खा. लोखंडे नावाचे पार्सल मतदार मुंबईला पाठवतील आणि साईबाबा आशीर्वाद देखील.! १० वर्षात यांचे तोंड सुद्धा मतदारांना माहित नाही.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
१० वर्षे शिर्डीतून खासदार असताना सदाशिव लोखंडे यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. २०१४ साली मोदी लाटेत निवडून गेलेेले लोखंडे जेव्हा २०१९ साली पुन्हा निवडून आले तेव्हा खर्या अर्थाने अनेकांनी त्या मशिन घोटाळ्याला दुजारा दिला होता. कारण, जो तो म्हणत होता आम्ही त्यांना मतदान केले नाही, मग मते दिली कोणी? याचे उत्तर अद्याप कोणाला मिळाले नाही. आता मात्र, दोन वेळा केलेल्या चुका पुन्हा जनता करेल असे वाटत नाही. साईबाबांच्या नावाने जोगवा मागणार्या लोखंडेंना लोकशाहीचे मतदार पुन्हा मुंबईला पाठविल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर अकोले, संगमनेर आणि राहाता परिसरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचे पहायला मिळाले. अकोले आणि संगमनेर तालुक्यात लाखो मतदारांनी त्यांचे तोंड देखील पाहिले नाही ते खासदार आहेत की पहिलवान. अन अशात ते म्हणाले, मी प्रत्येक गावात निधी दिला आहे. हे वाक्य त्यांच्या संसदेतील नेत्याप्रमाणे फेकू आणि धाडसी होते. तुलनात्मक वाकचौरे यांची तुलना करताना त्यांनी सभामंडपांची खिल्ली उडविली असली. तरी, भाऊसाहेब वाकचौरे यांची २०१४ मधील गद्दारी आणि सर्व पक्ष फिरुन जाग्यावर येण्याची चूक वगळता त्यांची कामे खरोखर पाच वर्षाच्या तुलनेत गावोगावी होती. तसे लोखंडे यांचे नाव देखील १० वर्षात मानसांपर्यंत तर सोडाच, गावोगावी देखील पोहचले नाही. त्यामुळे, त्यांनी १० वर्षे काय केले? याचे उत्तर सामान्य मतदारांनी विचारले तर त्यात वावघे काय आहे?
१८२ गावांना पाणी या मुद्द्यावर त्यांनी रान पेटविले आहे. वारंवार ते उगळून लोकांना सांगितले जात आहे. मात्र, जे पाणी खाली जातेय त्या अकोले तालुक्यात यांनी १० वर्षात किती निधी आणला आणि किती धरणे बांधली? किती पाणी आडविले आणि घाटमाथ्यावरील किती लोकांचा विचार केला? खासदार म्हणून भलेही पाच कोटी निधी असेल. मात्र, अन्य योजना कमी नाहीत, केंद्रीय मंत्र्यांकडून वेगवेगळ्या योजना मंजुर करुन कोट्यावधी निधी आणता येतो, मतदारसंघाचा विकास करता येतो. खा. सुजय विखे यांनी हे दाखवून दिले आणि शहरातील उड्डाण पुलासह अनेक ठिकाणी विकासाची कामे केली. लोखंडे यांना मात्र, कोपरगाव ते शिर्डी हे उदाहरण सोडता मोठे एक देखील काम सांगता येणार नाही. त्यामुळे, त्यांना शिंदे गटातून एकतर तिकिट मिळणे शक्य वाटत नाही. अन दिलेच तर केंद्रातील एक खासदार कमी झाला असे त्यांनी गृहीत धरावे अशी चर्चा भाजपाच्या गोटात सुरू आहे. कारण, जनभावना वेगळ्या असताना असा निर्णय घेणे म्हणजे हाताने पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखा आहे.
खरंतर शेतकरी व व्यापार्यांच्या पालेभाज्यांसाठी मार्केटमध्ये कोल्ड स्टोअरेज उभारणार्या खासदाराने शेतकर्यांचा माल शिल्लक राहणार नाही यासाठी हमीभाव कसे मिळेल, कांद्याचे प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष द्यायला हवे होते. मात्र, सरकारच्या सुरात सुर मिळविण्याचे काम लोखंडे यांनी केले असे मत शेतकर्यांनी व्यक्त केले आहे. पहिल्या पाच वर्षात नगर जिल्ह्यातील कोणाकडे जावे हेच या खासदारास कळले नाही असे ते म्हणतात आणि दुसर्या पाच वर्षात शिंदे गटात जावे की ठाकरे गटात राहवे हेच काळले नाही. त्यामुळे, यांनी आता थेट मुंबईला त्यांच्या घरी जावे. तो मार्ग शिर्डी मतदारसंघाचे मतदार तुम्हाला दाखवून देतील आणि तिथवर जाण्यासाठी शिर्डीचे साईबाबा तुम्हाला आशीर्वाद देतील असे मत मतदारांनी व्यक्त केले आहे.
क्रमश: भाग २