शिर्डीतून खासदार होण्यासाठी इच्छुकांचा नट्टापट्टा, पण, तिकीट कट.!
सार्वभौम (शिर्डी) :-
शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे अनेक हौसे नवसे गवसे इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत. मात्र, पक्षाकडून जागा मिळावी आणि आम्ही दिल्लीत जावे म्हणून अनेकांनी नट्टापट्टा करुन गुढग्याला बाशिंग बांधले आहे. परंतु अद्याप कोणत्याही पक्षाने शिर्डी आपल्याच कोठ्यात आहे असे ठामपणे सांगून ती जागा घोषित केलेली नाही. त्यामुळे, उबाठा गट, भाजप, कॉंग्रेस, शिंदे गट, रिपाई, वंचित आघाडी आणि अनेक अपक्ष नेत्यांनी बंड पुकारुन दंड थोपटले आहे. मात्र, जागा कोण लढविणार याबाबत निच्छित नसल्याचे दिसते आहे.