापांच्या जिवावर उठणार्या औलादी जन्माला येत असतील तर त्या पोटी न आलेल्या कधीही चांगल्या.
खरंतर समाज परिवर्तनकार निवृत्ती महाराज कायम सांगत असतात, प्रेमाला कोणाचा विरोध नाही. मात्र ते प्रेम लायक असले पाहिजे. मुलगा आयएएस आणि मुलगी आयपीएस असेल तर त्यांनी एकमेकांनी प्रेम केले तर तेथे जात, धर्म, पंथ आडवे येण्याचे काहीच कारण नाही. दोघांनी एकमेकांच्या पायावर उभे रहावे आणि दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने विवाह करावा. मात्र, बेवडा, व्यसनाधिन, दोन रुपये कमविण्याची अक्कल नसणार्या व्यक्ती प्रेमाची, पळून जाण्याची आणि संसाराची भाषा बोलतात तेव्हा यांची थोबाडं फोडली पाहिजे. खरंतर, या मुलीस पळून जायचे होते तर इतके कुभांड रचण्याची काहीच गरज नव्हती. चिठ्ठी लिहून निघुन गेली असती तर चारदोन दिवसात आई बापांनी एकमेकांना सावरुन घेतले असते. मात्र, पोलीस, महसुल, वनविभाग, पंचक्रोशीतील लोक, नातेवाईक सगळ्यांनी परिसर पिंजून काढला आणि अखेर मुलीचे कृत्य समोर आले. त्यामुळे वडिलांची मान खाली गेली. त्यामुळे, काही क्षणात त्यांनी मृत्युला जवळ केले.
मुलीवर गुन्हा दाखल करावा.!
एक विचारपुर्वक बनाव करून मुलीने घर सोडले. ही एक दिशाभूल करून आई बापास मानसिक त्रास देण्याचा प्रकार आहे. असे काहीतरी केल्याने आपली आई किंवा वडिल जीव देऊ शकतात हे माहित असून देखील पुर्वनियोजित कट रचण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे, संबंधित मुलगी आणि मुलगा या दोघांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. बापाच्या मृत्युला जबाबदार धरून मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल झाल्यास असल्या घाणेरड्या प्रवृत्तीला आळा बसू शकतो असे अनेकांना वाटते आहे. त्यामुळे, शासनाने फिर्यादी होऊन किंवा कदम परिवारातील कोणीतरी फिर्यादी होऊन या प्रकरणात पळुन गेलेल्या दोघांवर सदोष मुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी भावने पंचक्रोशीतील लोकांनी व्यक्त केली आहे.