१० वीच्या मुलीवर अत्याचार, माझे तिच्यावर प्रेम आहे असे म्हणत पाहुण्याने लग्न मोडले, तिने गंभीर गुन्हा दाखल केला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील एका मुलीस वारंवार ब्लॅकमेल करुन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. मात्र, नंतर मुलीचे लग्न जमले असता या व्यक्तीने पीडित मुलीच्या होणार्या पतीस सांगितले. की, आमचे एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे, तु हिच्याशी लग्न करु नको. त्यानंतर पीडित मुलीने याला धडा शिकविला असून थेट जेलची हवा त्यास खायला घातली आहे. ही धक्कादायक घटना नोव्हेबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ रोजी वेळोवेळी घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल कचरु उर्फ विभीषण लहामगे (रा. मनेगाव, ता. कोपरगाव) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, आरोपी सुनिल लहामगे हा पीडित मुलीच्या घरी ये जा करीत होता. तो नोव्हेंबर २०२२ रोजी देखील पीडित मुलीच्या घरी गेला होता. त्यावेळी तिच्या घरचे लोक बाहेर गेले होते. घरात मुलगी एकटी पाहून त्याने तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने त्यास विरोध केला. तु मला फार आवडतेस असे म्हणून या विवाहीत आरोपीने अल्पवयीन मुलीस बळजबरी मिठी मारली, त्यावेळी मुलगी घाबरुन गेली. तुम्ही आमच्या घरी पाहुणे म्हणून आलात आणि पाहुणे म्हणून निट रहा. अन्यथा मी तुम्ही जे काही कृत्य केले ते आई वडिलांना सांगून देईल. अशी तंबी देत मुलगी तेथून निघुन गेली.
दरम्यान, पाहुण्यांची कानऊघडणी होऊ नये, त्यांची इज्जत वाचावी म्हणून पीडित मुलीने घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही. मात्र, त्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा मुलगी पाहुणे म्हणून आरोपीच्या घरी गेली. तेव्हा याच्या जुन्या भावना पुन्हा जाग्या झाल्या आणि त्याने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. घरात कोणी नसल्यानंतर याची वाकडी नजर पीडित मुलीवर पडत होती. हा कायम तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, जे काही घडते आहे ते आई वडिलांना सांगावे तर त्यांना विश्वास पटेल अशी परिस्थिती नव्हती. पाहुणे असल्यामुळे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार अशी स्थिती पीडित मुलीची झाली होती. मात्र, त्याच्यापासून लांब राहणे यापेक्षा दुसरा पर्याय पीडितेकडे नव्हता आणि ती कोणाला सांगत नाही म्हणून याला वारंवार संधी मिळत होती.
दरम्यान, ३१ डिसेंबर २०२३ रोजी पार्टी करु असे म्हणत आरोपी पीडित मुलीच्या घरी आला होता. पार्टीच्या नावाखाली आरोपीने मुलीस एका चारचाकी गाडीत बसविले आणि थेट मनेगाव येथील एका शेतात असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे काही पार्सल नेले होते यांनी त्या शेतात जेवण केले. तेथे पीडित मुलीच्या बहिनीस मरुन टाकू, आई वडिलांना मारेल असे म्हणत आरोपीने तिच्यावर बळजबरी अत्याचार केले. घडला प्रकार जर कोणाला सांगशील तर तुझा सुद्धा काटा काढल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी आरोपीने दिली. त्यामुळे, अत्याचार होऊन देखील पीडित मुलीने या प्रकाराची कोठे वाच्चता केली नाही. जे झाले ते झाले असे म्हणत पुन्हा त्या वाटेला जायचे नाही असे देखील तिने ठरविले होते. मात्र, आता खर्या अर्थाने आरोपीस चटक लागली होती.
दरम्यान, जेव्हा-जेव्हा आरोपीस संधी मिळत होती. तेव्हा-तेव्हा तो पीडित मुलीस धमक्या देत होता. असे दोन-तीन वेळा आरोपीने पीडितेस पत्र्याच्या शेडमध्ये नेवून अत्याचार केला. मात्र, आरोपी आणि मुलीच्या कुटुंबाचे चांगले संबंध असल्यामुळे आरोपीला हे लोक पाठीशी घालतील म्हणून तिने कोणताही प्रकार कथन केला नाही. मात्र, त्यानंतर जेव्हा पीडित मुलीचे लग्न ठरले तेव्हा आरोपी सुनिल कचरु उर्फ विभीषण लहामगे याने चांगलाच राडा उभा केला. ज्या ठिकाणी लग्न ठरले त्या मुलास याने फोन करुन सांगितले. की, माझे त्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहे. त्यामुळे तिच्यासोबत लग्न करु नको. याच्या असल्या घाणेरड्या कृत्यामुळे पीडित मुलीचे लग्न मोडले. मग मात्र मुलीने कोणताही विचार न करता आरोपी सुनिल कचरु उर्फ विभीषण लहामगे याच्या विरोधात बलात्कारासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.