वंचित भाजपाची बी टिम तर मग वंचितची मते कॉंग्रेसला चालतात का? उत्कर्षा रुपवतेंचा बाळासाहेब थोरात यांना टोला, कॉंग्रेस भाजपाला मदत करतेय.!

- सागर शिंदे

सार्वभौम (शिर्डी) :- 

                            वंचित ही भाजपाची बी टिम आहे, वंचितला मतदान म्हणजे भाजपाला मतदान अशा प्रकारचे वक्तव्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. त्यावर उत्कर्षा रुपवते यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता चोख उत्तर दिले असून त्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. वंचित जर भाजपाची बी टिम आहे तर मग कोल्हापूर येथील कॉंग्रेसच्या उमेदवाराला वंचितने पाठींबा दिला आहे, तो घ्यायला गोड वाटतो का? सोलापूर येथे 2019 च्या निवडणुकीत वंचितने 1 लाख 70 हजार मते घेतली होती. तरी, देखील आज 2024 मध्ये तेथे कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. इतकेच काय.! बारामती, शिरुर यांसह अन्य ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीतील उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, बाळासाहेब थोरात यांनी जी टिका केली. त्यावर वंचितने त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यापलिकडे जर वंचित भाजपाची बी टिम असेल तर, कॉंग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना अकोला येथे पाठिंबा देऊन भाजपाला सपोर्ट केला का? असा प्रश्न राजकीय विश्लेशकांनी उपस्थित केला आहे.

खरंतर बाळासाहेब थोरात यांच्या नादाला लागून ना प्रेमानंद रुपवते खासदार होऊ शकले. ना उत्कर्षा रुपवते यांना संधी मिळाली. बाबुजी यांनी २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केले असता तर तेव्हा ते खासदार झाले असते आणि त्यांच्या परंपरेने आज उत्कर्षा रुपवते ह्या देखील खासदार असत्या. मात्र, बौद्ध नेत्यांची छोट्यामोठ्या पदांहून बोळवण करायची आणि पुरोगामी विचार व संविधान वाचवायचे आहे असे म्हणत भाजपाला शह द्यायचे काम कॉंग्रेसने केले. त्यांच्या असल्या चेहर्‍याचा बुरखा फाडण्याचे काम रामदास आठवले यांनी केले आणि कॉंग्रेसला रामराम करुन त्यांनी भाजपाशी युती केली. गेल्या २० वर्षात ना संविधान बदलले ना दंगली झाल्या. उलट आता कॉंग्रेसचे नेतेच कॉंग्रेसमध्ये रमत नाही. त्यांनी भाजपात प्रवेश करुन कॉंग्रेसचा हात सोडला आहे. आपलेच पायतान आपल्या पायात नाही अन दुसर्‍याला भाजपाची बी टिम म्हणून मतांचा जोगवा मागायचा ही निती प्रकाश आंबेडकर यांनी मोडीत काढली आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या (कॉंग्रेस) तुलनेत प्रदेशिक पक्ष म्हणून मागील निवडणुकीत वंचित आघाडीने ४१ लाख मते घेतली होती. कॉंग्रेसचा एक खासदार निवडून आला तर वंचित प्रणित एक खासदार आला होता. उलट आता एखाद्या निवडणुकीत कॉंग्रेसने वंचितला मदत करुन भाजपाला पराभूत करण्याचा विचार केला पाहिजे.

वंचितला बी टिम म्हणणार्‍या कॉंग्रेसने एकदा तरी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. १९५२ पासून सुरु झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कॉंग्रेस एक हाती सत्ता घेत होती. मात्र, १९९६ पासून बर्‍यापैकी कॉंग्रेसला कायमची उतरती कळा लागली. कारण, तेव्हा कॉंग्रेसने ५४३ पैकी ५२९ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी फक्त १४० जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ४२१ जागा लढविल्या आणि देशात ५२ जागा मिळविल्या यात महाराष्ट्रात फक्त एक जागा होती. म्हणजे आजकाल भाजपाला कॉंग्रेस प्रतिस्पर्धी नाही. तर, प्रादेशिक पक्ष हे त्यांचे प्रतिस्पर्धी असल्याचे दिसते आहे. यात आणखी एक मोठे दुर्दैव असे. की, पुर्वी कॉंग्रेस घटक पक्षांना जागा वाटप करीत होती. आता घटकपक्ष कॉंगेसला जागा देताना दिसत आहे. म्हणून तर १९९६ साली ५४३ पैकी ५२९ जागा लढविणारी कॉंग्रेस आज २०२४ मध्ये ५४५ पैकी फक्त ३०० जागा लढविताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात ४८ पैकी फक्त १७ जागा लढवत असून प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना २१ आणि एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आमदार-खासदार असणारा शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष १० जागा लढवत आहे. त्यामुळे, वंचितचे माप काढणार्‍या बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसने किती वाटोळे झाले आहे. कॉंग्रेसची बी टिम आज भाजपाची ए टिम कशी झाली आहे याचा विचार करावा अशा प्रकारची टिका होऊ लागली आहे.

खरंतर भाजपाला केंद्रात बसविण्यात कॉंग्रेसचाच मोठा हात असल्याची टिका होत आहे. यांना नेते संभाळता आले नाही, जे संभाळले आहेत त्यांच्यामागे जनता नाही. जे जेष्ठे नेते आहेत ते थांबून तरुणांना संधी द्यायला तयार नाहीत, भाजपाच्या नकली धोरणांवर कॉंग्रेस नेते बोलायला तयार नाहीत, यांच्यापेक्षा मार्क्सवादी भाजपाच्या धोरणांवर टिका करताना दिसतात. मात्र, कॉंग्रेसकडून बोचरी टिका सोडता फारसा कट्टर विरोध होताना दिसत नाही. जेव्हा सत्ता होती तेव्हा काही नेत्यांनी बक्कळ मलिदा जमा केला आणि आता चौकशा थांबविण्यासाठी आणि जेलमध्ये जाण्याच्या भितीपोटी भाजपमध्ये कॉंग्रेस नेते जाऊ लागले आहेत. देशात अनेक घटक पक्षांना देखील संभाळण्यात, त्यांची मनधरणी करण्यात कॉंग्रेसला यश आले नाही. त्यामुळे, सत्ता स्थापन करणे शक्य असून देखील विरोधात बसण्याची वेळ कॉंग्रेसवर आली आहे. इतकेच काय.! तर, मुस्लिम, बौद्ध तथा अन्य मागासवर्गीय आणि वैचारिक समाज त्यांची हक्काची व्होटबँक होता. तो देखील संभाळण्यात कॉंग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही, डावपेच नाही, संघटन नाही, समाजमान्य नेतृत्व नाही म्हणून तर भाजपाला कॉंग्रेस हा सक्षम पर्याय लोकांना वाटत नाही. त्यामुळे, आम्ही भाजपाला मत देणार नाही असे प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळते. मात्र, भाजपा बहुमताने निवडून येते. हे काशाचे द्योतक आहे.? तर कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणांचे. उगच स्वत:चे अपयश झाकण्यासाठी कधी इव्हीएमवर खोपार फोडायचे तर कधी वंचित बहुजन आघाडीवर ताव खायचा. हे म्हणजे असे झाले. की, आपले ठेवायचे झाकून...!!

एकंदर, कॉंग्रेसने दुसर्‍याच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वत:च्या घरात काय चालले आहे हे पाहिले पाहिजे. गुजारात येथे कॉंग्रेस उमेदवार निलेश कुंभाणी यांच्यामुळे भाजपाचे मुकेश हे लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. तर भोपाळमधील इंदुरमध्ये कॉंग्रेस उमेदवार अक्षय बम यांनी त्यांचा उमेदवार अर्ज अचानक मागे घेतला आणि भाजपाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गी यांना विजय सोपा करुन दिला. मत आता बाळासाहेब थोरात यांनी सांगावे. की, ही कॉंग्रेसची कोणती टिम आहे? म्हणजे आपला तो बालु आणि दुसर्‍याचा तो बाल्या ही भुमिका कॉंग्रेसना बदलली पाहिजे. महाराष्ट्रात अन्य ठिकाणी वंचितचा पाठींबा चालतो. मात्र, जेथे विरोधात उमेदवार आहेत. तेथे वंचित भाजपाची बी टिम होते. हा विरोधाभास आता सुज्ञ मतदारांच्या लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे, राज्यात प्रचाराची धुरा असणार्‍या बाळासाहेब थोरात यांनी तरी शिर्डी लोकसभा मतदार संघात अशा प्रकारचे वक्तव्य करु नये अशा प्रकारचे मत वंचितच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.