अनैतिक संबंधातून संगमनेरातील भावाची हत्या, डोक्यात दगड टाकून चाकुने गळा कापला, दोघांना ठोकल्या बेड्या.!

 

सार्वभौम (संगमनेर):- 

                      अनैतिक संबंधाच्या कारणावरून मावसभावाच्या गळ्यावर चाकूने वार करून डोक्यात दगड घालुन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयताच्या जवळच्या व्यक्ती सोबत मावस भावाचे नाजुक संबंध होते. त्यामुळे, आपले पितळ उघडे पडायला नको. त्याला पार्टी करण्यासाठी बोलावुन दोघांनी दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय 36,रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) याची निघृणपणे हत्या केली. ही घटना 31 मार्च 2024 रोजी घडली. याप्रकरणी  कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव (रा. चिंचोलीगुरव, ता. संगमनेर), अजय सुभाष शिरसाठ (रा. चास, ता. सिन्नर) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत दिलीप सोनवणे हा आरोपी याचा पाहुणा आहे. आरोपी कृष्णा जाधव हा जवळचा नातेवाईक असल्याने मयत दिलीप सोनवणे यांच्याकडे नेहमी जाणे-येणे होते. मात्र, जाधव याची वागणुक चांगली नव्हती असे त्यांना वाटत होते. आरोपी जाधव याचे जवळच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध आहे अशी मयत याला शंका होती. मात्र, दोघेही सोबतच मजुरी काम करत असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घरी जात असे. तो नेहमी मयत सोनवणे याच्यावर पाळत ठेवुन होता. दरम्यानच्या काळात आरोपी जाधव आणि संबंधित महिला यांची भेट झाली. हे मयत सोनवणे यांच्या कानावर कुणकुण लागली. त्यामुळे, मयत सोनवणे हा आपल्या संबंधात नेहमी अडसर ठरतो याचा काटा काढला पाहीजे असे आरोपींनी ठरवले.

           दरम्यान, आरोपी कृष्णा जाधव यांनी मयत दिलीप सोनवणे याला 31 मार्च 2024 रोजी कामाच्या नावाखाली घरून घेऊन गेले. आरोपी कृष्णा जाधव याचे संबंधीत महिलेवर इतका जीव जडलेला होता की, तो तिच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार होता. आरोपी कृष्णा जाधव त्याचा मित्र अजय शिरसाठ या दोघांनी मयत सोनवणेला ठार मारण्याचा प्लॅन बनवला. या दोघांनी मयत सोनवणेला कामावर घेऊन न जाता त्यांनी हॉटेलकडे नेले. आज पार्टी करू म्हणुन यांनी दारूच्या बॉटल घेतल्या. ह्या बॉटल घेऊन ते कहांडळवाडी शिवारात पडीक जमीन पाहुन कुठली वस्ती नाही असे ठिकाण शोधले. पार्टी मिळणार म्हणल्यावर आज एन्जॉय करायचा असे ठरवले. मात्र, तोच दिवस त्याचा शेवटचा असेल हे त्याला देखील वाटले नव्हते.

दरम्यान, पार्टी सुरू झाली. मद्यपी होऊन मयत सोनवणेला झिंगाट केले. आरोपी कृष्णा जाधव व अजय शिरसाठ हे पूर्ण प्लॅनने आले. धारधार शस्र सोबत ठेवले. दारूची नशा सोनवणे यांना चढताच या दोघांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सोनवणे यास बेदम मारहाण करून धारधार शस्राने त्याच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालुन जागीच ठार केले. तो कोणाला दिसु नये म्हणुन आरोपी जाधव व शिरसाठ यांनी लिंबाच्या फांद्या व पाला टाकुन ही बॉडी झाकुन ठेवली. आता कोणाला दिसणार नाही.आपले काम फत्य झाले असे समजुन आरोपी हे घटनास्थळाहुन निघुन गेले.

           दरम्यान, दि. 3 मार्च 2024 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने हा मृतदेह पाहिला त्यांनी तत्काळ पोलीस पाटील यांना फोन केला. त्यानंतर काही वेळानंतर गावकरी घटनास्थळी हजर झाले आणि याबाबत वावी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला तपास सुरू केला. मयताची ओळख पटली आणि त्यानंतर आरोपी कोण? त्यांनी ही हत्या का केली? पुरावे कसे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनेचा उलगडा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली. आरोपी कसारा रेल्वे मार्गाने पळून जाण्याच्या मार्गावर होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस नाईक विनोद टिळे यांना गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुर्वे यांनी एक पथक तयार केले. त्यांनी थेट कासारा गाठला तेथे एका हॉटेलवरून आरोपी कृष्णा जाधव व अजय शिरसाठ यांना ताब्यात घेतले. अतिशय अवघड असा तपास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने करून या खुनाची उकल केली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पो. ना.नवनाथ सानप,विनोद टिळे,विश्वनाथ काकड,हेमंत गिलबिले,प्रदीप बहीरम,विकी म्हसदे,गणेश परदेशी यांनी ही दमदार कामगिरी केली. यात कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव (रा. चिंचोलीगुरव,ता. संगमनेर) व अजय सुभाष शिरसाठ (रा. चास, ता. सिन्नर) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची उकल केल्यामुळे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.