आ.डॉ.लहामटेंची लोखंडेंना धमकीवजा सुचना.! तुम्ही हे गुंड पोसणार असाल तर मी काम करणार नाही.! मला कोणाची बाजीरावकी खपनार नाही.!

- सागर शिंदे 

सार्वभौम (अकोले) :- 

शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीला आता दक्षिनेप्रमाणे उत्तरेत देखील रंग चढु लागला आहे. कारण, दोन्ही ठिकाणी खांदेपालट होतो की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. अशात शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांच्या अडचणी काही निवळताना दिसत नाही. कारण, त्यांनी अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांची भेट घेतली होती. त्यावर लहामटे यांनी स्पष्ट भाषेत उत्तर दिले. जर तुम्ही गुंड, खंडणीखोर आणि दादागिरी करणार्‍यांना सोबत घेऊन त्यांनाच पोसणार असाल तर आम्ही तुमचे काम करावे अशी आपेक्षा ठेवू नका. कारण, या तालुक्यात आम्ही विकासाचे राजकारण केले आहे. भाईगिरीचे नव्हे.! त्यामुळे, तुम्ही निवडून आलात तरी गुंड, खंडणीखोर आणि दादागिरी करणार्‍यांचे हात बळकट होणार असेल तर आम्हाला विचार करावा लागेल. अशा प्रकारची धमकी वजा विनंती सुचना डॉ.लहामटे यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे, विरोधक आणि आमदार एकाच व्यासपिठावर दिसतात का? दिसले तरी ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात शिंदे-फडणविस आणि पवार यांनी कार्यकर्त्यांची गोची करुन ठेवली आहे. एकेकाळी कट्टर राजकीय वैर असणार्‍यांना आता बळजबरीचा रामराव घ्यावा लागत आहे. त्यामुळे, युती आणि आघाडी धर्म पाळण्यासाठी नाक मुरडून का होईना नेते व कार्यकर्त्यांना एकाच व्यासपिठावर बसावे लागत आहे. मात्र, डॉ. लहामटे यांच्यासारखे काही आमदार तडतजोड करुन घेण्यास काही तयार नाहीत. चुकीला चुक म्हणणे यावर ते ठाम आहेत. म्हणूण तर सदाशिव लोखंडे यांना खासदारकीचे तिकिट मिळाल्यानंतर डॉ. लहामटे यांना लोखंडे मान्य आहे. मात्र, त्यांच्यासोबत असणारे काही गुन्हेगारी क्षेत्रातील मानसे मंजुरी नाहीत अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

त्यामुळे, जेव्हा लहामटे यांना भेटण्यासाठी लोखंडे गेले. तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. की, माझी तुम्हाला पुर्ण मदत राहिल. तुमच्या प्रत्येक सभा आणि धवपळीत मी युतीचा धर्म निष्ठेने पाळेल. मात्र, तुम्ही जर गुंड, खंडणीखोर आणि दादागिरी करणार्‍यांचे हात बळकट होणार असेल तर आमच्याकडून कोणतीही आपेक्षा ठेऊ नका. एकीकडे चुकीच्या मानसांना बळ मिळणार नाही यासाठी आम्ही लढत आहोत, येथील ठेकेदारांवर असणारी दहशत, सामान्य मानसांची लुटमार आणि दादागिरी करणार्‍यांना आम्ही कधी अश्रय देत नाही. अशात तुम्हीत हेच लोक घेऊन फिरणार असाल तर हे आमच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे, एकवेळी आमचे कट्टर विरोधक व्यासपिठावर असताना मनात काही शल्य राहणार नाही. पण, चुकीच्या व्यक्तींसोबत आम्ही व्यासपिठ शेअर करणार नाही. असेे तुम्हाला मंजुर असेल तर तुम्हास सर्वेतपरी मदत होईल. अन्यथा मी फार तत्वनिष्ठ माणूस आहे या व्यतिरिक्त चर्चेला पुर्णविरोम द्यावा अशी विनंतीवजा सुचना डॉ. लहामटे यांनी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे, एकीकडे धरलं तर चावतय आणि दुसरीकडे सोडलं तर पळतय अशी मग लोखंडे यांची झाली आहे. त्यानंतर पर्याय त्यांनाच निवडायचा आहे..!! 

पिचड व मी एका व्यासपिठावर, मला अडचण नाही.!

राज्यात शिंदे-फडणविस आणि पवार यांच्या युतीमुळे लोकसभा निवडणुकीत पिचड आणि डॉ. लहामटे हे येणार्‍या काळात एकाच व्यासपिठावर येणार आहे. मुळात पिचड कुटुंब प्रचंड लवचिक आहे. तुलनात्म डॉ.लहामटे यांची भुमिका तत्वाला धरुन ताठर असते. त्यामुळे हे एका व्यासपिठावर येतील का? हा मोठा प्रश्‍न होता. मात्र, त्यावर डॉ.लहामटे यांनी सांगितले. की, पिचड एका कोपर्‍यात आणि मी दुसर्‍या कोपर्‍यात मला त्यांच्याशी काहीच घेणेदेणे नाही. पण, त्या व्यासपिठावर कोणी गुंड आणि खंडणीखोर व अकोल्याच्या विकासात कोणी अडथळा अणणारा असेल तर लोखंडे यांचा प्रचार करायचा की नाही? याचा विचार करावा लागेल अशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.  

आमदाराच्या बंगल्यावर वेटींगला..!!

मुळात सदाशिव लोखंडे यांनी गेल्या १० वर्षात लोकसंपर्क वाढविला नाही अशी टिका त्यांच्यावर झाली. मात्र, या गोष्टीला खरोखर परवा दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. कारण, ते सायंकाळी आमदार महोदयांच्या बंगल्यावर पोहचले होते. तेथे गेल्यानंतर एका व्यक्तीने विचारणा केली. आमदार साहेब आहेत. का? तेव्हा स्वत: लोखंडे देखील तेथे उपस्थित होते. शिंदे गटाचे पदाधिकारी वर गेले असता खाली लोखंडे यांना तेथील काही मुलांनी आडविले आणि खालीच थांबा अशी सुचना केली. अर्थात त्या मुलांची काहीच चुक नव्हती. कारण, हे खासदार आहेत याची त्यांना देखील कल्पना नव्हती. त्यामुळे, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. परंतु आपण १० वर्षे खासदार होतो तरी मतदार संघातील लोक आपल्याला ओळख नाही. याचा अर्थ आपले कार्य किती महाण आहे. याचे आत्मचिंतन त्यांनी केले पाहिजे. अशी पोष्ट सोशल मीडियावर फिरत होती. नंतर आमदार महोदयांनी त्यांना वरती बोलावून त्यांचा यथोचित सन्मान केला.

क्रमश: भाग ५