इयत्ता 10 वीच्या मुलीवर अत्याचार, चार शाळा बदलल्या पण चाळे काही कमी होईना, अखेर जेलमध्ये टाकला, भन्नाट पण फालतू लव स्टोरी.!


सार्वभौम (संगमनेर) :- 

                संगमनेर शहरातील इंदिरा गल्ली परिसरातील इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलीची ओळख मामाच्या मुलीच्या लग्नात एका तरुणा बरोबर झाली. एकमेकांना मोबाईल नंबर दिला. मंग काय.! ते हाय, हॅलो गुलूगुलू बोलु लागले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पठारभागावरील एका आश्रम शाळेत शिक्षण घेत असताना शिक्षकांनी एकेदिवशी हे प्रेम प्रकरण पकडले त्यामुळे, शालेय शिक्षण घेण्यासाठी तरुणीला जुन्नर तालुक्यात मावशीकडे पाठवले तेथे देखील हा तरुण पाठलाग करू लागला. तेथे रात्री दोन वाजता येऊन तु बाहेर ये नाहीतर मी माझा जीव देईल असे तरुण बोला. त्यामुळे, पिडीत तरुणी घराबाहेर तेथे असलेल्या मंगल कार्यलया मध्ये भेटण्यासाठी आली. तेथे तरुणाने मिठी मारून तिच्यावर बळजबरीने वेळोवेळी अत्याचार केला. तेथे देखील हा तरुण त्रास देत असल्याने दहावीत शिकणाऱ्या तरुणीला संगमनेर मधील सायखिंडी परिसरात नातेवाईकांनी आणले. तेथे देखील हा तरुण त्रास देऊ लागला. 

        दरम्यान, त्याने भेटण्यासाठी सायखिंडी परिसरातील डोंगरावर बोलवले तेथे बळजबरीने लगट करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व धक्कादायक घटना 27 नोव्हेंबर 2023 ते 7 फेब्रुवारी 2024 या दरम्यान वेळोवेळी घडली. या सर्व त्रासाला कंटाळुन पिडीत तरुणीने आईला सांगितले. आईची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले तेथे पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून सुरज तान्हाजी घाणे (रा. मोधळवाडी, पिंपळगावदेपा,ता. संगमनेर) याच्याविरुद्ध बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी सुरज घाणेला तात्काळ अटक केली. त्याला आज न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत तरुणीच्या मामाच्या मुलीचे दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी पिंपळगाव देपा येथे लग्न होते. त्या विवाहा मध्ये पिडीत तरुणीची ओळख आरोपी सुरज घाणे या तरुणाशी होती. सुरज घाणेनी आपला नंबर पिडीत तरुणीला दिला आणि तुला काही अडचण आली तर या नंबरवर फोन कर असे बोला. त्यावेळी पिडीत तरुणी अंभोरे परिसरातील एका आश्रमशाळेत इयत्ता नववी मध्ये शिकत होती. उन्हाळ्याची सुट्टीमध्ये पिडीत तरुणी आईकडे संगमनेर शहरात गेली. तोपर्यंत सुरज घाणे हा फोनवर मैत्रीत फोन करत होता. या मैत्रीचे संबंध प्रेमात झाले. त्यानंतर पिडीत तरुणी पुढील शिक्षणासाठी बाळेश्वर परिसरातील एका आश्रम शाळेत प्रवेश घेते. त्यावेळी आरोपी सुरज घाणेचा भाऊ हा देखील त्याच आश्रम शाळेत शिक्षण घेत होता. 

दरम्यान,  त्यामुळे सुरज घाणे हा भावाला भेटण्याच्यानावाखाली पिडीत तरुणीला भेटण्यासाठी जात होता. परंतु पिडीत तरुणीला शाळेतुन कुठेही जाऊ देत नव्हते. दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी पिडीत तरुणीचा वाढदिवस होता. सुरज घाणे हा दुपारी पिडीत तरुणीला भेटण्यासाठी आश्रमशाळेत आला. पिडीत तरुणीला एक चांदीची अंगठी व एक हजार रुपये दिले. ही भेटवस्तु दिल्याचे शिक्षकांना कळले. त्यामुळे, शिक्षकांनी पिडीत तरुणीला बोलवून तिची कानउघडणी केली.त्यानंतर सुरज घाणे तेथे येण्याचा बंद झाला. मात्र, शाळेला उन्हाळ्या सुट्टी लागली पिडीत तरुणी आईकडे सुट्टीला आली. सुरज घाणे आणि पिडीत तरुणीचे चाळे आईच्या लक्षात आले. 

            दरम्यान, आईने पिडीत तरुणीला पुढील शिक्षणासाठी मावशीकडे जुन्नर तालुक्यात पाठवले. तेथे इयत्ता दहावी मध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी सुरज घाणे याने पिडीत तरुणीला मोबाईल घेऊन दिला. या फोनवरून पिडीत तरुणी व सुरज घाणे यांचे रोजचे बोलणे होत होते. एकेदिवशी सुरज घाणे हा पिडीत तरुणीला भेटण्यासाठी आला पण जास्त वेळ भेट न झाल्याने तो 27 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री दोन वाजता मावशीच्या घराकडे आला. तेथुन फोन केला तु जर मला आज भेटली नाही तर मी जीवाचे बरे वाईट करेल असे फोनवर बोल्याने पिडीत तरुणी जवळच असलेले मंगल कार्यलया मध्ये सुरज घाणे याला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी सुरज घाणे याने बळजबरीने मिठी मारली व लगट करून अत्याचार केला. त्यानंतर सुरज घाणे हा शाळेत येऊन त्रास देऊ लागला. त्यामुळे, पिडीत तरुणीची आईने पिडीत तरुणीला शाळेतुन काढले व पुन्हा सायखिंडी परिसरातील नातेवाईकांकडे ठेवले. 

         दरम्यान, तेथे देखील सुरज घाणे हा येऊ लागला. दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान मध्ये जवळच असलेल्या डोंगरावर बोलवले तेव्हा धमकावून नातेवाईकांना फोन करू लागला. वारंवारच्या त्रासाला कंटाळुन पिडीत तरुणीने सर्व घटनाक्रम आईला सांगितला.आईची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले तेथे पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून सुरज तान्हाजी घाणे (रा. मोधळवाडी, पिंपळगावदेपा,ता. संगमनेर) याच्याविरुद्ध बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी सुरज घाणेला तात्काळ अटक केली. त्याला आज न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पुढील तपास पोलीस करत आहेत.