वा रे गावकरी.! शाळेच्या आवारातील तमाशाल राडा, देवठाणच्या आजी-माजी सरपंचासह ५० जणांवर गुन्हे दाखल.! परवानगी घ्या अन्यथा थेट जेलमध्ये.!
अकोले तालुक्यातील देवठाण येथे काशाई मातेची यात्रा चालु असताना तमाशात फुल राडा झाला. ही माहिती पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. तमाशाला परवानगी घेतली होती का? अशी विचारणा केली असता यात्रेचे आयोजक निरुत्तर झाले. त्यानंतर पोलिसांनी काही व्यक्तींना पोलीस गाडीत घालुन थेट ताब्यात घेतले. या गुन्ह्यात देवठाणच्या ५० जणांवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यात गावचे आजी-माजी सरपंच, कारखान्याचे माजी संचालक, सोसायटीचे डायरेक्टर यांच्यासह व्यापारी आणि व्यवसायिक यांची नावे आहेत. त्यामुळे, कायद्याची पायमल्ली करणार्यांवर पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी कठोर कारवाई केल्यामुळे अनेकांचे धाबे दणानले आहेत. याप्रकरणी सुहास गोरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. १४ ते १७ एप्रिल २०२४ या दरम्यान देवठाण येथे काशाई मातेची यात्र चालु आहे. ही यात्रा देवठाण गावचे सरपंच निवृत्ती विश्वनाथ जोरवर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. जोरवर यांनी यात्रा आणि तमाशा यांची रितसर परवानगी घ्यावी अशी सुचना त्यांना पोलिसांनी दिली होती. मात्र, कायद्याला फाट्यावर कोलुन कोणी काही करत नाही या अविर्भावात जोरवर यांच्यासह आयोजकांनी कोणताही परवानगी न घेता तमाशा भरविला होता. दि. १५ एप्रिल रोजी रात्री देवठाण येथे तमाशात चालु असून तेथे राडा झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांना मिळाली होती.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी देवठाण येथे पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे, पोलीस कर्मचारी वलवे, पोलीस कर्मचारी घुले, बडे, गवारी आणि गोडगे यांची टिम घटनास्थळी पाठविली. पोलीस जेव्हा तेथे पोहचले तेव्हा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात लोकनाट्य तामाशा सुरू होत. तमाशाची रंगबाजी आणि शिट्ट्या यात रसिक बुडाला होता. तर काही ठिकाणी राडे सुरू होते असे पोलिसांच्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तमाशा बंद पाडला. कायर्र्क्रमाचे अध्यक्ष निवृत्ती विश्वनाथ जोरवर यांच्याकडे विचारणा केली. की, यात्रा आणि तमाशा यास परवानगी घेतली होती का? तेव्हा त्यांना सांगितले. की, आम्ही कोणताही परवानगी घेतली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी तेथून काही आयोजक यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
यावेळी पोलिसांनी २४ जणांची नावे निष्पन्न केली. त्यात सरपंच निवृत्ती विश्वनाथ जोरवर (सरपंच), अगस्ति कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके, केशव अर्जुन बोडखे (माजी सरपंच), पांडू सोनवणे, राम सहाणे, जालिंदर बोडखे (सोसायटी डायरेक्टर, देवठाण), रामहरी रखमा सहाणे, रमेश भाऊराव बोडखे (माजी सरपंच, देवठाण), रोहिदास सोनवणे, सौरभ सहाणे, बंटी सहाणे, आनंदा गिर्हे (मा. उपसरपंच), मारुती वाकचौरे, प्रकाश नवले, काशिनाथ गिर्हे, उमेश बाळासाहेब शेळके, संदिप ज्ञानेश्वर भांडकोळी, संजय भाऊराव शेळके, योगेश नामदेव सोनवणे, सुनिल घाडगे, शिवाजी वामन सोनवणे, सादिक मनियार, नारायण (पुर्ण नाव नाही) यांच्यासह यात्रा कमिटीचे इतर सदस्य व अनोळखी २५ ते ३० इसम रा. देवठाण, ता. अकोले जि. अ.नगर यांच्यावर कलम १४१, १४३, १८८, १८६ सह महा. पोलीस अधिनियम ३७ (१)(३) चे उल्लंघन केले. त्यामुळे यांच्यावर १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
शाळेच्या आवारात तमाशा.!
नाशिक जिल्ह्यातील एका शाळेच्या पटांगणात गौतमी पाटील यांचा कार्यक्रम झाला होतो. तेव्हा राज्यभर किती बाऊ झाला होता. त्यावर कारवाई देखील झाली होती. आता देवठाण गावात देखील शाळेच्या आवारात सकाळी शिक्षण आणि रात्री नाचकाम होतेय. याची देखील चौकशी झाली पाहिजे. जर शाळेचे जबाबदार घटक आणि गटशिक्षण अधिकारी हे जर बघ्याची भुमिका घेणार असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी यासाठी सीईओ यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. तर, देवठाण येथे अरुण शेळके यांच्यासारखे गावपुढारी उजाळ माथ्याने फिरतात आणि शिक्षणाविषयी गप्पा ठोकतात ते या गोष्टीला मुकसंमती देतात का? हे देखील अनेकांना जाणून घ्यायचे आहे. विशेष म्हणजे यांनी यात्रेला आणि तमाशाला पोलीस परवानगी घेतली नव्हती. तर, शाळेची परवानगी घेतली होती असे म्हणणे म्हणजे जोक ठरेल. याची चौकशी गटशिक्षण अधिकारी वाव्हळ यांनी करावी अशी मागणी केली जात आहे. अन्यथा कायद्यावर बोट ठेवणार्या वाव्हळ यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागु शकते. आज पटांगणात तमाशा भरतो उद्या चालु शाळेत तमाशा भरविला तरी शिक्षण विभाग त्याचा आनंद लुटण्यासाठी गेला तर वावघे वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण, तसेही समशेरपुर गटात विद्यार्थी आणि शिक्षक खाजगी कार्यक्रमास गेले आणि त्याची चौकशी सुरू झाली. अर्थात अकोले तालुक्यात शिक्षण विभागाचा भोंगळा कारभार अद्याप देखील सुरूच आहे. मात्र, तुर्तास या प्रकरणात काय होते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
शिक्षण विभागाचा गोंगळा कारभार.!
दरम्यान याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी अभयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली. की, अशा प्रकारे कोणालाही शाळेच्या आवारात तमाशा भरविता येत नाही. याबाबत मला काही कल्पना नाही. मी माहिती घेतो. त्यानंतर विस्तार अधिकारी यांना देखील याबाबत माहिती नसल्याचे लक्षात आले. म्हणजे एकीकडे शाळेेच्या आवारा तमाशे भरतात, राडा होतो आणि अधिकारी व सर्वच अनभिज्ञ असतात म्हणजे शिक्षण विभागाचा किती भोंगळा कारभार सुरु आहे. हे लक्षात येते. दिवसा ज्ञानार्जन करणारी शाळा संध्याकाळी ठुमके सहन करते. ते ही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सकाळी मुले शाळेत शिकतात आणि रात्री मुन्नी बदनाम व अंगप्रदर्शन करणाऱ्या महिलांचे नाचकाम पहात असतील तर त्यांनी कोणते संस्कार अंगिकारायचे? असा प्रश्न शिक्षप्रेमी व्यक्तींनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे स्थानिक पुढारक्या करणारे तेथील नेते शिक्षण आणि संस्कार यावर भल्याभल्या बाता ठेकतात आणि आम्ही शाळेचे किती हितचिंतक आहोत हा अविर्भाव तालुक्यात येऊन दाखवतात. पण, गावात शाळेतील पटांगणात तमाशा आणि राडे होतात याकडे मात्र नेते कलाकुसर आणि ठुमके म्हणून पाहतात. त्यामुळे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे या नेत्यांकडे पाहून प्रतित होऊ लागले आहे. आता या तमाशाले ते एखादे गोंडस नाव देतील आणि त्याला काय होते? असे म्हणून मालीश केली तर वावघे वाटण्याचे काहीच काम नाही.