जितकी लंकेंना मदत तितकी वाकचौरेंना का नाही, संगमनेरात शिवसेनेशी दगाबाजी.! नेत्यांच्या भुमिका गुलदस्त्यात.!

 
- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- 

                         शिर्डी मतदारसंघाची रणधुमाळी आता अंतीम टप्प्यात आली आहे. दिग्गज नेत्यांच्या सभा या मतदारसंघात होत आहे. त्यामुळे, आश्वासनांचा येथे निव्वळ पाऊस पडत आहे. सर्व नेत्यांनी भुमीका स्पष्ट केली असली तरी नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी बघ्याची भुमिका घेतली आहे. तीच धोक्याची घंटा भाऊसाहेब वाकचौरेंसाठी आहे. कारण, आ. सत्यजीत तांबे पदवीधरला उभे होते तेव्हा हॉस्पिटल मधुन पाच जिल्ह्यांपर्यंत आ. थोरात साहेबांची यंत्रणा पोहोचली होती. आज तालुक्याबाहेर यंत्रणा जात नाही. तालुक्यात आ. सत्यजीत तांबे फिरत नाही. जेव्हा सत्यजीत तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून भाजपने ब्र शब्द देखील काढला नाही. देशात एकनंबर असणाऱ्या भाजप पक्षाला साधा उमेदवार देखील सापडला नाही हे दुर्दैव की लोकसभेचे शहाणपण.? इतकेच काय! संपूर्ण विखे पाटील यंत्रणेने देखील पाठींबा दर्शवुन आ.सत्यजीत तांबे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता. तेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा देखील पराभव केला. तर गौणखनिजांच्या 819 कोटींच्या दंडामुळे काँग्रेसचे काही दिगग्ज नेते घराच्या बाहेर पडत नाही.भाऊसाहेब वाकचौरे पक्ष प्रवेश केल्यानंतर सर्वात नाराजी ही संगमनेरातील ठाकरे गटातील सैनिकांची होती. आज देखल शहर प्रमुख, माजी तालुका प्रमुख अनेक पदाधिकारी घराबाहेर पडायला तयार नाही. त्यामुळे, भाऊसाहेब वकचौरे यांना संगमनेरातुन देखील मतदानातुन धोका निर्माण होईल का?असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहे.

               खरंतर, आ. सत्यजीत तांबे हे साकुर गट व घुलेवाडी गटाचे जिल्हापरिषद सदस्य होते. संगमनेरात विद्यार्थी दशकांपासून ते राजकारणात आहे. त्यामुळे, गावागावातील नस ते ओळखुन आहे. तालुक्यात त्यांना मानणारा मोठा युवकवर्ग आहे. मात्र, पदवीधरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील ह्या उमेदवार उभ्या करून सत्यजीत तांबेना पडण्याची व्युहरचना आखली. पण, पराभव महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटलांचा झाला तर विजय आ. सत्यजीत तांबेचा झाला. मात्र, आ. सत्यजीत तांबे हे आज महाविकास आघाडीला धडा शिकवू शकतात. आ. सत्यजीत तांबे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारणातील जवळीकता सर्वश्रुत आहे. त्यामुळे, आ. सत्यजीत तांबे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, नगराध्यक्षा दुर्गा ताई तांबे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराची सुरवात करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर संगमनेरातील महसुल विभागाच्या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणून टाकले आहे. कारण, 819 कोटींच्या दंडाच्या यादीत काँग्रेसचे दिग्गज नेते आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढु नये म्हणुन ते घराच्या बाहेर पडत नसल्याचे दिसते. अनेक काँट्रॅक्टर मुगगिळुन बसले आहे. महसूलमंत्री विखे पाटील असल्याने संगमनेरातील नेत्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवले आहे. ते खाजगीत बोलताना दिसतात की, कुठे आ. थोरात साहेबांची निवडणूक आहे. विधानसभेला बघु त्यामुळे, भाऊसाहेब वकचौरेंना संगमनेरात देखील सतर्क राहण्याची गरज आहे. 

          दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. थोरात साहेब होते तेव्हा भाऊसाहेब कांबळे यांना शिर्डी लोकसभेची काँग्रेसकडुन उमेदवारी दिली. तेव्हा जाणता राजा मैदानावर सर्वात मोठी सभा राहुल गांधींची घेतली. सभेची चर्चा झाली. मात्र, रिझल्ट शुन्य. भाऊसाहेब कांबळे पेक्षा सदाशिव लोखंडेना 7 हजार मतांचे लीड संगमनेरात मिळाले. आज पुर्वी सारखी मोदी लाट नसली तरी संगमनेरात मागील दोन-तीन वर्षात वारंवार होणाऱ्या एचएम सारख्या घटनांमुळे ग्रामीण भागात देखील हिंदुत्वाची लाट दिसुन आली.कधी नवे असे संगमनेरात हिंदुत्वाचे मोर्चे दिसले. त्यामुळे, त्याचा अप्रत्यक्ष फायदा लोखंडेना होऊ शकतो असे राजकीय जाणकारांना वाटते. 2014 साली भाऊसाहेब वाकचौरेंचा थोरात विखेंवर एकदा विश्वास ठेऊन पराभव झाला. आता दुधाने पोळले तर ताक सुद्धा फुकुन प्यायला हवे असे राजकीय जानकरांना वाटते. त्यामुळे, वाकचौरेंकडे यंत्रणा नसली तरी थोरात साहेबांच्या यंत्रणेने तण, मन, धनाने काम करायला हवे.साकुर, घारागाव ते निमोण, तळेगाव व धांदरफळ ते आश्विपर्यंत सर्व गट गणाच्या घरापर्यंत मशाल चिन्ह पोहचवायला यंत्रणा कमी पडताना दिसत आहे. कारण, संगमनेर तालुका वगळता वाकचौरेंची यंत्रणा नाही. त्यामुळे, संगमनेरातुन अपेक्षित इतके मतदान झाले नाहीतर त्यांना पराभवाला सामोरे जावा लागेल. यासाठी घरात बसलेले पदाधिकारी बाहेर काढावा लागतील असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

दरम्यान, जे खासदार लोखंडे 2014 ला पंधरा दिवसात खासदार झाले 2019 ला लोणीच्या आशिर्वादाने झाले. त्यांनी वेळीच पाऊले ओळखुन ज्या भागात सर्वाधिक मते कमी होती तेथे निधी देऊन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. ज्या संगमनेर तालुक्यात फक्त 7 हजार मतांचे लीड मिळाले तेथे 149 गावात निधी दिला तर म्हाळुंगीच्या पुलाचे काम त्यांनी केले. निळवंडे धरणाचे कामाला निधी मिळाला.मात्र, परवानगी अडकल्या. निळवंडे पाठ पाणी कृती समिती व खासदार लोखंडे यांनी पाठपुरावा करून  केंद्रीय जलआयोग(cwc) 17 परवानग्या मिळवुन निळवंडेच्या कालव्यांना जलद गती दिली. त्यामुळे, 31 मे  2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाणी सोडले हे सर्व श्रेय खासदार लोखंडे घेत आहेत. त्यामुळे, संगमनेरात यावेळी खासदार लोखंडेना लीड मिळते की घटते हा येणारा काळच ठरवेल.