अकोल्यात लोखंडे व रुपवते सरस.! वाकचौरेंची गद्दारी लोक विसरेना.! ठाकरेंनी टाळले असते तर हे पुन्हा पक्ष बदलुन वंचितचे उमेदवार असते.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
सन २००९ साली निष्ठावंत शिवसैनिकांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. मात्र, मंत्रीपदाची अभिलाशा लागली आणि त्यांनी मातोश्रीसोबत गद्दारी केली. इतकेच काय.! तर संगमनेरात निष्ठावंत शिवसैनिकांवर गुन्हे देखील दाखल केले. दुर्दैवाने वाकचौरे यांना पुन्हा उमेदारी मिळाली आणि अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आता लोखंडे नको म्हणून वाकचौरे जनतेने स्विकारले होते. मात्र, जशी उत्कर्षा रुपवते यांनी निवडणुकीत उडी घेतली. तशी वाकचौरे यांच्या नावाची चर्चाच कमी झाली. आपला माणूस आपल्यासाठी हे त्यांचे वाक्य रुपवते यांच्यासाठी मतदारांनी लागू केले. त्यामुळे, अकोल्यातील ७० टक्के कॉंग्रेस, तुतारीचे ४० टक्के मतदान बौद्ध समाजाचे ८० टक्के मते व दोघे नको म्हणून तिसर्या व्यक्तीला पसंती यात रुपवते यांचे अकोले व संगमनेरातून मतदान फार मोठे असणार आहे. तुलनात्मक पिचड आणि लहामटे एकाच व्यासपिठावर असल्यामुळे, लोखंडेंचा बॅकलॉक भरुन निघण्याची शक्यता आहे. मात्र, उबाठा सेनेचे दोन गट आणि गटात देखील गट पडल्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांना त्याचा फार मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. तर, सर्वात महत्वाचे म्हणजे येथे गडकरी, विखे आणि भलेभले नेते येऊन बड्या-बड्या बाता ठोकल्या, तरी तालुक्यातील जनता कोणाला भाळत नाही. हे कारखाना आणि आमदारकीला पाहिले आहे. त्यामुळे, संजय राऊत आले काय आणि गेले काय.! त्यात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या एक सुद्धा मताचा फायदा होणार नाही. असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
खरंतर, अकोले तालुक्यात पिचड-लहामटे-गायकर-मधुभाऊ नवले आणि भांगरे या नावाची जादु वगळता कोणी सत्ता पलटू शकते अशी ताकद कोणामध्ये नाही. बाकी अनेकजण उराला वाळु लावून बडवत असतात त्यांच्यावर न बोललेले बरे.! त्यामुळे, यंदा तालुक्यातील दोन्ही महत्वाच्या व्यक्ती लोखंडे यांच्या प्रचारार्थ एका व्यासपीठावर आहेत. त्यांनी जर मनापासून काम केले. तर, लोखंडे अकोल्यातून तारले जाऊ शकतात. तर, दुसरीकडे उत्कर्षाताई रुपवते यांच्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांचा जवळजवळ पत्ताच कट झाला आहे. कारण, ज्यांना लोखंडे नको होते म्हणून वाकचौरे पर्याय होते. त्यांनी दोघांना पर्याय म्हणून रुपवते यांना पसंती दर्शविली आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे रुपवते यांना शिर्डी मतदार संघातून अकोले आणि संगमनेर या दोन तालुक्यातून कॉंग्रेस मोठ्या प्रमाणावर मदत करताना दिसत आहे. कॉंग्रेसचे बडे नेते आणि सक्षम कार्यकर्ते रुपवते यांना मदत करा अशी गळ घालताना दिसत आहे. त्यामुळे, वाकचौरे यांचे जे हक्काचे मतदान होते. त्यांचे विभाजन होताना दिसत आहे.
अकोले आणि संगमनेर तालुक्यात कॉंग्रेसची टिम अंतर्गत रुपवते यांच्यासाठी काम करताना दिसत आहे. तर, कॉंग्रेसचे जबाबदार पदाधिकारी देखील रुपवते यांच्या पोष्ट शेअर करताना किंवा स्टेटस ठेवताना दिसत आहे. त्यामुळे, कॉंग्रेसच्या मतांचा फार मोठा फटका वाकचौरे यांना बसताना दिसतो आहे. तर, संगमनेरात तांबे व थोरात कुटुंबाची लेक म्हणून रुपवते यांनी पक्षापेक्षा घरात फार मोठे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे, अपक्ष म्हणून आमदार झालेले तांबे हे रुपवते यांच्यासाठी मैदानात उतरले तरी वावघे वाटण्याचे काहीच कारण नाही. किंवा अंतर्गत मदत केली तरी गैर वाटण्यासारखे काहीच नाही. कारण, सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेसमधून बंड करुन विजय मिळविला तेव्हा रुपवते यांचे देखील योगदान विसरुन चालणार नाही. त्यामुळे, अकोले व संगमनेरातून कॉंग्रेस रुपवते यांना सपोर्ट करताना दिसत आहे. अर्थात बोचरा विरोध म्हणून बाळासाहेब थोरात अनेकांच्या कानउघडण्या करतील, भर सभेत टिका करतील. मात्र, बेडवर बसून त्यांनी भाचा निवडून आणला हा इतिहास विसरुन चालणार नाही असे सुज्ञ मतदारांनी मत व्यक्त केले आहे.
आता हा तोटा कोणाला? तर निच्छित भाऊसाहेब वाकचौरे यांना. मुळात वाकचौरे यांनी २०१४ साली गद्दारी केली त्याचा रोष जनतेच्या मनातून गेला नाही. वरुन निष्ठावंत शिवसैनिकांनी जाब विचारला म्हणून गुन्हे दाखल केले. वाकचौरे कॉंग्रेसमध्येच थांबले नाही, तर त्यांनी पुन्हा भाजपात देखील प्रवेश केला. तेथे देखील त्याचे मन रमले नाही, त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. अर्थात ते कट्टर शिवसैनिक आहे का? छे.! मुळीच नाही. लोखंडे यांनी शिवसेनेची जागा मोकळी केली म्हणून वाकचौरे यांनी डाव साधला आणि निष्ठावंत बबन घोलप यांचा पत्ता कट करुन धुर्तपणे स्वत:ची जागा फिक्स केली. कदाचित त्यांना शिवसेनेने तिकीट दिले नसते तर वाकचौरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असते यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी वाकचौरे यांना पक्षात घेऊन चुक केली असे घोलप यांच्यासह अनेक शिवसैनिकांचे मत होते. पण, ज्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले त्यांनी गेली दहा वर्षे कोर्टाच्या पायर्या झिजविल्या आहेत. त्यांना वाकचौरे यांचा प्रचार करताना काय वेदना होत असतील? याचा विचार न केलेला बरा. पण, ते खरे शिवसैनिक म्हणावे लागतील ज्यांनी इतका त्रास होऊन देखील मातोश्रीचा आदेश सर्वोच्च मानला आहे. त्या शिवसैनिकांचे काय कारणार, त्याचे कसे कौतुक करणार हे संजय राऊत यांनीच सांगितले पाहिजे.
खरंतर गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह होते. त्यामुळे, ते तळागाळापर्यंत पोहचलेले आहे. आता जसे लोखंडे १० वर्षे दुर्गम भागात माहित नाही तसे वाकचौरे देखील माहित नाही. त्यामुळे, आदिवासी आणि सामान्य मानसांपर्यंत मशाल पोहचविणे हे वाकचौरे यांच्यासाठी फार कसोटीचे काम ठरले आहे. त्यात वाकचौरे यांच्याकडे भांगरे सोडता प्रभावी आदिवासी नेता नाही ज्याच्याकडे हक्काची व्हेटबँक आहे. त्यामुळे, भंडारदरा वगळता त्यांना फारसे मतदान होईल असे वाटत नाही. अकोल्यात उबाठा शिवसेना ही केवळ प्रवरा पट्ट्यात बरी असून त्यांच्यात देखील मोरे आणि धुमाळ असे गट विभक्त झाल्याने मतभेदाची दरी दिसून येत आहे. यात जे शिवसैनिक दोलायमान परिस्थितीत होते त्यांनी थेट उत्कर्षा रुपवते म्हणून वंचितचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे, प्रवरा पट्टा आणि मधुकर तळपाडे यांच्यामुळे समशेरपूर गटात वाकचौरे दिसतील. मात्र, तेथे देखील दराडे पॅटर्ण लोखंडे यांना किती चालतो हे येत्या निवडणुकीतच दिसून येणार आहे. मुळा भागात सिताराम पा. गायकर यांची चलती आहे. त्यांनी लोखंडे यांना समर्थन दिले असून दादांचा आदेश आम्ही तंतोतंत पाळु असा नारा गायकर पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे, ज्या पद्धतीने पुर्वी वाकचौरे यांची चर्चा होती ती आता राहिली नाही. त्यामुळे, नेवासा हेच त्यांना तारु शकेल असे एकंदर दिसते आहे.