माणुसकीला काळीमा.! १० वीचे हॉलतिकीट आणण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीचे अपहरण करुन टपरीत केला अत्याचार, तीने आत्महत्या केली.
सार्वभौम (संगमनेर) :-
इयत्ता १० वीच्या परिक्षेचे हॉलतिकीट आणण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीचे काही टपोरी मुलांनी अपहरण केले. तिला पान स्टॅलच्या टपरीत ओढून नेत हात व तोंड बांधून तिच्यावर अमानुषपणे अनेक वेळा अत्याचार केले. टापरीचे शटर उघडल्यानंतर जखमी आवस्थेत मुलगी घरी गेली आणि आईच्या गळ्यात पडून धाय मोकलुन रडली. हा सर्व बळजबरीचा प्रकार तिला सहन झाला नाही. त्यामुळे तिने विषारी औषध घेऊन राहत्या घरात स्वत:ची जिवणयात्रा संपविली. ही घटना दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास साकुर येथे घडली. याप्रकारणी मुख्य आरोपी सौरभ खेमनर याच्यासह पाच जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. १ मार्च २०२४ रोजी इयत्ता १० वीचे पेपर चालु होणार होते. त्यामुळे, मयत झालेली विद्यार्थीनी दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शाळेत गेली होती. तेथे तिला तिच्या दोन मैत्रीणी भेटल्या आणि त्या देखील शाळेकडे गेल्या. मात्र, शाळेला सुट्टी असल्यामुळे सर्व विद्यार्थीनी माघारी फिरल्या. त्यानंतर दोन मैत्रीनी घराकडे निघुन गेल्या आणि मयत विद्यार्थीनी तेथील एक टपरीवर थांबून काही साहित्य घेत होती. तेथून पुढे निघते कोठे नाहीतर आरोपी सौरभ खेमनर याने तिला आडविले आणि हात धरुन तो ओढू लागला. त्यावर मुलीने नकार दिला. त्यामुळे, या नराधमाने तिचे तोंड दाबले आणि तेथील एका रुबाब पान स्टॉलकडे ओढत नेले.
दरम्यान, या पान स्टॉलमध्ये नेेल्यानंतर आरोपी सौरभ याने टापरीचे शटर खाली घेतले आणि पीडित मुलीचे तोंड रुमालाने व हात एका दोरीने बांधून घेतले. त्यामुळे, तिला ओरडणे शक्य झाले नाही. मात्र, ती त्याला सांगत होती. माझ्यावर बळजबरी करु नको, मी लहान आहे, मला शिकायचे आहे. मला बाहेर जाऊदे, माझ्याशी अश्लिल काही करु नको. मात्र, या नराधमाने तिचे काही एक ऐकले नाही. बाहेर असणार्या योगेश खेमनर यास आरोपीने सांगितले. की, बाहेरुन कुलूप लावून घे. त्यानंतर सौरभ खेमनर याने त्याचे कपडे काढले आणि इयत्ता १० वीच्या मुलीवर बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर काही वेळानंतर त्याने योगेशला फोन केला आणि स्ट्रींग (थंड पेय) घेऊन बोलाविले. योगेश बाहेरच उभा होता. त्याने ते थेड पेय आत दिले आणि पुन्हा बाहेरुन कुलूप लावून घेतले. त्यानंतर आरोपी सौरभ याने पुन्हा पीडित मुलीवर अत्याचार केले.
दरम्यान, योगेशला कोठेतरी जायचे होता. त्यामुळे, स्टॉलची चावी शेजारी विकास गुंड याच्याकडे देण्यास सांगितल्या. तर, बाहेर प्रकाश भडांगे व विजय खेमनर यांना लक्ष ठेवण्यास सांगितले. सौरभ याचा आत्मा शांत झाल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या तोंडाचा रुमाल सोडला आाणि तिला सांगितले. आता जे काही झाले आहे त्याची वाच्चता करायची नाही. जर कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आणि त्यानंतर काही वेळात त्याने बंद स्टॉलचे शटर उघडले. आतमध्ये जे काही घडले त्याबद्दल मुलीस फार वाईट वाटले होते. त्यामुळे, ती फार घाबरुन गेली होती. जे काही घडले ते घरी जाऊन आपल्या आई वडिलांना सांगण्याची धाडस तिने ठेवली होती. मात्र, हे सर्व आपले पालक समजून घेतील का? त्याचे परिणाम काय होतील? याचा देखील विचार तिच्या मनात होता. त्यामुळे, ती फार भेदरुन गेली होती.
दरम्यान, बाहेर आल्यानंतर पीडित मुलीस बाहेर तिच्या पाहुण्यांतील एक व्यक्ती दिसला. तोवर सकाळचे ११:३० वाजले होते. ती घरी गेली असता तिने कपडे बदलले आणि थेट बेडरुमध्ये जाऊन बसली होती. तिच्या कोवळ्या वयासोबत जो काही प्रकार झाला होता. तो तिला कल्पनेत देखील सहन होणार नव्हता. त्यामुळे, ती प्रचंड अस्वस्थ होती. मात्र, तरी देखील तिने मोठ्या धाडसाने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने देखील समजून घेतले आणि आपण वडिलांशी बोलुन काहीतरी निर्णय घेऊ असे सांगितले. त्यावेळी पीडित मुलगी आईच्या गळ्यात पडून धोय मोकलुन रडत होती. काही वेळानंतर आई बाहेर गेली असता मुलीला घरात एकांत सापडला आणि तिने विषारी औषध घेऊन स्वत:ला संपवून घेण्याचा निर्णय घेतला. घरात कोणी नाही हे लक्षात येताच तिने औषध घेतले आणि आपल्या जीवण प्रवासाला पुर्णविराम दिला.
दरम्यान, काही वेळेनंतर हा प्रकार आजीने पाहिला असता घरात एकच कल्लोळ माजला. त्यानंतर आईने देखील टाहो फोडला. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. मुलीस तरी देखील तत्काळ साकूर येथील दवाखाण्यात हलविण्यात आले होते. मात्र, तेथून देखील संगमनेरला हलविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेर मुलीने स्वत:ची जीवणयात्रा संपविली. त्यानंतर दु:खातून सावरल्यानंतर मयत मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली. त्यात सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर), प्रशांत भास्कर खेमनर (रा. भांगेवस्ती, साकुर), विकास रामदास गुंड (रा. गुंडवस्ती, मांडवे बु. ता. संगमनेर) व विजय खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर) अशा पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश
अ.नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये राहत असलेले का दहावीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामधील आरोपींवर बाल लैगिक अत्याचार (पोक्सो)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा असे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संगमनेर पोलीस उपअधीक्षक यांना निर्देश दिले आहेत. तसेच आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावी. सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्ज शीट कोर्टामध्ये दाखल करावे. पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. सदर आरोपींकडून मुलीच्या पालकांवर वारंवार दबाव आणला जातो आहे त्यामुळे तिच्या पालकांना त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करावे तसेच वेळप्रसंगी संरक्षण देण्यात यावे. या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधीत पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले. सदर घटनेबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ उपसभापती कार्यालयास सादर करण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.