आरे देवा.! मध्यात्री जोर्वे नाक्यावर पुन्हा दंगा, नारेबाजी क्यों की असे म्हणत आठ तरुणांना बॅटने मारहाण, नऊ जणांवर गुन्हे दाखल.

सार्वभौम (संगमनेर) :- 

नारेबाजी कोणी केली? असे म्हणत नांदुर शिंगोटे येथून क्रिकेट खेळुन घराकडे जाणार्‍या सात तरुणांना जोर्वे नाक्यावर आडवून मारहाण केली. ही घटना आज बुधवार दि. २१ मार्च २०२४ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. यात आठ तरुणांना बॅटने मारहाण करुन शिविगाळ दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी साई महेश जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार एम.एच १७ सीपी ६०२८ या गाडी चालकासह अन्य सात ते आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे, पुन्हा एकदा जोर्वे नाका चर्चेत आला असून हे ठिकाणी मारामार्‍यांची आणि दंग्याचे हॉट्स्पॉट बनले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, जोर्वे गावातील क्रिश संतोष पगार, कृष्णा सतिष क्षिरसागर, अदित्य पोपट घुले, दिपक सोपान घुले, साईनाथ राजेंद्र गायकवाड, राहुल राजू पगारे, गणेश गोविंद जोर्वेकर हे आठजण दि. २० मार्च २०२४ रोजी नांदुर शिंगोटे येथे नाईट क्रिकेट मॅचेस खेळण्यासाठी गेले होते. मॅच संपल्यानंतर हे सर्व तरुण रात्री १ वाजता मोटरसायकलवर घराकडे निघाले होते. रात्री २ वाजण्याच्या हे तरुण संगमनेर बस स्थानकाकडून जोर्वे नाक्याकडे जात असताना दोन तरुण दुचाकीहून आले आणि त्यांनी या तरुणांकडे रागाने पाहुन खुन्नस देण्याचा प्रयत्न केला. यांचा काहीतरी हेतू आहे हे लक्षात आले. तेव्हा या दोघांतील एकाने कोणाला तरी फोन लावला आणि समोरच्याला म्हणाला. की, नाके पर आ. असे म्हणून फोन कट केला.

दरम्यान, जोर्वे नाक्यावर गेल्यानंतर या दोघांनी आठ जणांना गाडी आडवी लावली. तेव्हा त्या गाडीचा नंबर एम.एच १७ सीपी ६०२८ हा होता. त्यावर बसलेल्या तरुणाने विचारले. की, नाराबाजी कोणी केली? असे म्हणत त्याने शिविगाळ दमदाटी करण्यास सुरूवात केली. तर, गाडीहून उतरुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी तेथे एकच आरडाओरड झाली आणि त्या क्षणी घटनास्थळी आणखी सात ते आठजण आले. त्यांनी देखील शिविगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी आरोपींपैकी एकाने अदित्य घुले याच्या हातातील बॅट हिसकून घेतली आणि बॅटने मारहाण केली. बाकी लोकांनी देखील धक्काबुक्की करीत शिविगाळ, दमदाटी करुन मारहाण केली. त्यानंतर तेथे अन्य काही लोक जमा झाले आणि त्यांनी सोडवासोडव करुन या आठ जणांना पोलीस ठाण्यापर्यंत नेवून सोडले. त्यानंतर यांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, जोर्वे नाक्यावरील दहशत आजून देखील मोडीत निघाली नाही. जितक्या घटना घडत आहेत तितकी दहशत निर्माण होत आहे. तेथे पोलीस चौकी होऊन देखील दोन गटातील मतभेद कमी होत नाही. जोर्वे नाक्यावरील अतिक्रमनाचा श्‍वास मोकळा करुन देखील दोन गटांच्या तनावाने नाक्याचा श्‍वास गुद्मरतो आहे. अशा घटना वारंवार होऊन संगमनेरातील सामाजिक वातावरण दुषित होण्यास हातभार लागत आहे. त्यामुळे, जसे संगमनेरात सीसीटीव्ही बसविले आहे. तसे या परिसरात देखील सीसीटीव्ही लावून घटनांचे वास्तव समोर आणले पाहिजे. जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच पुन्हा एक सलोख बैठक घेऊन मनभेद आणि मतभेद दुर करणे गरजेचे आहे. अन्यथा येणार्‍या काळात अशाच दंगली जोर्वे नाक्यावर पहायला मिळतील आणि एक दिवस संगमनेर आणि नंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणजे झालं.!! 

           खरंतर, गोमांसची रेड डी.वाय.एसपी पथक करते. मटका, जुगार,गोमांस,वाळुवर स्थानिक गुन्हे शाखा छापा मारते मंग संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस करतात तरी काय? शहर पोलीस ठाण्यात चोरांनी गेल्या काही दिवसात संगमनेर शहर हद्दीत शंभर तोळे सोने चोरून नेले. मात्र, एक गुन्ह्याचा देखील तपास लागला नाही. इतकेच काय.! दिवसाआड गाडी चोरीला जाते, चैनस्नॅचिंग,घरफोडी, हाफ मर्डर सारखे गुन्हे घडतच आहे.साधे गुन्ह्यातील देखील आरोपी शोधता आले नाही इतका अनागोंदी कारभार संगमनेर शहरात पहिल्यांदा पाहायला मिळाला. त्यामुळे, प्रॉपर पोलिसिंग म्हणजे काय? आता हे संगमनेर शहर पोलिसांनाच शिकवण्याची वेळ आली आहे. कारण, घटना घडल्यानंतर तासनतास पोलीस येत नाही. तपास पथक निव्वळ नावाला आहे. आजतागायत डीबीने एकाही गुन्ह्याची उकल केली नाही. आरोपींचे फोटो मिळून आरोपी फरार होतात. इतकेच काय पोलीस ठाण्यातुन आरोपी फरार होतात मंग हे करतात तरी काय? त्यामुळे, खाकीच आरोपींना खतपाणी घालते का? हे शोधण्याची वेळ आता आली आहे. असा प्रश्न संगमनेरकरांनी उपस्थित केला आहे.

रोखठोक सार्वभौमच्या बातमीनंतर....

जोर्वे येथील शाळकरी मुलांवर कुठलाही दोष नसताना कारण नसताना एका समाजाची मुले आहे म्हणुन जाणीवपूर्वक हल्ला केला. याची तक्रार देखील डी.वाय.एस.पी साहेबांनी घेतली.परंतु हे वारंवार घडते यापूर्वी देखील मोठे प्रकरण घडले. त्यामुळे,तेथे चौकी उभी केली त्यामध्ये पोलीस नाही मंग त्या चौकीचा उपयोग काय? चौकीत पोलीस असते तर हे प्रकरण कदाचीत घडले नसते. त्यानंतर तेथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही. सीसीटीव्ही असते तर त्यांची ओळख पटवता आली असती. हे वाद होऊ नये आणि शांतता राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मात्र, समोरून वारंवार हल्ले होत असेल तर आम्ही शांत बसायला तयार नाही. घटना घडती गुन्हे दाखल होतात नोटीसवर बाहेर येतात.त्यामुळे, त्यांच्या मनामध्ये भीती राहिली नाही. यामुळे आशा घटना वारंवार होतात. आज आम्ही ठामपणे निश्चय करून आलो आहे आरोपींना तात्काळ अटक करावी. सर्वांची ओळख पटवा एक नाही दोन नाही सर्व आरोपींना तात्काळ अटक करा. नाहीतर प्रांत कार्यलया बाहेर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. त्यांना जामीन होणार नाही यासाठी प्रयत्न करावे. सर्वजण अल्पवयीन मुले आहेत. त्यांची काही चुक नाही शांततेच्या मार्गाने चाले होते. त्यांना आडवी गाडी घातली.ह्या घटना वारंवार घडतात तरी पोलीस प्रशासन ऍक्शन घेतच नसेल तर आम्हला कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका.!

  - गोकुळ दिघे (माजी उपसरपंच जोर्वे)

तर 27 तारखेला आंदोलन करु.! 

आता शांततेत चालो आहे. कोणीही घोषणाबाजी करणार नाही.तात्काळ आरोपी अटक करण्यासाठी पथक रवाना केले आहे म्हणुन. जर कारवाई नाही झाली तर 27 तारखेला मोर्चा काढतोय. तो मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्याचे नियोजन आहे. तो पर्यंत कारवाई झाली नाही. तर त्या शांततेला भंग लागु शकतो. याला सर्व जबाबदार पोलीस प्रशासन राहील.      - ग्रामस्थ (जोर्वे)

जोर्वे नाका येथे चौकीत कायमस्वरूपी एक पोलीस नेमला जाईल. रात्रीचे जे हॉटेल आहे ते वेळेवर बंद होतील यामध्ये कुठलाही दुजाभाव होणार नाही. गाव हे तुमचं आहे दोन चार वर्षे नोकरीसाठी आम्ही आलो आहे. तुमच्या बरोबरीने हे गाव आमचं देखील आहे. परंतु तुमच्या पिढ्यानपिढ्या ऋणानुबंध या गावाशी जोडलेले आहे. येथे शांतता अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करा ही अपेक्षा आहे. कोणी चुकीचं वागलं तर नक्की तक्रार करा येथे पोलीस निरीक्षक आहे डी.वाय.एसपी आहे. जर यांनी दखल घेतली नाही तर माझ्याशी संपर्क करा. जे विषय पोलीस ठाण्यातील आहे ते लगेच मार्गी लाऊ.  कायदा सुवस्थेचा प्रश्न उभा राहणार नाही यासाठी प्रयत्न करू.

 - वैभव कलबुर्मे (अप्पर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर)