तुमच्या आमदाराला मान झुकवू नका.! लोखंडेंना मतदान करा.! कोण कोणाचा प्रचार करतय माझे लक्ष आहे.!

     

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

भावनिक मुद्दा म्हणून मी पहिल्यांदा शरद पवार यांच्यासोबत गेलो होतो. मात्र, कित्तेक कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती होती. निधी मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे, अजित दादांच्या सोबत गेलो आणि जिल्ह्यात सर्वात जास्त निधी आणून कोट्यावधींची कामे देखील करुन दाखविली आहे. आज जसा तुम्ही माझ्यावर विश्‍वास ठेवला आहे तसा मी म्हणतो म्हणून सदाशिव लोखंडे यांच्यावर ठेवा. त्यांना निवडून द्या, येणार्‍या काळात आपल्याला तोलार खिंड फोडून मुंबई जवळ करायची आहे, घाटमाथ्यावरील पाणी वळवायचे आहे, रस्ते, बंधारे आणि एमआयडीसी सारखी अनेक मोठी कामे करायची आहेत. जसा मी कामे करतोय तसे लोखंडे देखील शंभर टक्के कामे करतील. यापुर्वी आपल्या अकोले तालुक्याने ३१ हजारांचे लिड एका कॉंग्रेसच्या उमेदवाराला दिले होते. मात्र, तो काळा की गोरा हे सुद्धा आपल्याला माहित नाही. त्यामुळे, लोखंडे नक्की जनतेत येतील आणि कामे करतील याची मी शाश्‍वती देतो. मी अकोल्याचा आमदार आहे, जसे तुम्ही मला पदरात घेऊन मते दिली तसे लोखंडे यांना देखील द्या. मला मान खाली घालायला लावू नका. असे आवाहन डॉ. किरण लहामटे यांनी केले. त्यांनी आज दि. ४ मे २०२४ रोजी सिताराम पा. गायकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्यात बुथ कमिट्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यास पाच हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होता.

लोखंडे साहेबांना मोठे लिड देऊ.!

या राज्यात अनेक शेतकरी नेते होऊन गेलेत. परंतु आज अनेक कारखाने जे तग धरुन असतील ते फक्त मोदी साहेबांच्या धोरणामुळे आहे. जेव्हा ३१ शे रुपयांचा भाव ठरुन दिला. त्यानंतर ३१ शे ते ३४ शे रुपयांचा भाव सारखरेला टिकून राहिले पुर्वी तो केवळ १९ शे ते २२ शे चा होता. तसेच सहा टक्के व्याजदराने इथेनॉलचे प्रकल्प दिले असतील. अशा अनेक शेतकर्‍यांसाठी विविध योजना त्यांनी केल्या आहेत. म्हणून मोदींना भक्कम साथ देण्यासाठी लोखंडे साहेबांना मतदान करा. लोखंडे हे एक मृदु स्वभावाचे आहेत आणि शिर्डीच्या साई बाबांचा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. अकोल्यावर दादांचे विशेष प्रेम आहे. त्यांनी अकोले तालुक्यासाठी १८ शे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे, आम्ही दादांचा आदेश कधी पडू दिला नाही आणि देणार नाही. त्यासाठी लोखंडे साहेबांना देखील पुर्ण ताकदीने मदत करणार आहे. लोखंडे साहेबांना मत म्हणजे युती सरकारला मत आणि युतीला मत म्हणजे दादांना मत तसेच भक्कम पंतप्रधानांना मत असे आहे. म्हणून अकोले तालुक्यात आमदार व आम्ही मोठे लिड लोखंडे यांना देऊ यात तिळमात्र शंका नाही असे मत सहाकर महर्षी सिताराम पा. गायकर यांनी व्यक्त केले.    

नेत्यांची ठासणारा आमदार..!!

डॉ. किरण लहामटे यांना निवडणुकीनंतर संघटन बांधता आले नाही अशा प्रकारचे वक्तव्य केले जात होते. मात्र, यावर त्यांनी सपशेल पाणी सोडले आहे. कारण, अवघ्या चार ते पाच दिवसात डॉ. लहामटे यांनी पाच हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा केला होते. जर अधिक ताकद लावली असती तर मंगल कार्यालय, पोर्च आणि जेवणाच्या हॉल सोडून लोकांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली असती. त्यामुळे, बुथ नियोजन आणि त्यांचे संघटन कसे असते याचे उत्तम उदा. डॉ. लहामटे यांनी दाखवून दिले आहे. मात्र, गायकर साहेब सोडून बाकी नेत्यांची त्यांना कायम ऍलजी झालेली आहे. अर्थात अन्य नेते देखील उभारणारेच आहेत. त्यामुळे, डॉ. लहामटे जे करतात ते योग्यच असल्याचे सामान्य कार्यकर्ते म्हणताना दिसले. त्यांच्या असल्या वागण्यामुळे गावागावांमधील पुढारपण करणार्‍या नेत्यांची किंमत कमी झाली असून खरे काम करणार्‍या तरुण कार्यकर्त्यांना तालुक्यात व गावात स्थान मिळु लागले आहे.   

बंडखोर कार्यकत्यांना सुचना.! 

डॉ. किरण लहामटे यांचे काही कार्यकर्ते वंचितचा प्रचार करीत आहेत. तर काही महाविकास आघाडीच्या प्रचारात दंग आहेत. त्यांना देखील लहामटे यांनी सुनावले आहे. की, तालुक्यात माझे हात बळकट करण्यासाठी मतांचे विभाजन करु नका. मते कमी पडली तर राज्यात मला उत्तरे द्यावी लागणार आहेत. लोखंडे यांच्याकडून मी तालुक्याची मोठी कामे करुन घेतो. पण, अन्य ठिकाणी कोणाचा प्रचार करु नका.  जितके मतांचे विभाजन होईल तितका तोटा तालुक्याचा होणार आहे. केंद्रात मोदी सरकार येणार आहे. त्यामुळे, मते वाया घालु नका आणि चुकीच्या व्यक्तींना निवडून देऊ नका. माझे देखील लक्ष आहे कोण कोणाचा प्रचार करतय आणि कोण कोणाच्या पोष्ट करत आहे. त्यामुळे, नेता, समाज आणि पुढारपण यापेक्षा तालुक्याच्या विकासाला मत द्या.

खासदारकीमुळे आमदारकीची रंगीत तालिम.!

सदाशिव लोखंडे यांच्यासाठी मतांचा जोगवा मागताना डॉ. किरण लहामटे व सिताराम पाटील गायकर यांनी अकोल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. येणार्‍या सहा महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे, खासदारकीच्या निमित्ताने विधानसभेची एक रंगीत तालिम होऊन गेली आहे. नकळत त्यांनी त्यांच्या विरोधकांवर देखील निशाणा साधला तर काही कार्यकत्यांना सक्त सुचना दिल्या आहेत. आपले काम बोलते आहे. कोणाचे पुढे-पुढे करुन फक्त राजकारण करायचे आणि निवडणुका जिंकायच्या हे मला मान्य नाही. गेल्या साडेचार वर्षात मी किती काम केले हे जनता पाहत आहे. त्याचा हिशोब देखील मी देणार आहे. त्यामुळे, आज तुम्ही सदाशिव लोखंडे यांना निवडून द्या, उद्याच्या विधानसभेला काय होईल ते तेव्हा पाहु. मात्र, खासदारकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आमदारकीची रंगीत तालिम केल्याचे पहायला मिळाले.