एकीकडे बायको डिलेवरी व दुसरीकडे प्रेयसिचा यादगार वाढदिवस, लग्नास नकार दिल्याने गुन्हा दाखल.!
संगमनेर शहरातील उरुस मध्ये एकमेकांशी ओळख झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, आपण पळून जाऊन लग्न करु असे अश्वासन आरोपीने पीडितेस दिले आणि वडगाव पान येथील हॉटेलवर पीडितेच्या वाढदिवसाच्या दिवशी या दोघांनी यादगार रात्र काढली. असे अनेक वेळा लग्नाचे अमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केले. मात्र, नंतर मुलगी त्याच्या घरी गेली असता तिच्या लक्षात आले. की, आरोपी शोएब आख्तर शेख (वय २४, रा. संगमनेर) याचे लग्न झाले आहे. त्यानंतर तिने आरोपीस लग्नाची पुन्हा मागणी केली. मात्र, त्याने नकार दिला. ही घटना दि. ५ जुलै २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या वेळी घडली. दरम्यान याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहुन शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी २०२३ मध्ये संगमनेर शहरात ऊरुस भरला होता. तेथे कुरण येथील १९ वर्षीय पीडित तरुणीची ओळख शोएब शेख याच्यासोबत झाली होती. तेव्हा या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्यानंतर यांच्यात फोन करणे, चॅटिंग करणे, हाय-हॉलो सुरू होते. चार महिन्यानंतर यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर यांनी एकमेकांना गुपचूप भेटणे सुरू केलेे. तु मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, आपण पळून जाऊ आणि कोठेतरी लग्न करु असे अनेक अश्वासने शोएब शेख पीडित मुलीस देत होता. मुलगीचे वय कमी असल्यामुळे याचे चाळे तिच्या लक्षात आले नाही. त्यामुळे, तिच्या नासमझपणाचा फायदा घेऊन तो तिला निव्वळ फिरविण्याचे काम करीत होता.
दरम्यान, आरोपीने पीडित मुलीस भेटण्यास बोलाविले आणि थेट वडगाव पान येथील एका हॉटेलात नेवून तिच्यावर अत्याचार केलेे. आपण लवकरच लग्न करणार आहोत असे म्हणून तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि पुन्हा तिला तिच्या घराबाहेर सोडले. त्यानंतर पीडित मुलीचा वाढदिवस होता याने तिला पुन्हा बोलावून घेतले आणि आपण लग्न करणार आहोत असे म्हणून वडगाव पान येथील हॉटेलमध्ये तिचा वाढदिवस यादगार केला. तो दिवस गेल्यानंतर पीडित मुलीने त्यास विचारणा केली, तु लग्न कधी करणार आहे? तेव्हा तो म्हणाला थोडे दिवस थांब आपण पळून जाऊन लग्न करणार आहोत. मात्र, वेळोवेळी हा वेगवेगळी करणे सांगत होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेवून हिच्यावर अत्याचार करीत होता. मात्र, लग्नाचा मुहूर्त कधी निघाला नाही.
दरम्यान, दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपी शोएब शेख हा पीडित मुलीच्या घरासमोर चारचाकी गाडी घेऊन गेला. तिला फोन करुन म्हणाला. की, आजच्या आज आपल्याला पळून जाऊन लग्न करायचे आहे. त्यामुळे, बाहेर ये, तेव्हा पीडित तरुणी बाहेर आली आणि गाडीत बसली. त्यानंतर आरोपी शेख याने गाडी थेट घोटी येथे नेली. तेथे त्याने एक हॉटेल बुक केले आणि त्या ठिकाणी देखील त्याने पीडित मुलीवर अत्याचार केले. हा सर्व प्रकार शेख याच्या भावांना समजला असता त्यांनी या दोघांना घोटी येथून पुन्हा संगमनेर येथील घरी आणले. जे काही झाले त्यावर सामोपचाराची भुमिका घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलगी लग्नावर ठाम होती. दोन्ही बाजुच्या कुटुंबाने यावर हल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्तर मिळाले नाही. अखेर हा वाद थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेला.
दरम्यान, पीडित मुलीच्या पालकांनी तीला समजून सांगितले अन्य लोकांनी देखील सांगितले. की, शोएब शेख याचे लग्न झाले असून त्याच्या पत्नीस नुकतेच लोणी हॉस्पिटलमध्ये बाळ झाले आहे. मात्र, तेव्हा देखील पीडित मुलीने कोणाचे ऐकले नाही. पोलीस ठाण्यात तिने सर्वांना सांगितले. की, मी निर्णय घेण्यास सक्षम असून मला शोएब शेख सोबत रहायचे आहे. त्यानंतर पीडित मुलगी शेख सोबत निघुन गेली. मात्र, त्यानंतर देखील शेख याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे, पीडित मुलीने शोएब आख्तर शेख याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.