वंचितचा फटका वाकचौरे आणि लोखंडे दोघांनाही.! नियोजनाचा आभाव धोकादायक.! कसे असेल वंचितमुळे गणित.!

- सागर शिंदे   

सार्वभौम (अकोले) :- 

गेल्या कित्तेक दिवसांपासून बोलले जात आहे. की, वंचितमुळे महाविकास आघाडीला तोटा होऊ शकतो. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतांचे विभाजन होऊ शकते. मात्र, वास्तवत: काही अंशी हे खरे असले. तरी वंचितमुळे लोखंडे यांना देखील तितकाच फटका बसू शकतो असे ग्राऊंड रिपोर्ट सांगतो आहे. मात्र, तालुक्यानिहाय मतांची आकडेवारी वेगळी असू शकते. मात्र, तरी देखील नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर आणि अकोले या ठिकाणी वंचित मोठी मतांची अघाडी घेणार असून नेवाशात वाकचौरे यांचे तर अकोल्यात लोखंडे यांची मते कमी होतील असे एकंदर चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे चार डोके सोडले तर अकोल्यात वंचित औषधाला सुद्धा नसून रुपवते म्हणून मते मिळणार आहेत. मात्र, वंचितचे चिन्ह (कुकर) तळागाळापर्यंत पोहचले नाही. त्यामुळे, थोड्याहून दगाफटका होण्याची परिस्थिती आज मतदारसंघात आहे.

खरंतर वंचित बहुजन आघाडीने शिर्डी मतदारसंघात फार मोठा जीव आणला आहे. हे ही नको आणि तो ही नको म्हणून ज्यांना-ज्यांना पर्यांय हवा होता त्यांनी उत्कर्षा रुपवते यांच्यात पक्ष म्हणून नव्हे तर योग्य प्रतिनिधी म्हणून प्रतिबिंब पाहिले आहे. यात फक्त मतदारच नाही. तर,  दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेस आणि भाजपातील नेते कार्यकर्त्यांनी सुद्धा वंचितची री ओढली आहे. त्यामुळे, एकंदर राजकीय वातावरण पाहता ऊत्कर्षा रुपवते यांचा फटका फक्त वाकचौरे किंवा लोखंडे अशा एकालाच नसून तो थोड्याफार फरकाने प्लस मायनस दोघांना बसणार असल्याचे पहायला मिळणार आहे.

खरंतर नेवाशातून भाऊसाहेब वाकचौरे यांना शंकरराव गडाख यांच्यामुळे चांगले लिड असणार आहे. मात्र, त्याच ठिकाणी २०१९ मध्ये वंचितचे संजय सुखदन उभे होतेे. तेव्हा त्यांना नेवाशातून चांगली मते होती. त्यामुळे, तेथे भाऊसाहेब वाकचौरे यांची मते मोठ्या प्रमाणावर वंचित खाणार असल्याचे दिसते आहे. कोपरगावात कोल्हे आणि काळे या दोघांवर लोखंडे यांची धुरा आहे. मात्र, गणेश कारखान्यात कॉंग्रेसशी युती केलेल्या विवेक काळे यांची भुमिका अद्याप गुलदस्त्यात दिसत आहे. तर तेथील अनेक मतदारांना वाटते की, हा ही नको आणि तो ही नको. त्यामुळे, वाकचौरेंेचे कमी पण लोखंडे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

खरंतर श्रीरामपूर तालुक्यात कॉंग्रेसला चांगला प्रतिसाद आहे. तेथे लोखंडे यांच्या विरोधात वातावरण दिसत असून जी मते कॉंग्रेसला मिळणार होती. ती दलित आणि मुस्लिम मते वंचितच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. तेथे भाऊसाहेब वाकचौरे यांना चांगलाच तोटा सहन करावा लागणार आहे. कारण, तेथील हिंदुत्ववादी संघटना लोखंडे यांना सपोर्ट करणार असून बौद्ध वंचितमागे एकवटले आहेत. तर, मुस्लिमांनी देखील ऊत्कर्षा रुपवते यांना मदत करण्याचा सामाजिक ठराव घेतला आहे. इतकेच काय.! तेथील मनसे आणि अन्य कार्यकर्ते देखील वंचितच्या मागे उभे राहणार असल्याचे दिसते आहे. राहाता तालुक्यातून मात्र विखेंची यंत्रणा प्रामाणिकपणे काम करणार असून तेथे लोखंडे यांना चांलले लीड मिळेल असे स्थानिक मतदारांचे मत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचितसाठी श्रीरामपूर, संगमनेर आणि अकोले हे तीन तालुके फार महत्वाची भुमिका निभावणार आहे. यातील दोन तालुक्यात भाऊसाहेब वाकचौरे यांना चांगलाच झटका बसण्याची शक्यता आहे. तुलनात्मक संगमनेरातून ऊत्कर्षा रुपवते यांना चांगली मते मिळेल असे चित्र आहे. कारण, रुपवते ह्या कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या. त्यांनी संगमनेरात चांगली मानसे जमविली आहेत. त्यामुळे, जसे बाळासाहेब थोरात आ. सत्यजित तांबे यांच्या मागे दृश्यस्वरुपात उभे नव्हते. तरी त्यांचे कार्यकर्ते दादांसाठी दिवस रात्र एक करीत होते. तसेच चित्र संगमनेरात दिसण्याची शक्यता आहे. आज देखील कॉंग्रेसचे पदाधिकारी रुपवते यांचा प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे, कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी ऊत्कर्षा रुपवते ह्या बेशक भाऊसाहेब वाकचौरे यांची मते खाणार यात तिळमात्र शंका नाही.

हिच स्थिती अकोल्यात वेगळी असणार आहे. कारण, अकोल्यात डॉ. लहामटे व पिचड साहेब यांचे प्राबल्य आहे. मात्र, हे कट्टर विरोधक लोखंडेंच्या एकाच व्यासपिठावर आहेत. त्यामुळे, यांचेच कार्यकर्ते संभ्रमात आहेत. म्हणून तर ज्यांना जे करायचे ते करा अशा प्रकारे नेत्यांनी वर हात केला आहे. याचाच फायदा घेत डॉ. लहामटे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते ऊत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारात प्रचंड व्यक्त आहेत. तर, पिचड यांच्या कार्यकर्त्यांचा अंतर्गत प्रचार सुरु आहे. हे काय राष्ट्रवादी आणि भाजपा बाबत वातावरण नाही. तर, शरद पवार यांच्या गटाचे व कॉंग्रेस पक्षाचे काही नेते सुद्धा अंतर्गत ऊत्कर्षा रुपवते यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे, ही निवडणुक वाटते तितकी सोपी नाही. तुर्तेस अकोल्यात लोखंडे यांना वंचितचा तोटा होण्याची दाट शक्यता आहे.

रिपाई भाजपाकडून वंचित राहिली.!

नगर जिल्ह्यात वंचितची फारशी ताकद नाही. लोक उमेदवारांना किंवा रिपाईला पर्याय म्हणून वंचितकडे पाहतात. तर बाबासाहेबांचा नातू म्हणून वंचितशी भावना जोडतात. त्यामुळे, राज्यात वंचितला स्वत:चा अस्तित्व सिद्ध करता आले. म्हणून तर, राज्याच्या नव्हे, देशाच्या राजकारणात वंचित दखलपात्र आहे. मात्र, रिपाईला साधे एक सुद्धा तिकीट भाजपाने दिले नाही. शिर्डीत नाकारुन दक्षिणेच्या सभेला आठवलेंना निमंत्रण नाही. त्यामुळे रिपाईचे नेते विजय वाकचौरे, श्रीकांत भालेराव आणि सुरेंद्र थोरात यांच्यासह अनेकजण नाराज आहेत. त्यांनी ठरविले आहे. की, भाजपाला साथ द्यायची नाही. त्यामुळे, रिपाईचे अनेक कार्यकर्ते कोठे वंचितकडे किंवा विरोधी पक्षांकडे तर कोणी विखेंच्या इशार्‍यावर नाचताना दिसत आहेत. मात्र, नेवाशा पासून ते अकोल्यापर्यंत आणि कर्जत जामखेड, श्रीगोंद्यापासून ते कोपरगाव रिपाईची ताकत फार मोठी व निर्णायक आहे. मात्र, त्यांचे नेता वंचित राहिल्याने अनेकांची उपेक्षा झाली आहे.

वंचित प्रचार आणि प्रसारापासून वंचित.!

खरंतर ऊत्कर्षा रुपवते यांना फार कमी वेळ मिळाल्याने त्यांनी शक्य तितका मतदारसंघ पिंजून काढला आहे. एक तरुण उमेदवार असल्याने दिवसरात्र प्रत्येकाच्या उंबर्‍यापर्यंत जाताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजून देखील त्यांचे कुकर हे चिन्ह पोहचलेले नाही. लोकांना उमेदवार माहित आहे. मात्र, उमेदवाराचे चिन्ह माहित नाही. त्यामुळे, हक्काचे मतदान असून देखील ते मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे, रुपवते यांची यंत्रणा कमी पडताना दिसत आहे. प्रचाराच्या गाड्या, कार्यकर्ते, गावोगावी बुथ नियोजन याचा आभाव दिसतो आहे. विशेष म्हणजे समोरचे दोन्ही उमेदवार हे धनबलाढ्य व मोठ्या पक्षांचे आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडे पक्षनिधीसह आयते बुथ नियोजन आहे. त्यामुळे, जनतेच्या मनात रुपवते असल्या तरी त्यांना नियोजनाचा तोटा सहन करावा लागणार आहे.