उत्कर्षा रूपवतेंची उमेदवारी लोखंडे व वाकचौरेंना डोकेदुखी.! वंचितकडून त्या खासदार होऊ शकतात. फक्त गायब होऊ नका.!

      

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

शिर्डी लोकसभेची जागा आरक्षित असल्यामुळे येथे कायम सावळा गोंधळ पहायला मिळाला आहे. ही जागा एसी प्रवर्गातून कोणत्या जातीला द्यायची? येथून सुरुवात होते. तेव्हा पर्याय शोधला जातो तो म्हणजे दगडापेक्षा विट मऊ.! अर्थात राज्यभर बौद्धांना डावलुन हो ला हो म्हणणार्‍या आणि कारखाणदारी व संस्थांमध्ये हस्तक्षेप न करणार्‍या व्यक्तींना बळ देऊन कानाखालची मानसे उभी केली जातात. हाच पायंडा प्रस्थापित नेत्यांनी पाडला आहे. त्यामुळे, उत्कर्षा रुपवते, विजय वाकचौरे, अशोक गायकवाड, संदिप घोलप, भारत भोसले यांच्यासारख कर्तुत्वान लोक मागे राहून जातात. मात्र, पिढ्यान पिढ्या कॉंग्रेसची विचारधारा अंगिकारणार्‍या उत्कर्षा रुपवते यांना यंदा देखील  डावलल्याने त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे. त्या वंचितकडून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर खरोखर भाऊसाहेब वाकचौरे (उबाठा), सदाशिव लोखंडे (शिंदे गट) आणि उत्कर्षा रुपवते (वंचित) अशी निवडणुक झाली. तर, चित्र वेगळे असू शकते. फक्त जसे २००९ मध्ये प्रेमानंद रुपवते यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि मध्यस्ती मातोश्रीवर पोहचले परंतु रुपवते आऊट ऑफ कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेले. अन्यथा बाबुजी तेव्हाच खासदार झाले असते. ती वेळ त्यांच्या मुलीवर येऊ नये म्हणजे झालं.!!

पुर्वी कॉंग्रेसची विचारधारा सेक्युलर तथा पुरोगामी होती. आता मात्र तसे वाटत असेल तरी तसे राहिले नाही. बौद्ध, मुस्लिम, ओबीसी आणि वैचारिक लोक ही त्यांची व्होटबँक होती. मात्र, त्यांच्याच पक्षात भेसळ झाल्यामुळे विचारधारा अगदी तुरळक पहायला मिळते आहे. तर, यांच्यातील वैचारिक लोक इडीच्या धाकाने म्हणा, स्वत:चा भ्रष्टाचार दाबण्यासाठी किंवा जेलमध्ये जाण्याच्या भितीपोटी यांनी पक्षाच्या विचारधारेला खिंडार पाडले. त्यामुळे, त्यांचेच पायतान त्यांच्या पायात राहिले नाही. परिणामी, एकेकाळी बौद्ध आणि मुस्लिम समाज हे त्यांचे हक्काचे मतदान असायचे. आता हेच लोक कॉंग्रेसकडे काना डोळा करुन भाजपाला मतदान करत आहे. अर्थात यांनी देखील बौद्धांना प्रतिनिधित्व देणे कमी केले. आश्‍वासने देऊन त्याची पुर्ती केली नाही. म्हणून तर प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यासारखे नेते त्यांच्यापासून दुर गेले. परिणामी मतांचे विभाजन होत गेले. कॉंग्रेस किंवा आघाडीच्या जागा थोड्या मतांहून पडत गेल्या. हे गेल्या १५ वर्षापासून होत आले आहे. तरी देखील कॉंग्रेसला शहानपण आलेले नाही. उद्या शिर्डीच्या जागेबाबत तसे झाले तर नवल वाटण्याचे काहीच कारण नाही.

खरंतर उत्कर्षा रुपवते यांनी कॉंग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीत जाणे हे त्यांच्या राजकीय करिअरसाठी एक वेगळे वळण देणारे ठरू शकते. फक्त त्यांनी असा क्रांतीकारी निर्णय घेणे गरजेचे आहे. २०१९ साली डॉ. सुजय विखे यांनी देखील कुटुंबाच्या विरोधात जाऊन खासदारकी लढविली होती. २०२२ साली सत्यजित तांबे यांनी देखील पक्षाचा विरोध असताना देखील उमेदवारी केली होती. त्याचे परिणाम काय झाले हे आपण पाहतो आहे. एक खासदार तर एक आमदार झाला. आज भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर गद्दारी, पक्षबदल आणि अनेक प्रस्तापित नेते कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जाते. सदाशिव लोखंडे यांना तिकीट मिळणे मुश्किल होते, त्यांच्याविषयी नेते, मतदार, कार्यकर्ते देखील सोईचे बोलत नाही. त्यामुळे शिर्डीला एका नव्या चेहर्‍याची गरज आहे. तो चेहरा उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने पहायला मिळू शकतो. कारण, वंचितला २०१९ मध्ये ६२ हजार ९५२ म्हणजे सरासरी ६३ हजार मतदान आहे. तुलनात्मक रुपवते तरुण, सुशिक्षित, कोणालाही न उभारणार्‍या, कोणाच्या संस्थामध्ये हस्तक्षेप न करणार्‍या, कारखानदारीत अडचणी न आणणार्‍या उमेदवार आहेत. फक्त त्यांनी २४ तास देऊन मैदानात उतरुन काम केले पाहिजे. 

खरंतर शिर्डी लोकसभा मतदार संघात सरासरी ३ लाख लोक अनुसुचित जातीचे लोक आहेत. त्यात आठवले गट सक्षम असून देखील त्यांना राज्यात साधी एक सुद्धा जागा देण्यात आली नाही. आठवलेंचे भागले म्हणजे तेथे रिपाई पक्ष संपतो अशी भाजपा पक्षाची धारणा असावी. त्यामुळे, रिपाईचे किंवा बौद्ध लोक भाजपाच्या उमेदवारास मतदान करणार नाही. परिणामी डॉ. बाबासाहेबांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाते आणि लोक बेधडक वंचित बहुजन आघाडीला मतदान करतात. हे फॅक्टर शिर्डी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पहायला मिळु शकतो. तर, २००९ साली जसा कॉंग्रेसने आठवलेंचा काटा केला. तसा यंदा रुपवते यांच्यासाठी तांबे आणि थोरात कुटुंब मदत करुन वाकचौरे यांचा देखील काटा करु शकते अशी चर्चा आहे. तर विखे कुटुंबातून देखील लोखंडे यांना फारसे चांगले वातावरण नाही. जसा युवा चेहरा म्हणून विखे कुटुंबाने सत्यजित तांबे यांना मदत केली. तसे रुपवते यांना देखील ते मदत करु शकतात. त्यामुळे, रुपवते यांची उमेदवारी लोखंडे आणि वाकचौरे या दोघांची डोकेदुखी ठरु शकते आणि जसे औरंगाबादमध्ये इम्तीयाज जलिल खासदार झाले तसे मतांचे विभाजन होऊन रुपवते देखील खासदार होऊ शकतात. 

क्रमश: भाग ३