संगमनेरात तलाठ्याचा कारनामा, मला डान्सबारला नेवून बील भर, वाळुतस्कराकडे हाप्ते भागत खोटा गुन्ह्याची धमकी, तलाठी मुळे महसुल खाते बदनाम.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात पोलीस व महसुलखाते नेहमीच वादाच्या भोवर्यात सापडले आहे. कधी वाळु तस्कारांच्या मागे लागल्यामुळे अपघात होऊन अनेकांचा मृत्यु होणे तर कधी दारुच्या नशेत हाप्तेखोरीचे व्हिडिओ व्हायरल होणे. त्यामुळे, अनेकदा महसुल विभागाची आब्रु वेशिवर टांगली गेली आहे. आता पुन्हा तसाच एक प्रकार समोर आला असून एका तलाठ्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर वेगवेगळे आरोप देखील करण्यात आले आहे. फुकट वाळु टाकणे, २० हजारांची मागणी, मुंबईला डान्सबारला घेऊन जाण्याची मागणी अन्यथा ३५३ सारख्या गुन्ह्यात खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी एका व्यक्तीला देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पोलिसांनी केवळ तक्रार दाखल करुन घेतली आहे. त्यामुळे, संबंधित व्यक्तीने लाचलुचपत विभागाची दारे ठोठावली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धांदरफळ खुर्द परिसरात राहणार्या एका व्यक्तीने दि. ११ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे. की, दि. १० मार्च २०२४ रोजी रात्री एका तलाठी महोदय मुळे तक्रारदार यांना प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. या तलाठ्याने तक्रारदार यास सांगितले. की, तु माझ्या जवळच्या मित्राला फुकट वाळु टाक व मला २० हजार रुपये रात्रभर वाळु वाहतूक करण्यासाठी दे. जर असे केले नाही तर तुझा ट्रॅक्टर मी धरुन घेऊन जाईल व तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली.
दरम्यान, तलाठी महोदय संबंधित वाळु तस्कारास म्हणाले. की, तु मला मुंबईला घेऊन जा व माझा जेवढा खर्च होईल तेव्हढा कर. जर तुला हे शक्य नसेल तर तुझ्यावर मी वाळु चोरीचा किंवा कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा) हा गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली. या दरम्यान तलाठी महोदय यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ तक्रारदार यांच्याकडे आहे. त्यामुळे, त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि आपली कैफीयत अधिकार्यांसोबत कथन केली. मात्र, महसुलचा आरोप आणि वर्दी साक्षिदार त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. संबंधित पुरावे देखील सादर करण्यास तक्रारदार तयार आहे. मात्र, त्यावर फारसे काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे, तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत विभाग गाटला आहे. आता यात पुढे काय होते? हे पाहणे महत्वाचे आहे.
खरंतर, संगमनेर तालुक्यात अद्याप देखील महसूल विभागाच्या वरदहस्ताने वाळु चोरी आणि गौणखणिज चोरी सुरु असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरात गौणखणिजाबाबत प्रचंड तणावपुर्ण वतावरण केले होेते. मात्र, चोर पोलिसांच्या खेळात याच धांदरफळमध्ये तीन जणांचा जीव गेला. अद्याप वाळु चोरी सुरू आहे विशेष म्हणजे या तलाठी महोदय मुळे महसुल खात्याची आब्रु आता वेशिवर टांगल्यासारखी झाली आहे. या आरोपांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. खरोखर २० हजार मागितले का? खरोखर डांन्सबारला जायचे आहे का? खरच जो व्हिडिओ आहे तो वास्तव आहे का? जर असेल तर प्रांताधिकारी आणि तहलसिलदार यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या सगळ्या प्रकरणात खुद्द महसुलमंत्र्यांनी लक्ष घालावे असे मत संगमनेरकरांनी व्यक्त केले आहे.