फेसबुकवर प्रेम जडल्यानंतर होस्टेलहून विद्यार्थीनीेचे अपहरण केले, मुंबईत नेवून अत्याचार केला, तीन मुली असणाऱ्या आरोपीने १९ वर्षीय विद्यार्थीनेचे वाटोळे केले.!

 

सार्वभौम (संगमनेर): - 
                संगमनेर शहरातील एका मुलीची मुंबईतील मुलाबरोबर फेसबुकवर ओळख झाली. मंग काय हाय,हॅलो फोनवर बोलणे सुरू झाले. आरोपीने पिडीत मुलीकडून बळजबरीने एक नग्न अवस्थेतील फोटो मिळवला. त्यानंतर ब्लॅकमेल सुरू केले. मंग काय आरोपीने मुंबई वरून थेट संगमनेर गाठले. घुलेवाडी परिसरात पिडीत मुलीला गाठून नग्न अवस्थेतील फोटो दाखवुन संगमनेर बसस्थानकावरून थेट मुंबई गाठली. तेथे एका चाळीशेजारी नेऊन एका रूममध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. 29 फेब्रुवारी 2024 ते रविवार दि. 3 मार्च 2024 पर्यंत वेळोवेळी घडली. याप्रकरणी पिडीत तरुणीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कारासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यात अमीर रेहान मलीक (रा. मुंबई ) यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
           याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहराजवळील एका विश्रामगृहामध्ये राहणारी तरुणी शहरातील कॉलेज मध्ये शिक्षण घेत होती. ती दररोज कॉलेज जात असत. मोबाईल मध्ये सोशल मिडीया वापरत. फेसबुकवापरत असताना एकेदिवशी अचानक अमीर मलीक या नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवरून हाय मेसेज आला. तेव्हा पिडीत मुलीने मेसेजला रिप्लाय दिला. जेव्हा नाव विचारण्यात आले तेव्हा अमीर रेहान मलीक असे नाव सांगुन तो उत्तर प्रदेशचा असल्याचे सांगितले. आरोपी अमीर मलीक याने इंजिनिअरिंग होऊन सध्या मुंबई मध्ये दुकानावर काम करतो असे फेसबुकवर पिडीत मुलीला सांगितले. त्यानंतर पिडीत मुलीचे आणि अमीर मलीकचे फेसबुकवर बोलणे सुरू झाले. फेसबुकवरच एकमेकांना मोबाईल नंबर दिला. मंग काय, फोनवर बोलणे सुरू झाले. एकेदिवशी आरोपी अमीर मलीक हा पिडीत तरुण मुलीकडे नग्न अवस्थेतील फोटो मागु लागला. त्याने तो बळजबरी मिळवला.
             दरम्यान, आरोपी अमीर काजीने गुरुवार दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी थेट संगमनेर गाठले. तो दुचाकीवर घुलेवाडी फाटा परिसरात आला आणि पिडीत मुलीला गाठले. तेथे पिडीत मुलीला तिचा नग्न अवस्थेतील फोटो दाखवुन बोला की, उद्या तु तुझी बॅग भरून संगमनेर बस स्थानक येथे येशील तेथुन आपण मुंबईला जाणार आहोत. जर सोबत आली नाही तर तुझा फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर अपलोड करेल असे बोलुन ब्लॅकमेल करू लागला. दुसऱ्या दिवशी दि.1 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून कॉल करण्यास सुरुवात केली. आरोपी अमीर मलीकने वारंवार संगमनेर बस स्थानक येथे येण्यास सांगितले. त्याला नकार दिला असता तुला हॉस्टेलवरून उचलुन घेऊन जाईल असा दम दिला. भेदरलेल्या मुलीने बॅग भरली व रिक्षाने संगमनेर बसस्थानक गाठले तेथे आरोपी अमीर मलीक हा उभा होता. त्याने पिडीत तरुणीला घेऊन बस पकडली नाशिकला उतरले. तेथुन रेल्वे पकडली थेट मुंबई गाठली. तेथे पत्र्यांच्या चाळी ओलांडुन एका बिल्डींग मध्ये नेले.    
दरम्यान, बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असलेली रूम मध्ये थांबले. तेथे पिडीत मुलीला मला तुझ्या बरोबर लग्न करायचे आहे असे बोलुन रात्रीच्यादरम्यान मध्ये बळजबरीने अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी दि. 2 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता आरोपी अमीर मलीकने पिडीत तरुणीला कोंडून घेतले. दोन ते तीन तासाने आरोपी अमीर मलीक हा परत आला तर त्या सोबत तीन लहान मुली होत्या. पिडीत तरुणीने मुलीबाबत विचारले असता माझे पाहिले लग्न झाले आहे मला ह्या तीन मुली आहेत. पत्नी सोबत घटस्फोट झाल्याचे सांगितले. दि.3 मार्च 2024 रोजी पुन्हा रात्री तिन्ही मुली झोपल्यानंतर पिडीत तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्या इच्छेविरुद्ध संभोग केला. 
        संगमनेर शहर पोलीस पिडीत तरुणीचा शोध घेत होती. त्यांनी कसुन चौकशी केली. तपास अधिकाऱ्यांना मुंबईत लोकेशन मिळाले. कुठलाही विलंब न करता एक पथक तयार करून मुंबईला रवाना केले दि.4 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आरोपीला रंगेहाथ पकडले. आरोपी अमीर मलीक याच्या ताब्यातुन तरुण मुलीची सुटका करण्यात पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान, पोलीस नाईक अशोक पारधी, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दाभाडे या पथकातील पोलीसांना यश आले. त्यामुळे, पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपी अमीर मलीक याच्या मुसक्या आवळुन पोलिसांनी त्याला जेरबंद केले. त्याला आज संगमनेर न्यायालयापुढे हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.