संगमनेरात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलसह पाच जिवंत काडतुसे जवळ बाळगली, पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकी कोणाला उडवायचे होते, तपास सुरु.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                        संगमनेर तालुक्यातील पठारभागावर मांडवे बु परिसरात दहशत माजवण्यासाठी पिस्तुल वापरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहेत. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. ही कारवाई गुरुवार दि. 14 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपी अशोक दगडु खेमनर (रा.हिरेवाडी, साकुर ता. संगमनेर) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी देखील मांडवे बु मध्ये पिस्तुल बाळगणाऱ्या तिन तरुणांना अटक केली होती आज पुन्हा एका तरुणाला अटक केल्याने मांडवे बु हे पिस्तुल खरेदी विक्रीचे केंद्र झाले आहे का?असा प्रश्न संगमनेरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर घारगाव पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवार दि.14 मार्च 2024 रोजी घारगाव पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे पोलीस ठाण्यात काम करत होते. तेव्हा त्यांना एका व्यक्तीकडून माहिती मिळाली की, साकुर पासुन काही अंतरावर असलेल्या मांडवे बु येथे अशोक खेमनर हा गावठी कट्टा बाळगुन दहशत माजवत असल्याचे गुप्तदार माहितीदाराकडून पोलिसांनी माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी फोन करून आरोपी अशोक खेमनर याना पोलीस ठाण्यात बोलावुन घेतले. त्याला विचारपूस करण्यात सुरवात केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला. माहिती लपवुन ठेवण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी खाकी दाखवली असताच तो पोपटा सारखा बोलु लागला. त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची कबुली दिली. माहिती मिळताच पोलिसांनी एक पथक तयार करून मांडव्याकडे रवाना केले.

          दरम्यान, पोलीस दोन सरकारी पंच घेऊन आरोपी अशोक खेमनर याने सांगितल्या प्रमाणे मांडवे बु येथे गेले. तेथे अनिल कढणे यांच्या शेतामधील विहिरीच्या जवळील कोपी जवळ एका खड्यात कोणाला सापडु नये म्हणुन ठेवण्यात आला होता. तिथे जेव्हा माती काढुन पिस्तुल काढण्यात आला तेव्हा पिस्तुल मध्ये पाच जीवंत काडतुसे मिळुन आली. 20 हजार रुपयांच्या पिस्तुलासह 300 रुपये प्रमाणे पाच जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या यशस्वी कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे,पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर,पो. कॉ. सुभाष बोडखे,पो.कॉ. प्रमोद गाडेकर,पो.कॉ. प्रमोद चव्हाण यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.

        दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मांडवे बु येथे एका हॉटेल मध्ये पिस्तुलची तस्करी करणारे तिघेजण सापडले होते. आता पुन्हा आढळुन आल्याने गांजा,वाळु, ड्रग्स, वाघाचे नखे बरोबर पिस्तूलचे तस्करीत संगमनेरात प्रख्यात झाले आहे. दोन जिल्ह्यांची सिमा घारगाव पोलीस ठाण्याच्या लगत असल्याने या हद्दीमध्ये अनेक अवैध धंद्यांना प्यावं फुटले आहे.तर शहर पोलीस ठाण्यात न बोलेले बरे. इथे गावठी कट्टा तर जेलमधील आरोपींकडेच मिळुन आला होता. तेव्हा तो शोध घेण्यासाठी अपयशी ठरले तर शहरात होत असलेल्या तस्करीचा शोध कधी घेणार.जातीयदंगली,हाफ मर्डर, खुनातील आरोपी अद्याप फरार आहे. शहर पोलीस ठाण्यातील तपास पथके निव्वळ मलिदा गोळा करताना आढळुन येतात. मात्र, उल्लेखनीय कामगिरी करताना नाही.